For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Bholaa Cast Fees: कोट्यवधी रुपये घेऊन 'भोला' बनला अजय, तब्बू-अभिषेकचं मानधन तर..

03:54 PM Mar 30, 2023 IST | मुंबई तक
bholaa cast fees  कोट्यवधी रुपये घेऊन  भोला  बनला अजय  तब्बू अभिषेकचं मानधन तर
Advertisement

Bholaa Movie Release : सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीत एकामागोमाग एक जबरदस्त चित्रपट प्रदर्शित होत आहेत. या सर्वात ‘भोला’ चित्रपटाची (Bholaa Movie) प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. अजय देवगनच्या (Ajay Devgan) या चित्रपटाचा ट्रेलर पाहून सर्वजण थक्क होत आहेत. हा चित्रपट विशेष इफेक्ट सीन्स आणि अॅक्शनने परिपूर्ण आहे. ‘भोला’ हा चित्रपच मूळ तामिळ चित्रपट ‘कॅथी’चा रिमेक आहे. ‘भोला’मधील अजय देवगनच्या अभिनयाचेच नाही तर, दिग्दर्शकाचेही कौतुक होत आहे. हा चित्रपट बनवताना निर्मात्यांनी प्रचंड पैसाही खर्च केल्याचं आता समोर येत आहे. (In Ajay Devgan’s Bholaa Movie Tabu-Abhishek’s powerful entry How much Amount they get )

Advertisement Whatsapp share

तसेच, या चित्रपटातील कलाकारांनाही प्रचंड मानधन देण्यात आलं आहे. यावेळी मुख्य भूमिका साकारणाऱ्या अजय देवगनला सर्वाधिक मानधन मिळालं आहे. भोला संपूर्ण जगभरात 3D, Imax आणि 4DX मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Advertisement

राम नवमी सोहळा सुरु असतानाच मोठी दुर्घटना; मंदिराच्या विहिरीतच 25 जण बुडाले

अजय देवगनसह, तब्बू-अभिषेकची दमदार एन्ट्री!

‘भोला’ला आणखी प्रेक्षणीय बनवण्यासाठी अनेक दिग्गज स्टार्सची यामध्ये दमदार भूमिका आहे. अजय देवगनचा हा स्वतःचा होम प्रोडक्शन चित्रपट आहे. अजय आणि तब्बूची हीट जोडी पुन्हा एकत्र दिसणार आहे. या चित्रपटात तब्बू हाय अॅक्शन भूमिका साकारताना दिसणार आहे. अभिषेक बच्चन या चित्रपटातील सरप्राइज फॅक्टर आहे. असं म्हटलं जात आहे की, अभिषेक यामध्ये व्हीलनची भूमिका करत आहे. तसेच, दाक्षिणात्य अभिनेत्री अमाला पॉलने अजयच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

तिने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. यासोबतच, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा, गजराज राव, मकरंद देशपांडे आणि किरण कुमार हे कलाकारही मुख्य भूमिकेत दिसतील.

PM Modi यांच्या गुजरातमधील अहमदाबादचं नावं मनसेच्या रडारवर; केली मोठी मागणी

‘भोला’च्या संपूर्ण टीमला किती मिळालं मानधन?

मुख्य भूमिका साकारणाऱ्या अजय देवगनने 30 कोटी रूपये सर्वाधिक मानधन घेतलं आहे. तर, तब्बूने 4 कोटी रूपये मानधन घेतले आहे. व्हीलनच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिषेकने एक कोटी रूपये रक्कम आकारली आहे. अभिनेत्री अमाला पॉलने 25 लाख रूपये मानधन घेतलं आहे. तसेच, संजय मिश्रांनी 85 लाख, दीपक डोबारियालने 65 लाख, मकरंद देशपांडेने 35 लाख आणि किरण कुमारने 15 लाख रूपये मानधन घेतले आहे.

Advertisement

छत्रपती संभाजीनगर हिंसाचार : रात्री बारा ते दुपारी बारा, काय-काय घडलं?

अजयने या चित्रपटाविषयी सांगितलं की, ‘हा चित्रपट मोठ्या प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आला आहे. ज्यामध्ये भरपूर अॅक्शन आहे. आम्ही या चित्रपटात जी क्रिएटीव्हीटी केली आहे, ती लोकांनी फारशी पाहिली असेल असं मला तरी वाटत नाही.’ अजयने पुढे हे ही उघड केलं की, चित्रपटाची कथा तशीच ठेवण्यात आली आहे, परंतु बरीच पात्रे आणि स्क्रिप्टचे काही भाग बदलले आहेत.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज