For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Bollywood: 'बॉलिवूडमध्ये सापापेक्षाही विषारी गँगस्टर्स', प्रियांकानंतर शेखर सुमनचे खळबळजनक आरोप

04:38 PM Apr 01, 2023 IST | मुंबई तक
bollywood   बॉलिवूडमध्ये सापापेक्षाही विषारी गँगस्टर्स   प्रियांकानंतर शेखर सुमनचे खळबळजनक आरोप
Advertisement

Shekhar Suman On Bollywood : बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्री म्हटलं की, आपसूकच सर्वांचे डोळे दिपावतात. बॉलिवूडमधील चित्रपट आणि कलाकारांची चर्चा ही नेहमीच सुरू असते. पण ग्लॅमरने परिपूर्ण असलेल्या या इंडस्ट्रीत अगदी दिसतं तसं नसतं.. हेही आपल्याला माहित असेलच. बॉलिवूडमध्ये असे काही लोकं आहेत की, ज्यांच्यामुळे अनेकांचे करिअर संपलं. सध्या एकामागोमाग एक सेलिब्रिटी बॉलिवूडमधील (Bollywood Celebrity) एकाधिकारशाही विरोधात आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. त्यांच्याकडून करण्यात येत असलेले खुलासे धक्कादायक आहेत. (Mafia in Bollywood is more venomous than snakes Shekhar Suman’s sensational allegation on Bollywood)

Advertisement Whatsapp share

काही दिवसांपूर्वी देसी गर्ल प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) सिनेसृष्टीचं गुपित उघड केलं होतं. तिच्या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. प्रियांका म्हणाली होती की, बॉलिवूडमध्ये तिला मागे खेचण्याचा प्रयत्न केला जात होता. राजकारण केले जात होते. यानंतर आता अनेक स्टार्स तिला सपोर्ट करत आहेत आणि तेही त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगत आहेत. अशातच प्रसिद्ध अभिनेता शेखर सुमन (Shekhar Suman) यानेही आता बॉलिवूडमधील एकाधिकारशाहीविरोधात आपला आवाज उठवला आहे.

Advertisement

तृतीयपंथी प्रियावरील प्रेम ठरलं जीवघेणं; हिंगोलीत तरुणाच्या हत्येनं खळबळ

शेखर सुमनने केली बॉलिवूड गँगची केली पोलखोल, ट्वीटमुळे उडाली खळबळ

आपल्या दमदार अभिनयातून अनेक चित्रपटांसह मालिकांमध्ये काम करणारा अभिनेता शेखर सुमन याने नुकतंच एक ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये त्याने नाव न घेता हल्लाबोल केला आहे. ‘मला इंडस्ट्रीतील जवळपास 4 लोक माहित आहेत ज्यांनी मला आणि माझ्या मुलाला (अध्ययन) अनेक प्रोजेक्ट्समधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. मी खरंच सांगतो या ‘माफियांच्या’ आत माणुसकी नाही आणि हे लोक सापापेक्षाही विषारी आहेत. माझा फक्त एकाच गोष्टीवर विश्वास आहे की, तुम्ही सत्यापासून पळ काढू शकत नाही. तुम्ही नक्कीच इतरांसाठी समस्या निर्माण करू शकता, पण त्यांना यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही.’ असे ट्वीट शेखर सुमनने केले आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

‘लोकांनी धर्माच्या भांगेच्या नशेत मतदान करावे हे कारस्थान’, भाजपवर जहरी टीका

शेखर सुमन यांना मिळाला चाहत्यांचा सपोर्ट!

सध्या शेखर सुमन यांचे ट्वीट प्रचंड व्हायरल होत आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, ‘आपल्याला त्या लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे जे आपले शत्रू आहेत किंवा ते आपल्यासाठी घातक आहेत.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिलं, ‘तुमचा मुलगा एक चांगला अभिनेता आहे. तो वेब सीरीजसाठी प्रयत्न करू शकतो. त्याच्याकडे अभिनय कौशल्य आहेत. वेब सीरीज हा असा भाग आहे, जिथे तुम्ही स्वतःच्या कौशल्याची पारख करू शकता.’

शेखर आणि अध्ययन यांचे प्रोजेक्ट

शेखर सुमन शेवटचा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 16’ मध्ये दिसला होता. तो प्रत्येक वीकेंडला स्पर्धकांना शाब्दिक गुदगुल्या करायचा. अनेकवेळा तो स्पर्धकांची मिमिक्री करतानाही दिसला. घरात उपस्थित असलेल्या प्रत्येकालाही तो आणि त्याची परफेक्ट कॉमिक टाइमिंग आवडायची. दुसरीकडे, मुलगा अध्ययन सुमनबद्दल बोलायचे झाले तर, तो शेवटचा ‘डॅमेज्ड 2’ चित्रपटात दिसला होता. 2008 मध्ये त्याने ‘हल-ए-दिल’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर 2009 मध्ये तो ‘राज : द मिस्ट्री कंटिन्यूज’ या चित्रपटात दिसला होता.

Advertisement

‘…मुसेवाला टाइप करुन टाकेन’, संजय राऊतांना लॉरेन्स टोळीकडून जीवे मारण्याची धमकी

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज