For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

कधी चोर.. कधी वेटरची भूमिका साकरणारा नवाजुद्दीन सिद्दीकी आज घेतो कोट्यवधी रुपये, पण नेहमी अडकतो वादात

05:06 PM May 19, 2023 IST | मुंबई तक
कधी चोर   कधी वेटरची भूमिका साकरणारा नवाजुद्दीन सिद्दीकी आज घेतो कोट्यवधी रुपये  पण नेहमी अडकतो वादात
Advertisement

Nawazuddin Siddiqui Birthday : हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने सर्वांचं भरभरून मनोरंजन करणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) सर्वांच्याच आवडीचा. 49 वर्षीय नवाजुद्दीनचा जन्म 19 मे 1974 रोजी उत्तर प्रदेशातील बुढाना या छोट्याशा गावात झाला. सध्या तो त्याच्या आगामी ‘जोगिरा सारा रा रा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. एक काळ असा होता की जेव्हा इंटिमेट सीन्सचा विषय यायचा तेव्हा अभिनेत्री त्याच्यासोबत काम करण्यास नकार द्यायच्या. पण आता त्याच्यासोबत काम करण्यासाठी अभिनेत्री इच्छुक असतात. नवाजुद्दीन गेल्या अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीचा एक भाग आहे. पण त्याला प्रसिद्धी फार उशिरा मिळाली. (Nawazuddin Siddiqui Birthday started his career with small roles in Movies)

Advertisement Whatsapp share

नवाजने अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या. काही चित्रपटांमध्ये तो चोर, तर काहींमध्ये वेटर म्हणून दिसला. त्याने वर्षानुवर्षे कठोर परिश्रम करून बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. नवाजुद्दीन आज (19 मे) ४९ वर्षांचा झाला आहे. यामुळे आज आपण त्याच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

Advertisement

Sushma Andhare: उद्धव ठाकरेंची भेट झाली असती, तर…; आप्पासाहेब जाधवांचे गंभीर आरोप

छोट्या भूमिका साकारत करिअरला केली सुरूवात, फार उशिरा मिळाली प्रसिद्धी!

नवाजुद्दीन ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘मंटो’ आणि ‘बदलापूर’ यांसारख्या चित्रपटांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला. आज त्यांच्या नावावर असे अनेक चित्रपट आहेत, ज्यात त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. पण एक काळ असा होता जेव्हा त्याने आमिर खान, संजय दत्त आणि अभय देओलसारख्या अभिनेत्यांच्या चित्रपटात काम केले. या स्टार्सच्या चित्रपटांमधील त्याची भूमिका खूपच लहान होती.

Advertisement सब्सक्राइब करा

नवाजुद्दीन सिद्दीकीने पहिल्यांदा ‘सरफोर्स’ चित्रपटात काम केले होते. आमिर खानच्या या प्रसिद्ध चित्रपटात नवाजुद्दीनने गुन्हेगाराची भूमिका साकारली होती. यात त्याची भूमिका छोटी होती. यानंतर तो ‘शूल’ चित्रपटात वेटरच्या भूमिकेत दिसला होता. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मध्ये त्याने मारहाण झालेल्या व्यक्तीची भूमिका साकारली होती.

Maharashtra Politics : मुंबईतल्या जागांवरुन मविआत वादाची ठिणकी

आलिशान बंगला, कार कलेक्शन नवाजुद्दीनचं कोट्यवधींचं नेटवर्थ!

नवाजुद्दीन सिद्दीकी जेव्हा मुंबईत आला तेव्हा त्याला इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. त्याने मोठ्या-मोठ्या चित्रपटांमध्ये अनेक छोट्या भूमिका साकारल्या.पण, आता हे चित्र पालटलंय. त्याचा काळ पूर्णपणे बदलला असून नवाजुद्दीन आज कोट्यवधींचा मालक बनला आहे. गेल्या वर्षीच त्याने मुंबईतील त्याच्या आलिशान बंगल्याचे फोटो शेअर केले होते. त्याच् याया आलिशान बंगल्याची किंमत 12 कोटींहून अधिक आहे.

Advertisement

आजच्या काळात चित्रपटातील एका छोट्या व्यक्तिरेखेपासून सुरुवात करणारा नवाजुद्दीन सिद्दीकी वेब सीरिज आणि चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर यशस्वी करण्याची जबाबदारी घेताना दिसतो. तो ज्या चित्रपटात असतो तिथे कुणाला चिंताच नसते. नवाजुद्दीनकडे मुंबईत केवळ आलिशान बंगलाच नाहीये तर अनेक आलिशान कार्सचे कलेक्शनही आहे. त्याच्याकडे मर्सिडीज बेंझ, बीएमडब्ल्यू आणि ऑडी सारख्या अनेक आलिशान कार आहेत. ज्याची किंमत सुमारे 4.5 कोटी आहे. याशिवाय नवाजुद्दीन जाहिरात शूटमधूनही चांगली कमाई करतो.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात मोठा गौप्यस्फोट, शाहरुख खान-समीर वानखेडेंचं WhatsApp चॅट जसंच्या तसं…

वैयक्तिक आयुष्यामुळे सापडला वादात…

नवाजुद्दीनचं सिनेसृष्टीत कौतुक होत असलं तरी त्याला वैयक्तिक आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो. त्याची एक्स पत्नी आलियापासून घटस्फोट घेतल्याची बरीच चर्चा होती. यानंतर आलियाने त्याच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप केले. याशिवाय नवाजच्या कुटुंबीयांनी तिला अनेक दिवस खोलीत कोंडून ठेवले आणि टॉयलेटचा वापरही करू दिला नाही, असा आरोपही आलियाने केला होता. दरम्यान, त्याचा भाऊही त्याच्या विरोधात होता. नवाजच्या भावाने त्याला आईला भेटण्यापासून रोखले. या सर्व गोष्टींना कंटाळून नवाजुद्दीनने एक्स पत्नी आणि भावाविरुद्ध १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला.

 

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज