For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

मी बॉलिवूड सोडणार होते, कारण...; प्रियांका चोप्राच्या खुलाशाने खळबळ

12:46 PM Mar 28, 2023 IST | मुंबई तक
मी बॉलिवूड सोडणार होते  कारण     प्रियांका चोप्राच्या खुलाशाने खळबळ
Advertisement

Priyanka Chopra’s disclosure: एकेकाळी बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ बनून करोडोंच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रियांका चोप्राने आता हॉलिवूडमध्येही मोठे नाव कमावले आहे. देसी गर्ल ते ग्लोबल स्टार हा प्रियांकाचा प्रवास अप्रतिम होता. पण प्रियांकाने बॉलिवूड इंडस्ट्रीतून ब्रेक घेऊन हॉलिवूडमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. यामागचे खरे कारण आता समोर आले आहे. ताज्या मुलाखतीत प्रियांकाने हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंधित मोठे सत्य समोर आणले आहे. तिने या इंडस्ट्रीतील लोकांना टार्गेट केले आहे. (I was going to quit Bollywood because…; Excitement by Priyanka Chopra’s disclosure)

Advertisement Whatsapp share

Priyanka Chopra: कुणी लठ्ठ म्हणालं, तर, कुणी भलतचं, प्रियांकाच्या डोळ्यात आलं पाणी

Advertisement

प्रियांकाचा मोठा खुलासा

डॅक्स शेफर्डसोबत ‘आर्मचेअर एक्सपर्ट’ या पॉडकास्ट शोमध्ये प्रियांकाला विचारण्यात आले की, अमेरिकेत काम शोधण्याचं कारण काय? याला उत्तर देताना प्रियांकाने सांगितले की, जेव्हा ती ‘सात खून माफ’ चित्रपटाचे शूटिंग करत होती, तेव्हा देसी हिट्सच्या अंजुला आचार्यने तिच्याशी एक म्युझिक व्हिडिओ आणि यूएसमध्ये करिअरसाठी संपर्क साधला होता. त्यावेळी प्रियांका बॉलिवूडमधून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होती. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार ती इंडस्ट्रीतील राजकारणामुळे नाराज होती. म्हणूनच तिला ब्रेक हवा होता.

Advertisement सब्सक्राइब करा

“प्रियांका चोप्राचा ‘मिस वर्ल्ड’ किताब फिक्सिंग होता”, माजी मिस बार्बाडोस लिलानीच्या आरोपानं खळबळ

 म्युझिक व्हिडिओने प्रियांकाला बॉलिवूडमधून बाहेर पडण्याची मोठी संधी दिली.

प्रियांका म्हणाली- मला इंडस्ट्रीत (बॉलिवूड) एका कोपऱ्यात ढकलले जात होते. लोक मला कास्ट करत नव्हते. माझ्याकडे लोकांच्या तक्रारी होत्या. असे खेळ खेळण्यात मी फारसी चांगली नाही. त्यामुळे मी या राजकारणाला कंटाळले होते. मी म्हणाले की मला विश्रांतीची गरज आहे. अभिनेत्री म्हणाली- ‘या म्युझिक व्हिडिओने मला माझ्या मर्यादा ओलांडण्याची संधी दिली.

Advertisement

मला न मिळालेले चित्रपट करण्याची माझी फारशी इच्छा नव्हती, ज्यासाठी मला ‘कुठल्या तरी क्लब किंवा समूहाला बटर’ करावे लागले. मला असे वाटले की मी बॉलिवूडमध्ये बराच काळ काम केले आहे आणि आता मला हे (हॉलीवूडमध्ये काम) करण्याची गरज आहे. या म्युझिक व्हिडिओनंतर प्रियांकाला आंतरराष्ट्रीय मालिका क्वांटिकोमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम मिळाले. ही मालिका सुपरहिट ठरली.

अक्षय आणि प्रियांकाचं 17 वर्षानंतर गाणं रिलीज; 2005 साली शूटिंग झालेलं गाणं त्यावेळी रिलीज न होण्याचं कारण काय?

यानंतर प्रियांकाला हॉलिवूडचे प्रोजेक्ट मिळू लागले. हळूहळू प्रियांका हॉलिवूडमध्ये जास्त आणि बॉलिवूडमध्ये कमी दिसू लागली. हॉलिवूडकडे वळल्यानंतर प्रियांका चोप्राचा ‘द स्काय इज पिंक’ हा हिंदी चित्रपट होता. लवकरच ती ‘जी ले जरा’ या चित्रपटात काम करणार आहे. प्रियांकाचे अनेक हॉलिवूड प्रोजेक्ट्सही पाइपलाइनमध्ये आहेत. तिचा शो सिटाडेल एप्रिलमध्ये रिलीज होणार आहे.

प्रियांका चोप्राचा स्टायलिश लूक

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज