For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Aaditya Thackeray: ठाकरे एकत्र येणार?, काकांचा विषय पुतण्याने उचलून धरला; म्हणाले टोलनाके...

10:38 PM Aug 07, 2023 IST | रोहित गोळे
aaditya thackeray  ठाकरे एकत्र येणार   काकांचा विषय पुतण्याने उचलून धरला  म्हणाले टोलनाके
ठाकरे एकत्र येणार?, काकांचा विषय पुतण्याने उचलून धरला; म्हणाले टोलनाके...
Advertisement

MNS-Shiv Sena Toll: मुंबई: शिवसेना (UBT) पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आज (7 जुलै) मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेत एक मोठी घोषणा केली. आपली सत्ता आल्यानंतर मुंबईतील पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर टोल (Toll) तात्काळ बंद करण्यात येईल असं ते म्हणाले. तसेच आता सध्या या रस्त्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार दोनदा कर वसूल करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. मात्र, आदित्य ठाकरेंच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात मात्र एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येण्याची. (aaditya thackeray big statment on mumbai entry point toll discussions have started mns shiv sena ubt will come together)

Advertisement Whatsapp share

टोल नाक्यांचा विषय हा सगळ्यात आधी मनसेने (MNS) हाती घेतला होता. राज ठाकरे यांनी या विषयावरून महाराष्ट्रात रान पेटवलं होतं. मात्र, कालांतराने हा विषय काहीसा मागे पडला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच पुन्हा एकदा टोल नाक्यांचा विषय मनसेने हाती घेतला. असं असताना आता याच विषयावरुन आदित्य ठाकरेंनाही घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

Advertisement

हे ही वाचा >> Maharashtra : ‘राज ठाकरेंना फोन करणार, पण…’, उद्धव ठाकरे खासगीत काय बोलले?

एकीकडे अजित पवार हे भाजपसोबत गेल्यापासून मनसे आणि शिवसेना (Shiv Sena UBT)हे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अशातच आता दोन्ही पक्ष एकमेकांना सुसंगत अशी भूमिका घेत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता काकांचा विषय पुतण्याने हाती घेतल्याने त्याचं राजकीय सूत जुळतंय का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

'ते' टोलनाके आम्ही बंद करू, आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?

गेल्या नोव्हेंबरमध्ये मुंबईतील पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग महापालिकेच्या ताब्यात देण्यात आले होते. या दोन्ही रस्त्यांची डागडुजी, रंगरंगोटी आदी कामे पालिकेने करायची आहेत. पालिकेच्या खर्चाने ही कामे केली जात आहेत. पालिका मुंबईकरांकडून कर वसूल करते. या कराच्या पैशातून या रस्त्याची दुरुस्ती व देखभाल केली जात आहे. या दोन प्रमुख रस्त्यांची देखभाल महापालिका करत असेल, तर टोल नाक्यांचा पैसा एमएसआरडीसीकडे का जात आहे? या रस्त्यावरील होर्डिंग्जचा पैसा एमएसआरडीसीकडे का जात आहे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

एमएसआरडीसी या दोन्ही रस्त्यांवर टोल का आकारत आहे? हा पैसा कोणाला दिला जात आहे? मुंबईकर आधीच महापालिकेला कर भरतात. हे टोलचे पैसे मुंबईकरांनी का भरावेत? मुंबईकरांवर दुप्पट कर का? देशात सर्वाधिक कर मुंबईकर भरतात. असे सांगत आदित्य ठाकरे यांनी या दोन रस्त्यांवरील टोलनाके आणि होर्डिंगसाठीही पालिकेला पैसे मिळावेत.

Advertisement

हे ही वाचा >> Ajit Pawar भाजपसोबत हा अमित शाहांचा प्लॅन? एका वाक्याने मोठा खुलासा

यासंदर्भात मी काल महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे. या दोन महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. मुंबईकर कर भरत आहेत, असे गृहीत धरले तर या दोन्ही मार्गावरील टोलनाके बंद करायला हवेत. कंत्राटदार तुमचा मित्र असला तरी त्याच्याशी एकवेळ समझोता करा. त्यासाठी महापालिकेचे पैसे घेऊ नयेत. या रस्त्यावर जे होर्डिंग लावण्यात आले आहेत. हा निधी पालिकेला द्यावा.

हे टोल नाके बंद करण्यासाठी आम्ही आंदोलन करणार नाही. कोर्टात जाणार नाही. कारण हे सरकार एक संस्था आहे. हे सरकार गेल्यावर आमचे सरकार येईल. आमचे सरकार येताच या दोन्ही रस्त्यांवरील टोलनाके बंद करू, अशी घोषणाही त्यांनी केली.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज