For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

AAP : राघव चढ्ढा-परिणीती चोप्राची लग्न जमलं? आप खासदाराने दिल्या शुभेच्छा

03:32 PM Mar 28, 2023 IST | मुंबई तक
aap   राघव चढ्ढा परिणीती चोप्राची लग्न जमलं  आप खासदाराने दिल्या शुभेच्छा
Advertisement

Parineeti chopra Raghav Chadha dating rumours : बॉलिवूडला गेल्या काही महिन्यांपासून लगीनघाई लागली आहे. अनेक अभिनेता- अभिनेत्री लग्नबंधनात अडकतायत. नुकतंच अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा लग्नबंधनात अडकले होते. या लग्नानंतर आता सिद्धार्थ मल्होत्राची को स्टार परिणीती चोप्राचं लग्न जमल्याची चर्चा सुरु झाली आहे. आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) सोबत परिणीत चोप्राचं (Parineeti chopra)लग्न जमल्याची चर्चा आहे. यावर आपचे खासदार संजीव अरोरा (Sanjeev Arora) यांनी शुभेच्छांचं ट्विट केल्यानंतर या चर्चांना उधाण आले आहे.(parineeti chopra and raghav chadha relationship rumours aap mp sanjeev arora congratulates)

Advertisement Whatsapp share

गेल्या काही दिवसांपासून परिणीती चोप्रा (Parineeti chopra) आणि खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आले होते. या दरम्यानचे दोघांचे फोटो व्हायरल झाले होते. या फोटोनंतर सोशल मीडियावर दोघांच्या नात्यांची चर्चा सुरु झाली होती. या चर्चा सुरु असतानाच आपचे खासदार संजीव अरोरा (Sanjeev Arora) यांनी ट्विट करून दोघांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटनंतर राघव चढ्ढा आणि परिणीत चोप्राचं लग्न जमल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Advertisement

हे ही वाचा : मी बॉलिवूड सोडणार होते, कारण…; प्रियांका चोप्राच्या खुलाशाने खळबळ

ट्विटमध्ये काय?

परिणीती चोप्रा (Parineeti chopra) आणि राघव चढ्ढा (Raghav Chadha) या दोघांचा फोटो संजीव अरोरा यांनी ट्विट केला होता. या फोटोला राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्राला हार्दीक शुभेच्छा देतो, असे कॅप्शन लिहत, मी आशा करतो की दोघांच आयुष्य प्रेम आणि आनंदाने भरून असाव. माझ्या हार्दीक शुभेच्छा असे ट्विट संजीव अरोरा यांनी केले आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

मुंबईत झाले स्पॉट

परिणीती चोप्रा (Parineeti chopra) आणि राघव चढ्ढा (Raghav Chadha) काही दिवसांपुर्वीच मुंबईत स्पॉट झाले होते.यावेळी दोघांनी एकत्र डिनर डेट केली होती.या दरम्यान ते मीडियाच्या कॅमेरात कैद झाले होते.त्यानंतर त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या नात्यांची चर्चा सुरु झाली होती. मात्र या चर्चेवर अद्याप दोघांनीही मौन सोडले नाही.

हे ही वाचा : आधी लंच, डेट मग डिनर डेट; राघव-परिणीतीची जुळली केमिस्ट्री?

ब्रिटनमध्ये एकत्र शिक्षक

राघव चढ्ढा (Raghav Chadha) आणि परिणीती चोप्रा (Parineeti chopra)बद्दल बोलायचं झालं तर दोघांनीही ब्रिटेनमध्ये शिक्षण घेतले आहे. ब्रिटनमधलं शिक्षण पुर्ण झाल्यानंतर परिणीती चोप्राने बॉलिवूडमध्ये करिअर केलं.ती आता बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. तर राघव चढ्ढा यांनी राजकारणाला करिअर म्हणून निवडलं. राघव आम आदमी पक्षाचे खासदार आहेत.

दरम्यान राघव चढ्ढा (Raghav Chadha) आणि परिणीती चोप्रा Parineeti chopra)यांच्या नात्याची चर्चा सुरु असताना संजीव अरोरा यांनी ट्विट करून शुभेच्छा दिल्यानंतर त्यांच लग्न जमल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.मात्र दोघांनीही अद्याप यावर अधिकृतपणे घोषणा केली नाही. त्यामुळे ही निव्वळ चर्चा असल्याचे बोलले जात आहे.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज