For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

NCP: शरद पवार म्हणाले 'तब्येत बरी नाही', पण अजितदादा तर गेलेले किल्ले पाहायला...

05:34 PM Nov 14, 2023 IST | रोहित गोळे
ncp  शरद पवार म्हणाले  तब्येत बरी नाही   पण अजितदादा तर गेलेले किल्ले पाहायला
शरद पवारांनी अजित पवारांना सावरून घेतलं पण अजितदादांनी तर...
Advertisement

Ajit Pawar: वसंत मोरे, बारामती: बारामतीतील दिवाळी ही पवार कुटुंबीयांसाठी दरवर्षी खास असते. मात्र, यंदाची पहिलीच दिवाळी पवार कुटुंबासाठी अशी होती की, ज्यामध्ये पवार कुटुंबातील काही सदस्य हे गोविंद बागेत हजर नव्हते. आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्राने पवार कुटुंबातील एकसंधपणा पाहिला होता. मात्र, अजित पवारांनी पक्षात बंड केल्यानंतर पक्षासोबतच कुटुंबातील काही समीकरणं देखील बदलली आहे. त्यामुळेच आज (14 नोव्हेंबर) अजित पवार हे गोविंदबागेत हजर नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीवरून खरं तर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, शरद पवार यांनी अजितदादांची प्रकृती ठीक नसल्याचं म्हणत अजित पवारांना सावरून घेतलं होतं. (absent in govind bagh diwali event but ajit pawar saw the fort in katewadi what is the real politics in ncp)

Advertisement Whatsapp share

मात्र, दुसरीकडे अजित पवार हे बारामतीत असून देखील त्यांनी गोविंदबागेतील कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याचं आता समोर आलं आहे. कारण अजित पवार यांनी आज (14 नोव्हेंबर) गोविंदबागेतील कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. पण काल मात्र ते काटेवाडीत किल्ले पाहण्यासाठी आवर्जून गेल्याचं आता समोर आलं आहे.

Advertisement

हे ही वाचा>> Rohit Pawar : “फडणवीस नेत्यांना पुढे करून वाद…”, पवारांच्या विधानाने खळबळ

डेंग्युमुळे आपण जाहीर कार्यक्रमांना हजेरी लावणार नाही आणि लोकांना भेटणार नाही असं अजित पवारांनी जाहीर केलं होतं. मात्र, त्याच्याच दुसऱ्या दिवशी त्यांनी अचानक दिल्ली दौरा केला होता.

Advertisement सब्सक्राइब करा

अजित पवार गेले काटेवाडीत किल्ला पाहायला

आता दिवाळीनिमित्त संपूर्ण पवार कुटुंबीय सध्या बारामतीत आहेत. विविध कौटुंबिक कार्यक्रमांना ते हजेरी लावत आहेत. डेंग्युतून बरे झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोविंद बागेतील कार्यक्रमाला हजेरी न लावता काटेवाडीतील धनीवस्ती येथे मुलांनी बनवलेल्या किल्ल्याची पाहणी केली.

बारामती तालुक्यातील काटेवाडीत धनी अर्थात काटे-देशमुख परिवाराकडून दरवर्षी दिवाळीत मोठ्या किल्ल्याची उभारणी केली जाते. प्रत्येक वर्षी नवनवीन किल्ल्यांच्या प्रतिकृती इथे उभारल्या जातात. यावर्षी धनी परिवाराने जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती उभारली आहे. सोमवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या किल्ल्याची पाहणी करत धनी परिवाराशी संवाद साधला.

Advertisement

हे ही वाचा>> NCP: शरद पवारांनी अजितदादांना पुन्हा एकदा घेतलं सावरून, नेमका किस्सा काय?

अजित पवार हे गोविंद बागेत नसल्याच्या मुद्द्यावरून शरद पवार यांना आजच्या पत्रकार परिषदेत जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा शरद पवारांनी खरं तर अजित पवार यांना सावरुन घेतलं. यावेळी शरद पवार म्हणाले की, 'काही व्यक्तिगत कामांमुळे कोणी उपस्थित राहिले नाही, कोणी आजारपणामुळे उपस्थित राहिले नाहीत.. पण गैरसमज नसावा.. तुम्ही सगळे स्थानिक पत्रकार आहात, गेल्या वर्षीच्या तुलनेत गर्दी कमी झाली का वाढली? हे तुम्हीच तपासा.' असं शरद पवार म्हणाले.

पार्थ पवारांनी घेतली शरद पवारांची भेट

एकीकडे सकाळच्या दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमाला अजित पवार हे गैरहजर राहिले असले तरीही दुसरीकडे त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी मात्र, दुपारच्या सुमारास गोविंद बागेतील निवासस्थानी येऊन शरद पवार यांची भेट घेतली.

यावेळी त्यांनी पार्थ पवार यांनी शरद पवार यांच्यासह संपूर्ण कुटुंबीयांची भेट घेतली आणि नंतर ते काही वेळातच तिथून निघून गेले. दरम्यान, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेलं नाही. तसंच पार्थ पवार यांनी मीडियाशी देखील संवाद साधला नाही.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज