For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Ruchismita Guru : आकांक्षानंतर आणखीण एका अभिनेत्रीची आत्महत्या,गूढ अवस्थेत सापडला मृतदेह

06:09 PM Mar 28, 2023 IST | मुंबई तक
ruchismita guru   आकांक्षानंतर आणखीण एका अभिनेत्रीची आत्महत्या गूढ अवस्थेत सापडला मृतदेह
Advertisement

odia actress singer ruchismita guru commits suicide : भोजपुरीतली अभिनेत्री आकांक्षा दुबे (akanksha dubey) हीच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच आता आणखीण एका प्रसिद्ध अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. रुचिस्मिता गूरू (ruchismita guru)असे या अभिनेत्रींचे नाव आहे. नातेवाईकांच्या घरी तिचा मृतदेह सापडला आहे. आत्महत्येमागचं कारण अद्याप कळु शकले नाही आहे. या घटनेने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. या घटनेचा पोलीस तपास करतायत.(ruchismita guru odia actress commits suicide after bhojpuri actor akanksha dubey)

Advertisement Whatsapp share

ओडिसाची अभिनेत्री रुचिस्मिता गूरूने (ruchismita guru)आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. रुचिस्मिताचा मृतदेह तिच्या नातेवाईकांच्या घरी गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले असून तपास सूरू आहे. पोलिसांनी अभिनेत्रीचा मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.आता या पोस्टमार्टम अहवालातून मृत्यूचे कारण काय समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

हे ही वाचा : Akanksha Dubey आत्महत्या प्रकरणात नवा ट्वि्स्ट, दिग्गज अभिनेत्यावर हत्येचा आरोप

रुचिस्मिता गूरू (ruchismita guru) ही बलांगिर शहराच्या तलपालीपाडाची रहिवाशी आहे. रुचिस्मिता ही सुडापाडाच्या तिच्या मामाच्या घरी राहायची. तिने अनेक अल्बममध्ये अभिनय केला आहे. तसेच ती एक प्रसिद्ध गायिका म्हणूनही ओळखली जाते. तिने अनेक स्टेश शोज देखील केले आहेत.

Advertisement सब्सक्राइब करा

दरम्यान रुचिस्मिता गूरूने (ruchismita guru) नेमकी का आत्महत्या केली आहे, याचे कारण समजू शकले नाही आहे. मात्र स्थानिक नागरीकांनी दिलेल्या माहितीनूसार त्यांच्या कुटूंबियामध्ये मोठा वाद होता. ज्या कारणामुळे तिने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. तसेच तिच्या कुटुंबियांनी तिचे डोळे दान केले होते.बलांगीर भीमा भोई मेडिकल कॉलेजमध्ये तिचे डोळे दान केले होते. या प्रकरणात अभिनेत्रीच्या आत्महत्येमागचं असं ठोस कारण समोर आले नाही आहे. त्यामुळे आता पोस्टमार्टम अहवालातून काय समोर येते, हे पाहावे लागणार आहे.

हे ही वाचा : राघव चढ्ढा-परिणीती चोप्राची लग्न जमलं? आप खासदाराने दिल्या शुभेच्छा

रुचिस्मिता गूरूच्या (ruchismita guru) आधी भोजपूरीच्या आकांक्षा दुबेने (akanksha dubey) आत्महत्या केली होती. या प्रकरणात गायक समर सिंह आणि त्याचा भाऊ संजय सिंह यांनी माझ्या मुलीची हत्या केल्याचा आरोप आकांक्षा दुबे हिची आई मधु दुबे हिने केला होता. तसेच मधू दुबे यांनी सारनात पोलिस ठाण्यात दोन्ही तक्रार दाखल करून घेतली आहे. या तक्रारीनंतर आरोपात तथ्य आढळल्यास त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Advertisement

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज