For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

मुख्यमंत्र्यांकडून एवढा बालिशपणा...; आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंवर का संतापले?

04:18 PM Jun 25, 2023 IST | मुंबई तक
मुख्यमंत्र्यांकडून एवढा बालिशपणा     आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंवर का संतापले
पहिल्या पावसात मुंबईत पाणी तुंबल्याने नागरिकांकडून तक्रारी केल्या जात असून, यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विधानावरून आदित्य ठाकरे यानी संताप व्यक्त केला.
Advertisement

Mumbai Rain Update Marathi News : पहिल्या पावसात मुंबईत पाणी तुंबल्याने नागरिकांकडून तक्रारी केल्या जात असून, यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विधानावरून आदित्य ठाकरे यानी संताप व्यक्त केला. आदित्य ठाकरे यांनी मुंबईत रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेचे प्रशासकांवरही टीका केली.

Advertisement Whatsapp share

आदित्य ठाकरे म्हणाले, ‘मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी पाणी तुंबलं. मुंबई महापालिकेवर हुकुमशाही सुरू असून, मोठे घोटाळे केले आहेत. रस्त्यांमध्ये घोटाळे केले आहेत. काल मुंबईत पाऊस पडला. मुंबईकरांनी फोटो ट्विट केलेत. जिथे कधीच पाणी तुंबलं नव्हतं तिथेही पाणी तुंबलं. शिवाजी महाराज पार्क असो वा इतर ठिकाणी.’

Advertisement

‘काल रस्त्यावर मुंबई महापालिकेचे अधिकारी रस्त्यावर नव्हते. घटनाबाह्य मुख्यमंत्री कुठे होते, कुणालाच माहिती नाही. आज त्यांचं विधान पाहिलं की, ‘पाऊस आल्याचं स्वागत करा, मुंबईत पाणी तुंबलं यांची तक्रार काय करता?’ हे विधान म्हणजे निर्लज्जपणाचं. नाकर्तेपणाचा आणि भ्रष्टाचाराचा कुठला चेहरा असेल, तर ते खोके सरकार आहे. माझ्यासोबत माजी महापौर बसलेत. सगळ्याच पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांच्या वार्डात काम केलीत. पण, कधीही कुणी मुंबईकरांना असं उत्तर दिलं नाही’, अशी टीका आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

Advertisement सब्सक्राइब करा

एवढा निर्लज्जपणा बघितला नाही -आदित्य ठाकरे

‘एवढा निर्लज्जपणा, एवढा उद्धटपणा, एवढा नाकर्तेपणा, एवढा भ्रष्टाचार मी आतापर्यंत कधीच मुंबईत बघितला नाही. मी गेल्या वर्षभरापासून दोन गोष्टींकडे लक्ष वेधतोय. एक रस्त्याचा घोटाळा आणि दुसरं म्हणजे नालेसफाई. या सरकारने वेगवेगळी आश्वासने दिली होती. एक सुद्धा गोष्ट झालेली नाही. दहीहंडीला खेळाचा दर्जा देणार होते, तेही यांच्याकडून झालेलं नाही’, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

Mumbai Heavy Rain : रस्त्यांचे कालवे, स्टेशनवर धबधबे; मुंबईतील ही दृश्ये बघा

‘मुंबईत 50 रस्ते पूर्ण करू असं महापालिकेने महिनाभरापूर्वी सांगितलं होतं. खरंतरं जानेवारीमध्येच मी सांगितलं होतं की, 6 हजार 80 कोटींचा घोटाळा आहे. कंत्राट रद्द करा. याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण, यांनी देशातील सर्वोच्च नेत्यांच्या हस्ते भूमिपूजन केलं. त्यांचीही दिशाभूल यांनी केली’, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला.

Advertisement

Aditya Thackeray : ‘मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे’

‘मे महिन्यात सांगितलं की, 50 रस्ते पूर्ण करू. गेल्या महापालिकेच्या 150 वर्षाच्या इतिहासात 50 रस्ते हे सगळ्यात छोटं उद्दिष्ट आहे. लाज वाटली पाहिजे, मुंबई महापालिकेच्या प्रशासकांना की त्यांनी एवढं छोटं उद्दिष्ट दिलं. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यां लाज वाटली पाहिजे. 50 रस्त्यांतील एकही रस्ता पूर्ण झालेला नाही’, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदेंना लक्ष्य केलं.

‘फक्त कंत्राटदारांची काळजी घेतली. अलीकडचा कारभार मंत्रालयाच्या आजूबाजूच्या इमारतीतून चालतो. यांनी मविआ सरकार पाडण्यासाठी जितका रस घेतला तितकाच रस मुंबई, ठाण्यातील कामांबद्दल घेतला असता, तर लोकांना त्रास झाला नसता’, असंही ते यावेळी म्हणाले.

Rain Update in Maharashtra : मान्सून मुंबईत! पुणे, नागपूरसह ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंट अलर्ट!

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, ‘नालेसफाईची मी असेल, उद्धव ठाकरे स्वतः पाहणी करायला जायचे. मुख्यमंत्री असतानाही आपत्ती नियंत्रण कक्षात जाऊन परिस्थितीचा आढावा घ्यायचे. कारवाईही करायचो. माझ्याकडे काही माहिती आली आहे.’

NCP : जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार? भाजपने थेट 10 कारणंच सांगितली

‘शहरात पम्प वाढवण्यात आल्याचे सांगण्यात आले, पण त्याचा कुठे वापर होताना काल दिसला का? पम्पिंग स्टेशन सुरु केले, तर पाणी समुद्रात फेकता येतं, पण तेही सुरू झाल्याची माहिती नाही. मागच्या वर्षीपर्यंत मी असेन, महापौर असतील, महापालिकेचे अधिकार असू, आम्ही तिथे जायचो आणि उभे राहायचो. लोकांचं ऐकून घ्यायचो. आम्ही कामं करून दाखवली’, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला.

स्वतःसाठी खोके आणि जनतेला धोके, ठाकरे नेमकं काय म्हणाले?

‘पाऊस आला स्वागत करा, पाणी तुंबलं याची तक्रार काय करता, असं म्हणणाऱ्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून एवढा बालिशपणा आम्हाला अपेक्षित नाही.उद्धटपणा आहे. दुर्लक्ष केलं जातंय. भ्रष्टाचाराचं सगळ्यात मोठं चिन्हं, करप्टमॅन ही (एकनाथ शिंदेंचा फोटो दाखवला) व्यक्ती झालेली आहे. मुंबईकरांना असे टोमणे सहन करावे लागताहेत म्हणून रागही येतोय. भ्रष्टाचाराचे पैसे त्यांच्या जाहिरातीसाठी वापरले आहेत. स्वतःसाठी खोके आणि जनतेला धोके हेच ध्येय घेऊन हे सरकार पुढे चाललं आहे’, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकनाथ शिंदेंना डिवचलं.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज