For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

उद्धव ठाकरेंचा साथीदार काळाने हिरावला! विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन

10:10 AM May 09, 2023 IST | भागवत हिरेकर
उद्धव ठाकरेंचा साथीदार काळाने हिरावला  विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन
मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते विश्वनाथ महाडेश्वर यांचं ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं.
Advertisement

Vishwanath Mahadeshwar Death : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. विश्वनाथ महाडेश्वर यांना मंगळवारी पहाटे 2 वाजता ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. महाडेश्वर यांच्या जाण्यामुळे ठाकरेंनी विश्वासू साथीदार गमावल्याची भावना राजकीय वर्तुळातून व्यक्त होतं आहे. (former Mayor of Mumbai and Senior Shiv Sena (UBT) leader Vishwanath Mahadeshwar passed away on Tuesday.)

Advertisement Whatsapp share

माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या निधनामुळे शिवसेनेतून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हळहळ व्यक्त होत आहे. आज (9 मे) दुपारी दोन वाजता पार्थिव सांताक्रूझ (पूर्व) येथील राजे संभाजी विद्यालयात अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता विश्वनाथ महाडेश्वर यांची अंत्ययात्रा निघणार आहे.

Advertisement

उद्धव ठाकरे घेणार अंत्यदर्शन

शिवसेनेचे (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दुपारी विश्वनाथ महाडेश्वर यांचे अंत्यदर्शन घेणार असल्याची माहिती आहे. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अकाली निधनाने पक्षावर शोककळा पसरली आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

कोण होते विश्वनाथ महाडेश्वर?

विश्वनाथ महाडेश्वर हे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुंबईतील नेते होते. ते मुंबई महापालिकेचे महापौरही होते. मार्च 2017 ते नोव्हेंबर 2019 या काळात महापौर होते. त्यांनी नागरिक शिक्षण समितीचे अध्यक्ष आणि स्थायी समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले होते. महाडेश्वर हे 2002 मध्ये पहिल्यांदा मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते.

हेही वाचा >> उद्धव ठाकरेंचा उल्लेख, शिव्यांवरून मोदींवर घणाघात; शरद पवार काय बोलले?

विश्वनाथ महाडेश्वर यांची राजकीय कारकीर्द

2002 – मुंबई महानगरपालिकेत पहिल्यांदा नगरसेवक.
2003 – बृहन्मंबई महापालिकेत शिक्षण समितीचे अध्यक्ष
2007 – महापालिकेत पुन्हा नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले.
2012 – तिसऱ्यांदा नगरसेवक निवडून आले.
2017 – महाडेश्वर पुन्हा नगरसेवक निवडून आले आणि महापौर झाले.

Advertisement

हेही वाचा >> पाक ललनेच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकलेला प्रदीप कुरूळकर आहे तरी कोण?

विधानसभा निवडणुकीत पराभव

विश्वनाथ महाडेश्वर यांनी 2019 मध्ये शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. काँग्रेसचे झिशान सिद्दीकी यांनी महाडेश्वर यांचा पराभव केला होता. महाडेश्वरांना उमेदवारी दिल्याने माजी आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली होती.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज