Pushpa 2 Teaser Released :पुष्पा 2 चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, फॅन्सची उत्सुकता शिगेला
Pushpa 2 Teaser Released :साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu arjun) बहुप्रतिक्षित पुष्पा द रूलचा (pushpa the rule) ट्रेलर आज रिलीज करण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहून पुन्हा एकदा फॅन्स पुष्पाचे दिवाने झाले आहेत. तसेच ट्रेलर रिलीज होताच त्याला भन्नाट रिस्पॉन्स आला आहे. विशेष म्हणजे अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी हा ट्रेलर लॉंच झाल्याने फॅन्सना मोठे गिफ्ट मिळाले आहे. हा ट्रेलर पाहून फॅन्सना सिनेमाची उत्सुकता लागली आहे. (pushpa 2 trailer released watch allu arjun pushpa full trailer where is pushpa pushpa the rule )
2021 ला पुष्पा (pushpa) सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकाने अक्षरश डोक्यावर उचलून धरले होते. इतका प्रेक्षकांना हा सिनेमा आवडला होता. त्यानंतर या सिनेमाचा दुसरा सीझन येणार असल्याची चर्चा होती.तेव्हापासून फॅन्सना या पुष्पा 2 ची उत्सुकता होती. अखेर फॅन्सचीही प्रतिक्षा संपली आहे, कारण पुष्पा 2 चा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. 3 मिनिट 14 सेकंदाचा ट्रेलर रीलीज होताच त्याला सुरुवातीच्य़ा अर्ध्या तासात भरघोस प्रतिसाद मिळाला होता. साधारण 4.32 लाख व्यूज आणि 87 हजार लाईक्स या व्हिडिओला आले होते.
हे ही वाचा : TIME100 रीडर पोल : शाहरुख खान ठरला ‘बादशाह’; दिग्गजांना कसं टाकलं मागे?
ट्रेलरमध्ये काय?
पुष्पा द रूलचा (pushpa the rule) ट्रेलरमध्ये Where is Pushpa? असा प्रश्न विचारण्यात येतो. मीडियापासून सामान्य नागरीक हाच प्रश्न विचारत आहेत. पुष्पा तिरूपती जेलमधून फरार झाल्याचेही मीडियावाले बोलतात. तसेच त्याला गोळ्या लागल्याचे ट्रेलरमध्ये म्हटले आहे. पण नंतर तो विदेशातील अनेक देशात असल्याचे मीडिय़ातूनही बोलले जाते. पण नंतर एका जंगलातील कॅमेरातच तो कैद होतो. हा सर्व व्हिडिओ न्युज चॅनेलवर दाखवण्यात येतो. पुष्पा परत आल्याचे पाहून नागरीक आनंदी होतात, असे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.
‘PUSHPA’ IS BACK: FANTASTIC INTRO TO ‘PUSHPA 2’ – *HINDI* VIDEO… A day before #AlluArjun’s birthday, Team #Pushpa2 unveils a unique video, a smart strategy that only doubles the excitement for the much-awaited film… HINDI video…#WhereIsPushpa?#Pushpa2TheRule… pic.twitter.com/L93FAVlabH
— taran adarsh (@taran_adarsh) April 7, 2023
Advertisement
दिग्दर्शक सुकुमारने पुष्पा द राईज (pushpa) हा सिनेमा 2021 ला कोविड दरम्यान रीलीज केला होता. या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर बक्कळ कमाई केली होती. या सिनेमाची हिंदी वर्जनने 100 करोडचा बिझनेस केला होता. तर वर्ल्डवाईड या सिनेमाने 350 करोडचा गल्ला जमवला होता. पुष्पा पार्ट 1 प्रमाणेच पार्ट 2 देखील धमाकेदार असणार आहे.हे ट्रेलर पाहून समजते आहे. त्यामुळे पुष्पा द राईज प्रमाणेच पुष्पा द रूल बॉक्स ऑफीसवर रुल करेल अशी अपेक्षा मेकर्स करत आहेत.