For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

कोण आहे पूजा ददलानी? जिने आर्यन खानला वाचवण्यासाठी घेतली होती खूप मेहनत..

04:30 PM May 17, 2023 IST | मुंबई तक
कोण आहे पूजा ददलानी  जिने आर्यन खानला वाचवण्यासाठी घेतली होती खूप मेहनत
कोण आहे पूजा ददलानी? जिने आर्यन खानला वाचवण्यासाठी घेतली होती खूप मेहनत..
Advertisement

Pooja Dadlani: भारतीय गानकोकिळा अशी ओळख असणाऱ्या लता मंगेशकर यांचे 6 फेब्रुवारी 2022 मध्ये निधन झाले. यावेळी अनेक दिग्गज कलाकार मुंबईतील शिवाजी पार्क येथे उपस्थित होते. याठिकाणी लता दीदींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशातील आणि जगातील तमाम जनता पोहोचली होती. यावेळी शाहरुख खानही (Shah Rukh Khan) पोहोचला होता. शाहरुखने लता दीदींच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी इस्लाम धर्माप्रमाणे हात जोडून प्रार्थना केली आणि पार्थिवावर फुंकर मारली. पण त्याला जातीय वळण देण्याचा प्रयत्न केला गेला. शाहरुख त्यावेळी थुंकला असल्याचं म्हटलं गेलं. याचवेळी शाहरुखसोबत एक महिला हात जोडून उभी असल्याचं दिसून आलं ही तीच महिला होती जी आर्यन खान प्रकरणात सर्वाधिक चर्चेत होती.. ती म्हणजे पूजा ददलानी (Pooja Dadlani) होती. (Pooja Dadlani, Shah Rukh Khan’s manager, worked hard to save Aryan Khan from the drug case)

Advertisement Whatsapp share

 

Advertisement

View this post on Instagram

 

Advertisement सब्सक्राइब करा

A post shared by Pooja Dadlani Gurnani (@poojadadlani02)

Advertisement

पूजा ही शाहरूखची मॅनेजर आहे. ती शाहरुखच्या PR पासून त्याच्या व्यस्त तारखा आणि कार्यक्रम सर्व पाहाते. पूजा ददलानीचे नाव आर्यन खान प्रकरणामुळेही बरचसं चर्चेत आलं. कारण मिळालेल्या माहितीनुसार, पूजाने त्याला सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते.

Crime: नवऱ्याच्या हत्येनंतर बायकोची ग्रॅंड पार्टी, अन्…

पूजा ददलानी कोण आहे? सविस्तर वाचा..

पूजा 2012 पासून शाहरुख खानची मॅनेजर आहे. शाहरुखचा वाढदिवस २ नोव्हेंबरला आहे. पूजा ददलानीचा वाढदिवसही याच दिवशी येतो. तिचा जन्म 2 नोव्हेंबर 1983 रोजी मुंबईत झाला. तिचे शालेय शिक्षण मुंबईतील बाई आवाबाई फ्रामजी पेटिट गर्ल्स हायस्कूल आणि एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून झाले. तिने मास कम्युनिकेशनमधून पदवी घेतली आहे. पूजाने 2008 मध्ये हितेश गुरनानीसोबत लग्न केले. हितेश हा व्यावसायिक आहे. तो लिस्टा ज्युल्स नावाच्या कंपनीचा संचालक आहे. त्यांना रेना नावाची मुलगीही आहे.

Rahul Narvekar : कट्टर शिवसैनिक राहिलेल्या नार्वेकरांनी किती पक्ष बदलले?

पूजा शाहरूखसाठी काम करते. चित्रपट मिळवून देण्यापासून ते त्याच्या मानधनापर्यंत ती सर्व काही सांभाळते. शाहरुखच्या चित्रपटांपासून ते रेड चिलीज एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन कंपनीपर्यंत पूजा सर्व गोष्टी हाताळते. याशिवाय आयपीएल टीम केकेआरही पूजा सांभाळते. म्हणजे पूजा ही केवळ शाहरुखची वैयक्तिक मॅनेजर नाहीये, तर ती त्याची इतर कामेही पाहते.

आर्यन खान प्रकरणात पूजाची महत्त्वाची भूमिका

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ऑक्टोबर 2021 मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली होती. 2022 मध्ये एनसीबीला तपासात आढळून आले की आर्यनकडून कोणतेही ड्रग्स जप्त करण्यात आले नव्हते. परंतु, हे प्रकरण सुरू असताना पूजा आर्यनला भेटण्यासाठी एनसीबी कार्यालयात आणि न्यायालयात सतत यायची.

या प्रकरणामुळे पूजा ददलानी बरीच चर्चेत आली. यावेळी आर्यन खानला या संपूर्ण प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी पूजाने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचा खास व्यक्ती किरण गोसावीला 50 लाख रुपये दिले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन तुरुंगात जाऊ नये म्हणून गोसावी आणि पूजा यांच्यात करार झाला होता. आर्यनला सोडण्याची किंमत 25 कोटी मागण्यात आली होती, पण नंतर 18 कोटींवर डील फायनल झाली. गोसावीने पूजाकडून 50 लाख टोकन पैसे घेतले होते. आर्यन खानला तुरुंगात जाऊ देणार नाही असा करार झाला होता. पण असे झाले नाही. त्यामुळे गोसावी यांना पैसे परत करावे लागले. गोसावी यांनी 50 लाखांपैकी 38 लाख परत केले.

jaya kishori fees : जया किशोरींची कमाई किती? कार्यक्रमाची फी आहे लाखो रुपये

आता हे पैसे समीर वानखेडे यांच्यापर्यंत पोहोचले आहेत, आता ते परत करता येणार नाही, असे सांगून 12 लाख परत केले नाहीत. यापूर्वी या करारात समीर वानखेडेची कोणतीही भूमिका सांगण्यात आली नव्हती. या संपूर्ण प्रकरणात पूजा ददलानी मुख्य लक्ष होती. ती अनेक भूमिकांमध्ये दिसली. यासाठी पूजा ददलानीचे कौतुकही केले जाते.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज