For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Lucky Ali : ब्राम्हण-इब्राहिम वाद! लकी अलीला मागावी लागली माफी? काय आहे प्रकरण?

02:10 PM Apr 12, 2023 IST | मुंबई तक
lucky ali   ब्राम्हण इब्राहिम वाद  लकी अलीला मागावी लागली माफी  काय आहे प्रकरण
Advertisement

Lucky ali apologises : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक लकी अली (lucky Ali) त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील प्रसिद्ध आहे.अनेक मुद्यावर तो आपली स्पष्ट भूमिका मांडत असतो. अशीच भूमिका त्याने नुकतीच ‘ब्राम्हण’ (brahman) या शब्दाबाबत मांडली होती.’ब्राम्हण’ नाव ‘इब्राहिम’मधून आल्याचे मत त्याने सोशल मीडियावर मांडले होते. या त्याच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर एकच वाद पेटला आहे. या वादानंतर त्याने पुन्हा एकदा पोस्ट करून हिंदू बंदु-भगिणींची माफी मागितली आहे. दरम्यान नेमकं लकी अली असे काय म्हणालाय, ज्यामुळे मोठा वाद पेटलाय? हे जाणून घेऊय़ात. (lucky ali apologises for controversial brahman abram bollywood singer)

Advertisement Whatsapp share

लकी अलीच्या पोस्टमध्ये काय?

प्रसिद्ध गायक लकी अली (lucky Ali) यांनी सोशल मीडियावर ‘ब्राम्हण’ या नावावरून एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, ‘ब्राम्हण नाव ब्रम्हा मधून आले आहे’, ‘जे अब्राम मधून घेण्यात आले आहे’,ते अब्राहम किंवा इब्राहिम मधून येते,असे त्यांनी सुरूवातीला म्हटले. ब्राम्हण म्हणजे इब्राहिम वंशाचे, अलैहिस्सलाम हे सर्व राष्ट्राचे जनक आहेत. मग प्रत्येकजण भांडण आणि वादविवाद का करतातय? असा सवाल त्यांनी या पोस्टमधून विचारला होता.रविवारी 9 एप्रिलला त्यांनी ही पोस्ट केली होती.

Advertisement

हे ही वाचा : ’30 एप्रिलला संपवून टाकनार’; सलमान खानला पुन्हा मिळाली जीवे मारण्याची धमकी

Advertisement सब्सक्राइब करा

लकी अलीचा माफिनामा

लकी अलीने (lucky Ali) ही पोस्ट शेअऱ करताच अनेक नागरीकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच या प्रकरणाचा वाद वाढताच लकी अली यांनी पोस्ट डिलीट केली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा पोस्ट करून हिंदू बंधु-भगिणींची माफी मागावी लागली होती. माझा उद्देश समाजात फुट पडलेल्या दोन वर्गांना एकत्र आणण्याचा होता. कोणताही राग अथवा त्रास द्यायचा नव्हता.मला कळुन चुकलंय की मी चुकीचा होतो.माझी पोस्ट चुकीच्या पद्धतीने समोर आली होती. मी आता कोणतीही पोस्ट करने त्यावेळेस अधिक जागरूक असेन,असे स्पष्टीकरण त्यांनी या प्रकरणावर दिले. तसेच माझ्या पोस्टचा अनेक हिंदू बंधू भगिनींना त्रास झाला. याबद्दल मला खेद वाटतो. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो, अशी पोस्ट करत त्यांनी माफी मागितली.

Advertisement

हे ही वाचा : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने कोर्टात का माफी मागितली? काय आहे प्रकरण?

‘सुनो’ अल्बममधून लकी अली यांनी हिंदी म्युझिक इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. ‘एक पल का जीना’, ‘तुम जानो ना हम’, ‘आ भी जा आ भी जा’, ‘अंजाना अंजानी’ यांसारखी सुपरहिट गाणी त्यांनी गायली आहेत. लकी अली (lucky Ali) यांचा म्युझिक इंडस्ट्रीत एक चाहता वर्ग आहे. सध्या लकी अली यांच्या वादग्रस्त पोस्टमुळे ते चर्चेत आले आहेत.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज