For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Pathaan : मी त्याची fan आहे हे कळल्यावर अनेकांनी मला... हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत

07:33 PM Jan 29, 2023 IST | मुंबई तक
pathaan   मी त्याची fan आहे हे कळल्यावर अनेकांनी मला    हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत
Advertisement

Pathaan Movie Controversy News :

Advertisement Whatsapp share

मुंबई : पठाणने चौथ्या दिवशीही चांगली कमाई केली आहे. शनिवारच्या सुट्टीचा पठाण चित्रपट आणि शाहरुख खानला चांगलाच फायदा झाला आहे. शाहरुखच्या चित्रपटाच्या चौथ्या दिवसाचे आकडेही समोर आली आहे. ट्रेड अ‍ॅनालिस्ट रमेश बाला यांच्या मते पठाणने चौथ्या दिवशी ५२ कोटी रुपये जमा केले. यासोबतच या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांमध्ये भारतात २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तर जगभरातील ग्रॉस कलेक्शनने ४ दिवसांत ४०० कोटींचा आकडा पार केला आहे. (Hemangi Kavi slams netizens for unfollowing her for being pathaan shah-rukh khan fan you’ll be forever pathan)

Advertisement

एका बाजूला पठाण सुपरहिट ठरत असतानाच दुसऱ्या बाजूला चित्रपटावरुन होणार वाद सुरुच आहेत. आधी बिकिनी आणि बायकॉटच्या वादाने पठाण चर्चेत आला होता. त्यानंतर आता पठाण चित्रपटानिमित्त शाहरुख खानवर लिहिलेली मराठी अभिनेत्री हेमांगी कवी हिची इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत आली असून, या पोस्टवरुन नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. मी त्याची fan आहे हे कळल्यावर अनेक जणांनी मला unfollow केलं. याहून बालिश प्रकार मी पाहिला नाही, असं हेमांगी कवीने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

Pathaan : पठाणचा जलवा चौथ्या दिवशीही कायम; 400 कोटींचा टप्पा पार

नेमकं काय म्हटलं आहे हेमांगी कवीने?

तो कसा दिसतो, त्याचा धर्म काय, कसा बोलतो, अभिनेता म्हणावं का याला वगैरे वगैरे बोलणाऱ्यांनो तुम्ही आता खरंच बंद पडा! अनेक वर्षांपासून ही चर्चा होत आलीए पण आता ती थांबवुया. काय? त्याच्या धर्मामुळे, त्याच्या non conventional Hero looks मुळे त्याचा पराकोटीचा द्वेष करणारे आपण सगळ्यांनीच पाहीले आहेत. मी त्याची fan आहे कळल्यावर अनेक जणांनी मला unfollow केलं. याहून बालिश प्रकार मी पाहीला नाही. ? असो.

Advertisement

मला वाटतं या द्वेषाचं मुळ कारण हे लोक अनाहुतपणे स्वतःहाला त्याच्याशी compare करत असावेत. हा सगळ्या बाबतीत आपल्यापेक्षा डावा असून ही इतका यशस्वी कसा? आणि आता तर या वयातही!!! सिनेमा प्रदर्शनासाठी लागणारे सगळे ठोकताळे बाजूला सारून घरबसल्या घरी बसणाऱ्या लोकांना Theatre मध्ये आणणे हे हाच करू जाणे!

स्वतःहाच्या मुलाच्या बाबतीत त्याने दाखवलेला संयम (भल्या भल्यांनाही जमला नसता) त्याला या वयात जरा जास्तच आकर्षक बनवतो. उफ्फ अपन तो पहलेसे लुटे हुए थे, अब तो पुरे बरबाद हो गए! पन्नाशी नंतर retirement चे plans करून मोकळे झालेल्यांनो द्वेष करण्यापेक्षा त्याच्याकडून काहीतरी शिकूया! तुमच्या ५७ व्या वर्षी जर तुम्ही २०-२२ वयाच्या मुला-मुलींना नाचवू शकत असाल, वेड लावू शकत असाल तर पुढे बोला!

बाकी…

झूमे जो पठान मेरी जान,
महफ़िल ही लूट जाए!

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज