For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Maratha Reservation : उदयनराजेंच्या साताऱ्यात 20 हजार, तर शंभूराज देसाईंच्या पाटणमध्ये सर्वाधिक कुणबी नोंदी!

10:21 AM Nov 10, 2023 IST | प्रशांत गोमाणे
maratha reservation   उदयनराजेंच्या साताऱ्यात 20 हजार  तर शंभूराज देसाईंच्या पाटणमध्ये सर्वाधिक कुणबी नोंदी
20 thousand Kunbi records found in satara and patan found highest number records maratha reservation manoj jarange patil
Advertisement

Manoj jarange Patil Kunabi Certificate, Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil) आंदोलनानंतर शिंदे सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना कुणबी नोंदी (Kunabi Certificate)  शोधण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष देखील उभारण्यात आले आहेत. त्यानंतर आता प्रत्येक जिल्ह्यातून कुणबी नोंदीची आकडेवारी समोर येत आहे. आता खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या साताऱ्यात मागील दोन दिवसात 20 हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत. तर मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या पाटणमध्ये सर्वाधिक नोंदी आढळल्या आहेत.जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. (20 thousand Kunbi records found in satara and patan found highest number records maratha reservation manoj jarange patil)

Advertisement Whatsapp share

राज्य सरकारने कुणबी नोंदनी शोधण्याचे आदेश संबंधित जिल्ह्यातील प्रशासनाला दिले आहेत. सध्या सातारा जिल्ह्यातही मागील दोन दिवसापासून कुणबी नोंदी तालुका निहाय शोधण्याचे काम सातारा जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला असून आत्तापर्यंत वीस हजार कुणबी नोंदी सातारा जिल्ह्यात सापडले आहेत, अशी माहिती जितेंद्र दुडी यांनी दिली.

Advertisement

हे ही वाचा : मुंबईत भरधाव कारची सहा गाड्यांना धडक, भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

सर्वाधिक नोंदी पाटण तालुक्यात आढळून आल्या आहेत. या कुणबी नोंदीची माहिती प्रशासनाला दिली जात आहे. तालुका निहाय आढळलेल्या कुणबी नोंदी पैकी सातारा तालुक्यात 1800, माण तालुक्यात 9, खटाव तालुक्यात 208, जावळी तालुक्यात 760, कराड तालुक्यात 51, पाटण तालुक्यात 14000, कोरेगाव तालुक्यात 1 हजार 32, महाबळेश्वर तालुक्यात 1100, खंडाळा तालुक्यात 854, वाई तालुक्यात 170, फलटण तालुक्यात 18 अशा एकूण 20,002 कुणबी नोंदी आढळून आल्या असून अजून प्रशासनाकडून त्या नोंदी शोधण्याचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

हे ही वाचा : EC सुनावणी: ‘अजित पवार गटाचा खोटेपणा, 20 हजार शपथपत्रात..’, पवार गटाच्या वकिलांचा मोठा आरोप

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज