For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Sada Sarvankar : "अटक सोडा, गद्दारीचं बक्षीस दिलं"; आदित्य ठाकरे फडणवीसांवर संतापले

05:01 PM Nov 07, 2023 IST | भागवत हिरेकर
sada sarvankar    अटक सोडा  गद्दारीचं बक्षीस दिलं   आदित्य ठाकरे फडणवीसांवर संतापले
सदा सरवणकरांच्या नियुक्तीवरून आदित्य ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
Advertisement

Sada Sarvankar Aaditya Thackeray : मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिर न्यास व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शिंदे सरकारने आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली. आदेश बांदेकरांचा कार्यकाळ संपल्याने हे पद रिक्त होते. दरम्यान, या नियुक्तीवरून आमदार आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर संताप व्यक्त केला.

Advertisement Whatsapp share

आदेश बांदेकरांचा कार्यकाळ संपल्याने सरकार त्यांना मुदतवाढ देणार की नव्या व्यक्तीवर ही जबाबदारी सोपवणार? असा प्रश्न चर्चिला जात होता. दरम्यान, सरकारने माहीमचे आमदार सदा सरवणकर यांची श्री सिद्धीविनायक मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली.

Advertisement

आदित्य ठाकरेंची शिंदे सरकार तोफ

सदा सरवणकर यांच्या नियुक्तीवरून आदित्य ठाकरेंनी शिंदे आणि फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. आदित्य ठाकरेंनी ट्विट केलंय. यात त्यांनी सदा सरवणकर वादात सापडले त्या सर्व घटनांचा उल्लेख केला आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

"दादरमध्ये ह्यापूर्वी घडला नव्हता असा प्रकार ज्याने केला, आमच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत ज्याने बंदूक रोखली, टीव्हीवर देखील ते दाखवण्यात आलं. नंतर पोलिसांनीही सांगितलं की, गोळी त्यांच्याच बंदूकीतून चालवली गेली होती. त्या गद्दार व्यक्तीची चौकशी आणि अटक तर सोडाच, मिंधे- भाजप सरकारने आज त्यांना सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून बसवले", असं टीकास्त्र आदित्य ठाकरेंनी डागलं आहे.

"हिंदू सणात विघ्न आणणाऱ्या त्या व्यक्तीचं लायसन्स आणि बंदूक जप्त झाली पाहिजे होती, अटक व्हायला हवी होती! पण... ह्या कृत्याबद्दल त्याला बक्षीसच मिळाल्याचं दिसतंय! मिंधे-भाजप गँगच्या गद्दारांचं हे कोणतं हिंदुत्व?", असा सवाल आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारला केला आहे.

Advertisement

फडणवीस भाजपला टोला

"आमच्या सणवाराला, गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक रोखणारे हे सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून कसे शोभतात? खरंतर भाजपा किंवा गृहमंत्र्यांकडून ह्या गोष्टीचा विरोध व्हायला हवा होता... पण कदाचित हे गद्दारीचं आणि महाराष्ट्रद्वेषाचं बक्षीस दिलं असेल...", असं म्हणत आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांनाही लक्ष्य केलं आहे.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज