For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Mumbai: तरुणाने मारलेल्या उडीने घेतला 72 वर्षीय वृद्धाचा जीव, स्विमिंग पूलमध्ये काय घडलं?

08:48 PM Apr 25, 2023 IST | मुंबई तक
mumbai  तरुणाने मारलेल्या उडीने घेतला 72 वर्षीय वृद्धाचा जीव  स्विमिंग पूलमध्ये काय घडलं
Advertisement

मुंबई: मुंबईत एक अत्यंत विचित्र घटना घडली आहे. येथे स्विमिंग पूलमध्ये (swimming pool) आंघोळ करताना एका तरुणाने उंचावरून उडी मारली, मात्र स्विमिंग पूलमध्ये तो थेट एका वृद्धाच्या अंगावर जाऊन पडला. या घटनेत वृद्ध गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू (Death) झाला. याप्रकरणी मृताच्या कुटुंबीयांनी तरुणावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. (young man jumps from height in swimming pool falls on 72 year old man old man dies)

Advertisement Whatsapp share

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील गोरेगावच्या पश्चिम भागातील ओझोन जलतरण तलावावर रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. 72 वर्षीय विष्णू सामंत हे जलतरण तलावात पोहण्यासाठी आले होते. याचवेळी येथे एक 20 वर्षीय तरुणही आला होता. हाच तरुण अचानक स्विमिंग पुलच्या उंचावरील एका कठड्यावर गेला आणि त्याने थेट स्विमिंग पूलमध्ये उडी मारली. पण पाण्यात पडण्याऐवजी तो थेट स्विमिंग पूलमध्ये असलेल्या विष्णू सामंत यांच्यावर जाऊन कोसळला. हा आघात एवढा भयंकर होता की, यामध्ये विष्णू हे गंभीर जखमी झाले. त्याच्या मानेवर आणि शरीराच्या अनेक भागांवर गंभीर जखमा झाल्या.

Advertisement

हे ही वाचा>> CM एकनाथ शिंदे सुट्टीवर! मुंबई अन् ठाणे सोडून थेट सातारा गाठलं; कारण रात्री 2 वाजता…

विष्णू सामंत यांना जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचं रुग्णालय प्रशासनाने जाहीर केलं. या घटनेनंतर विष्णू यांच्या पत्नीने तरुणावर निष्काळजीपणे उडी मारल्याचा आरोप केला आहे. विष्णूच्या मृत्यूला तरुणच जबाबदार असल्याचे त्यांच्या पत्नीचे म्हणणे आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

यापूर्वीही अशा घटना समोर आल्या आहेत

याआधीही जलतरण तलावात अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. यापूर्वी कर्नाटकातील बंगळुरू येथे भीषण अपघात झाला होता. येथे दोन मित्रांचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झालेला. मृत्युमुखी पडलेली दोन्ही मुले 13 वर्षांची होती. दोघेही शाळा बुडवून तलावात पोहायला गेले होते. पण त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता.

प्रशिक्षकावर दाखल झालेला गुन्हा

याप्रकरणी पोहण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या तीन जणांविरुद्ध पोलिसांनी निष्काळजीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मोहन आणि जयंत हे दोन्ही 13 वर्षांचे विद्यार्थी जरगनहल्ली शासकीय शाळेत शिकत होते. दोघेही दुपारी शाळेत जाण्यासाठी घरातून निघाले होते. पण, शाळेत न जाता दोघेही पोहण्यासाठी जेपी नगर येथील एमएनसी स्पोर्ट्स अकादमीत पोहोचले होते.

Advertisement

हे ही वाचा>> कुत्र्यामुळे झालेला पाणउतारा… मुंबईची अभिनेत्री थेट शारजाहच्या तुरुंगात : वाचा भयंकर बदल्याची गोष्ट

जयंत आणि मोहन अकादमीत पोहोचले आणि त्यांनी स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी 100 रुपये दिले होते. यानंतर दोघेही तलावात पोहायला लागले. तलावाची खोली ही 6 फूट ते 20 फूटांपर्यंत आहे. त्यामुळी ही शाळकरी मुलं 6 फुटांच्या पुढे पोहत गेले आणि त्यातच दोघांचा बुडून मृत्यू झाला होता.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज