For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला अपघात, जखमी झाल्याने शूटिंग रद्द

07:26 PM Apr 12, 2023 IST | मुंबई तक
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला अपघात  जखमी झाल्याने शूटिंग रद्द
Advertisement

Sanjay dutt injured : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला (Sanjay dutt) अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. शूटिंग दरम्यान हा अपघात झाला होता. या अपघातात तो जखमी झाला आहे. या अपघातानंतर लगेचच त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. सध्या तो ठिक असून त्याने पुन्हा शूटिंगला सुरुवात केली आहे. या घटनेने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. (sanjay dutt injured while shooting bomb expolsion sequence kannada movie)

Advertisement Whatsapp share

संजय दत्त (Sanjay dutt injured) सध्या बंगळुरुत पॅन इंडिया फिल्म केडीची शूटिंग करत आहे. हे शूटिंग सीन करत असतानाच त्याला अपघात झाल्याची घटना घडली होती. मीडिया रिपोर्टनुसार त्याला गंभीर दुखापत झाली नाही आहे. किरकोळच दुखापत झाली आहे. या दुखापतीनंतर लगेचच सेटवर त्याच्यावर उपचार करण्यात आल्याची माहिती आहे. फर्स्ट एडद्वारे लगेचच त्याच्यावर उपचार करून शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.

Advertisement

हे ही वाचा : Lucky Ali : ब्राम्हण-इब्राहिम वाद! लकी अलीला मागावी लागली माफी? काय आहे प्रकरण?

सिनेमात अ‍ॅक्शन सीन शूट करत असताना संजय दत्तला (Sanjay dutt) अपघात झाला होता. हा खुप किरकोळ अपघात होता. संजू सर आता ठिक आहे. ते एक प्रोफेशनल कलाकार आहेत म्हणून त्यांनी शूटिंग सुद्धा सुरु केली आहे, अशा माहिती संजय दत्तच्या पीआर टीमने दिली आहे. काळजी करण्याच काहीच कारण नाही आहे. फिल्म सेटवर सर्व काही ठिक आहे. बंगळुरूच्या मगाडी रोडवर या सिनेमाची शूटिंग सुरु होती. या दरम्यान हा अपघात घडला होता.

Advertisement सब्सक्राइब करा

खरं तर सुरुवातीला संजय दत्तच्या (Sanjay dutt) हात, कोपरा आणि चेहऱ्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे फॅन्सना त्याची चिंता लागून राहिली होती.तसेच फॅन्स त्याच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना करत होते. मात्र आता त्याला किरकोळ दुखापत झाल्याची आणि यातून तो सावरल्याची माहिती मिळताच फॅन्सना दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचा : कचरा कुंडीत सापडलेल्या चिमुरडीला ‘या’ दिग्गज अभिनेत्याने दिले स्वत:चे नाव! आज ‘ती’ स्टायलिश अभिनेत्री

दरम्यान संजय दत्त (Sanjay dutt) आता केजीएफ 2 नंतर केंडी या सिनेमात विलनची भूमिका साकारणार आहे. या सिनेमात संजय दत्तचे अ‍ॅक्शन हिरो ध्रुव सरजा सोबत फाईट सीन्स असणार आहेत. नुकताच ध्रुव सरजाचा मार्टीनचा ट्रेलर रीलीज झाला होता. प्रेक्षकांचा तो पसंतीस उतरला होता.

Advertisement

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज