For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

न्यूड सीन करण्यापूर्वी रडलेली 'ही' अभिनेत्री रडली, आज जगतेय असे आयुष्य...

07:43 PM Apr 22, 2023 IST | मुंबई तक
न्यूड सीन करण्यापूर्वी रडलेली  ही  अभिनेत्री रडली  आज जगतेय असे आयुष्य
Advertisement

Bollywood : Sonam Khan : बॉलिवूडमध्ये (Bollywood) 90’s च्या दशकातील एक अभिनेत्री अशी जिची त्या काळात प्रचंड क्रेझ होती. पण एक काळ असा आला जेव्हा ती अचानक सिनेसृष्टीतून गायब झाली. या अभिनेत्रीचं नाव सोनम खान आहे. सोनमला लोक सोनम खान (Sonam Khan) या नावाने जरी ओळकत असले तरी तिचे खरे नाव मात्र ‘बख्तावर खान’ आहे. तिने वयाच्या 13 व्या वर्षी तिच्या करिअरची सुरुवात केली होती. तर, वयाच्या 19 व्या वर्षी तिचे लग्न झाले होते. लग्नानंतर लगेचच ती परदेशात गेली.

Advertisement Whatsapp share

अभिनेत्री सोनमने 1998 मध्ये यश चोप्रा यांच्या ‘विजय’ चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ‘त्रिदेव’, ‘मिट्टी आणि सोना’ अशा सुप्रसिद्ध चित्रपटांमध्ये तिने काम केले. या चित्रपटांनी तिला रातोरात स्टार बनवले आणि अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या होत्या. चित्रपटांमध्ये तिने बोल्डनेसची मर्यादा ओलांडली होती. पहिल्याच चित्रपटात सोनमने किसिंग सीन देऊन प्रेक्षकांना चकित केले होते. ९० च्या दशकात अशी दृश्ये देणारी ती एकमेव अभिनेत्री असल्याचे बोलले जाते. त्यावेळी सोनम फक्त 16-17 वर्षांची होती. पण 19 व्या वर्षी लग्न केल्यानंतर तिचे आयुष्य फार बदलले.

Advertisement

आप्पासाहेब धर्माधिकारींच्या श्री समर्थ बैठकीतील अधिष्ठान म्हणजे काय.. श्री सदस्यांना कसं मिळतं?

सोनमच्या करिअरची सुरुवात कशी झाली?

सुंदर डोळे, दाट केस, चेहऱ्यावर हसू आणि गोंडस चेहरा असलेली सोनम बिंदास गर्ल म्हणून ओळखली जात असे. तिने वयाच्या साडे तेराव्या वर्षी काम करायला सुरुवात केली होती. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. यामुळे बळजबरीने सोनमला काम करावे लागले. सोनमने एके दिवशी दुपारी तिची मावशी झीनत अमानला कामासाठी विनंती केली. कोणतेही छोटे काम करेन, मेहनत करेन पैसे कमवेल आणि घर चालवेल. असे ती म्हणाली होती. झीनतने त्याला काही मॉडेलिंग प्रोजेक्ट्स मिळवून दिले. सोनमने पैसे कमवायला सुरुवात केली होती. यानंतर तिने ऑडिशन दिले आणि पुन्हा मागे वळून पाहिले नाही.

Advertisement सब्सक्राइब करा

यश चोप्रांनी बदलले होते नाव

1988 मध्ये सोनमने ‘आखरी अदालत’ हा चित्रपट केला. त्यानंतर तिने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत जाण्याचा निर्णय घेतला. पण तिथे ती फार काळ राहिली नाही. यानंतर सोनमला यश चोप्रा यांनी ‘बख्तावर खान’ मधून सोनम बनवले होते. हे नाव यश चोप्रा यांनी तिला दिले आहे.

उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद कसं गेलं?, अजित पवारांनी सांगितली Inside Story

सोनमने दोन लग्न केले…

सोनमने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘जेव्हा ‘त्रिदेव’चे शूटिंग सुरू होते, तेव्हा ती एका व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्याचवेळी राजीव एका मुलीला डेट करत होता. दोघे फक्त सेटवरच बोलत होते. पण जसजसे दिवस सरत गेले तसतसे त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात होऊ झाले. त्यांच्या प्रेमाची चर्चा होऊ लागली. दोघांनी आपापल्या जोडीदारासोबत ब्रेकअप केले आणि एकत्र आले. दोघांनी 1991 मध्ये लग्न केले. त्यावेळी सोनम 19 वर्षांची होती. 19 वर्षीय सोनमला स्वतःचे घर बनवायचे होते, ते तिने केले. यश चोप्रांनी सोनमला लग्न करण्यास नेहमीच मनाई केली होती. तिचे करिअर खूप उज्ज्वल आहे हे यशला माहीत होते, त्यामुळे तो तिला लग्न करण्यापासून रोखत होता. पण तिने ऐकले नाही.’

Advertisement

लग्नाच्या 3 वर्षानंतर सोनम परदेशात शिफ्ट झाली. पहिल्यांदा अमेरिकेत आणि नंतर युरोपमध्ये ती स्थायिक झाली. परदेशात गेल्यानंतर पती राजीव आणि सोनम यांच्यातील अंतर वाढू लागले. सोनमने भारतात परतण्याचा आग्रह धरला आणि कामही केले, पण राजीवने तिला नकार दिला. राजीवसोबत लग्न करून तिने आयुष्यातील सर्वात मोठी चूक केल्याचे सोनमला नंतर समजले. पण मुलगा मोठा होईपर्यंत दोघं वेगळे झाले नाहीत. अखेर 2016 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. 50 वर्षांची सोनम आता दुसऱ्या पतीसोबत खूश आहे. 2017 मध्ये तिचे दुसरे लग्न झाले.

‘दंगली घडवायच्या…’, जितेंद्र आव्हाडाच्या विधानावर देवेंद्र फडणवीस संतापले

किसिंग आणि न्यूड सीन्स देणे सोनमला जायचं अवघड…

सोनमने ‘विजय’ चित्रपट केला तेव्हा ती 16 वर्षांची होती. यामध्ये सोनम ऋषी कपूरसोबत दिसली होती. दोघांमध्ये एक किसिंग सीन शूट करण्यात आला, ज्यापूर्वी सोनम घाबरली होती. ऋषी कपूरचे वय सोनमपेक्षा दुप्पट होते. सोनमने एका मुलाखतीत सांगितले की, ऋषीसोबतचा किसिंग सीन, तोही पहिल्याच डेब्यू चित्रपटात, तिच्यासाठी खूपच अस्वस्थ होता.

‘त्रिदेव’ चित्रपटासाठी सोनमने या चित्रपटात न्यूड सीन्स दिल्याचे बोलले जात आहे. त्याचे सीन पाहण्यासाठी लोक थिएटरमध्ये जायचे आणि सीन संपला की लगेच थिएटर्स रिकामी व्हायचे. पण न्यूड सीन देणं सोनमसाठी अजिबात सोपे नव्हते. सोनम म्हणाली होती, ‘जेव्हा मला समजले की मला चित्रपटात न्यूड सीन द्यायचे आहेत, तेव्हा हे जाणून मी खूप रडले. माझ्या मावशीला (झीनत अमान) सेटवर बोलावले होते. त्याने मला समजावले आणि चॉकलेट दिले आणि मी त्या चॉकलेटच्या लालसेपोटी न्यूड सीन करायला तयार झाले.’

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज