For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

रामायण मालिकेतील 'सीते'च्या कट-स्लीव्ह ब्लाऊजमुळे झालेला प्रचंड वाद, दोन वर्षभर...

04:20 PM Jun 24, 2023 IST | रोहिणी ठोंबरे
रामायण मालिकेतील  सीते च्या कट स्लीव्ह ब्लाऊजमुळे झालेला प्रचंड वाद  दोन वर्षभर
Advertisement

Ramayana TV Show : आदिपुरुष चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यामधील कलाकारांचा लूक आणि संवाद यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. रावणाचा लुक, सीतेचा लुक आणि त्यांच्या सादरीकरणावर अनेक आक्षेप घेण्यात आले आहेत. माता सीतेला अशा प्रकारे दाखवून त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे प्रेक्षकांचे मत आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का? एकेकाळी टीव्हीवर येणाऱ्या रामायण मालिकेत रामानंद सागरही अशाच वादाच सापडले होते. यावेळी सीतेच्या ब्लाउजवरून हा वाद झाला होता. (Huge Controversy Caused by the cut-sleeve blouse of Sita in the Ramayana TV Show)

Advertisement Whatsapp share

टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध मालिका रामायणाला आजही लोकांकडून तितकंच प्रेम मिळतं. आजही प्रेक्षक तितक्याच उत्साहाने पाहतात, ज्या उत्साहाने त्यांनी पहिल्यांदा मालिका पाहिली होती. राम-सीता आणि संपूर्ण टीमने केवळ उत्कृष्ट अभिनयच केला नाही तर त्यातील दिग्दर्शन, पार्श्वसंगीत, वेशभूषा आणि संपादन हे देखील अप्रतिम होते.

Advertisement

Mumbai Tak Chavadi: मुंबईत शिवसेनेचाच महापौर होणार, उद्योगमंत्री उदय सामंतांचा दावा

लक्ष्मणची भूमिका साकारून लोकप्रिय झालेला अभिनेता सुनील लाहिरी यांनी रामायणाशी संबंधित अनेक आठवणी शेअर केल्या आहेत. यातीलच एक वादग्रस्त किस्सा त्यांनी सांगितला. ते म्हणाले की, ‘आदिपुरुषला आज ज्या प्रकारे लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. आमच्या काळातही रामायणाच्या प्रसारणाबाबत अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता. त्यावेळी देशात रामायण शोचे प्रसारण हा मोठा मुद्दा बनला होता. अनेक छोट्या-छोट्या गोष्टींवर बारीक नजर ठेवली जात होती. एकवेळ अशी आली जेव्हा भारतीय प्रसारण मंत्रालय हा कार्यक्रम प्रसारित करण्याच्या निर्णयात सामील होता.’

Advertisement सब्सक्राइब करा

‘सीतेच्या ब्लाउजवरूनही झाला होता मोठा वाद!’

सुनील पुढे सांगतात, ‘जेव्हा रामानंद सागर यांनी रामायण कास्ट केल्यानंतर या शोचे तीन पायलट शूट केले. त्यामुळे त्यावेळी सरकार याबाबत सतर्क होते. त्यांना कोणतीही चूक नको होती. कारण इतिहासात पहिल्यांदाच रामायण टेलिव्हिजनवर पहिल्यांदा दाखवण्यात येणार होते. याच कारणामुळे शोच्या पायलट शूटमध्ये आय अँड बी मंत्रालयाचा हस्तक्षेप ठेवण्यात आला होता. हा कार्यक्रम पाहिल्यानंतर त्यांनी अनेक मुद्दे उठवले होते. त्यांना शो टाळायचा होता असं वाटत होतं.

शाहरूखचा ‘हा’ चित्रपट हजारपटीने चांगला, ‘Adipurush’ पाहिल्यानंतर चाहत्यांच्या कमेंट्स व्हायरल!

त्याचवेळी रामानंद सागर हे त्यांच्या जिद्दीवर ठाम होते. मंत्र्यांनी सीतेच्या ब्लाउजवर आक्षेप घेत सीतेला कट स्लीव्ह ब्लाउज घालतेलं दाखवणं चुकीचं असल्याचं सांगितलं. त्यांनी हा कार्यक्रम प्रसारित करण्यास नकार दिला. दूरदर्शनच्या लोकांनीही याला विरोध केला. अशा स्थिती, रामानंद सागर यांनी पुन्हा सीतेच्या वेशभूषेवर काम केले आणि तिला पूर्ण बाह्यांचा ब्लाउज आणि त्यानुसार डिझाइन केलेल्या साडीमध्ये दाखवले. या प्रकरणामुळे ही मालिका जवळपास दोन वर्षे स्थगित करण्यात आली होती.’

Advertisement

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज