For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

"जय जय महाराष्ट्र माझा..." महाराष्ट्राला मिळालं नवं राज्यगीत

04:53 PM Jan 31, 2023 IST | मुंबई तक
 जय जय महाराष्ट्र माझा     महाराष्ट्राला मिळालं नवं राज्यगीत
Advertisement

Jai Jai Maharashtra Maja song by shahir Sable: मुंबई: ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या (Jai Jai Maharashtra Maja) गीताला महाराष्ट्राचं (Maharashtra) राज्यगीत म्हणून मान्यता मिळाली आहे. मंगळवार (३१ जानेवारी) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे (Shivaji Maharaj Jayanti) औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून हे गीत अंगिकारण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची घोषणा केली होती. (Jai Jai Maharashtra Maja declare as the state anthem of Maharashtra)

Advertisement Whatsapp share

‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणं स्वर्गीय शाहीर साबळे यांनी गायलं होतं. तर या गाण्याचे गीतकार राजा बढे हे आहेत. हे गाणं सुप्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खळेंनी संगीतबद्ध केलेलं. प्रेरणागीत, स्फूर्तीगीत म्हणून या गाण्याची ओळख असून संयुक्त महाराष्ट्र चळवळीत या गीताने स्फूरण भरलं होतं. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणला तेव्हा व्यासपीठावर हेच गाणं वाजविण्यात आलं होतं.

Advertisement

shiv sena symbol : ठाकरेंचा निवडणूक आयोगावर, तर शिंदेंचा राऊतांवर ठपका

Advertisement सब्सक्राइब करा

राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यविभागाने राज्यगीताचा विचार सुरु केला होता. यासाठी ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ या गीतासह “बहु असोत सुंदर संपन्न की महान” आणि “मंगल देशा, पवित्र देशा” या गाण्यांचाही विचार झाला होता. यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आली होती. अखेर ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ या गीतावर राज्यगीत म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आलं.

दरम्यान, देशाचं राष्ट्रगीत हे ५२ सेकंदाचं आहे. तर ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ हे राज्यगीत १.१५ ते १.३० मिनिटांत बसेल असे नियोजन केले जात आहे. मात्र, या गीतामधील मूळ शब्द बदलले जाणार नसल्याचं आश्वासन सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे. आता हे गीत प्रत्येक सरकारी कार्यक्रमांच्या सुरुवातीला गायले जाणार असून राष्ट्रगीताने कार्यक्रमांची सांगता होणार आहे. यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना फोनवर बोलताना “हॅलो…ऐवजी वंदे मातरम” बोलण्याची घोषणा केली होती.

Advertisement

MPSC : परीक्षार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश; CM शिंदेंची आयोगाला विनंती

दरम्यान, शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट येत्या २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याआधीच शाहिरांचं गीत ‘महाराष्ट्राचं राज्यगीत’ म्हणून घोषित करण्यात आलं आहे. हा निर्णय एकप्रकारे शाहीर साबळेंना महाराष्ट्र सरकारने वाहिलेली आदरांजली म्हणूनही पाहिलं जातं आहे.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज