For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Political Crisis: बंद दाराआड दोघांची मुंबईत भेट, सुप्रीम निकालाआधी धाकधूक

06:37 PM May 04, 2023 IST | मुंबई तक
political crisis  बंद दाराआड दोघांची मुंबईत भेट  सुप्रीम निकालाआधी धाकधूक
Advertisement

मुंबई: सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निकालाच्या तोंडावर बंद दाराआडची एक भेट समोर आली आहे. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. संपूर्ण देशाचं लक्ष निकालाकडे लागलेलं असतानाच झालेल्या या भेटीनं ठाकरेंची धाकधूक वाढली आहे. यावर उद्धव ठाकरेंनी आपल्या स्टाईलमध्ये प्रतिक्रियाही दिली. मुंबईत बंद दाराआड कोणाची भेट झाली, या भेटीचं सुप्रीम कोर्टाच्या निकालाशी कनेक्शन काय आणि ठाकरेंचं म्हणणं काय हेच आपण सविस्तर जाणून घेऊया. (rahul narvekar and kiren rijiju meeting behind closed doors in mumbai increased fear before supreme verdict)

Advertisement Whatsapp share

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठापुढे मॅरेथॉन सुनावणी झाली. 15 मे आधी निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदल, बंडाची चर्चा सुरू असतानाच आता एक नवा ट्विस्ट आला आहे.

Advertisement

राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट?

केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची भेट घेतली. विधानभवनात बंद दाराआड दोघांमध्ये ही भेट झाली. सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे काय-काय कायदेशीर पडसाद उमटू शकतात, सरकार टिकवण्यासाठी काय करता येईल, अशा वेगवेगळ्या घटनात्मक कंगोऱ्यांबद्दल दोघांमध्ये चर्चा झाल्याचं सुत्रांचं म्हणणं आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

हे ही वाचा >> NCP: शरद पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहणार, राजीनाम्याच्या निर्णयावर यू-टर्न?

सुप्रीम कोर्टानं 16 आमदारांना अपात्र करण्याचा आदेश दिला, तर सत्ता राखण्यासाठी सरकारपुढे कोणते कायदेशीर पर्याय आहेत, याबद्दलही दोघांमध्ये खल झाल्याचं म्हटलं जात आहे. रिजिजू आणि नार्वेकर यांच्यातल्या या भेटीनं ठाकरे गटाची मात्र धाकधूक वाढली आहे. स्वतः उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत याबद्दल भाष्य केलं. बिहार विधान परिषदेचे सभापती देवेशचंद्र ठाकूर यांनी मातोश्रीवर भेट घेतली. या भेटीचाच संदर्भ देत ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

ठाकरेंनी रिजिजू आणि नार्वेकरांच्या बंद दाराआडील चर्चेचं कनेक्शन थेट सुप्रीम कोर्टाच्या निकालाशी जोडलं. दुसरीकडे नार्वेकरांनी रिजिजूंसोबतच्या भेटीला दुजोरा दिला. मुंबई Tak सोबत बोलताना ते म्हणाले, किरेन रिजिजू एका कार्यक्रमासाठी मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यामुळे त्यांना मी चहापानासाठी बोलावलं होतं. दोघांमध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही, असं स्पष्टीकरणही नार्वेकरांनी दिलं.

Advertisement

हे ही वाचा >> शिर्डी हादरलं! सख्ख्या भावानेच केली अल्पवयीन बहिणीची निर्घृण हत्या

नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाच्या संभाव्य निकालाबद्दल रिजिजूंशी चर्चा झाली नसल्याचा दावा केला. पण ठाकरेंनी भेटीचं कनेक्शन थेट निकालाशी जोडलं. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज