For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Video : सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांच औक्षण, काटेवाडीतली भाऊबीज पाहिलीत का?

09:21 PM Nov 15, 2023 IST | प्रशांत गोमाणे
video   सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांच औक्षण  काटेवाडीतली भाऊबीज पाहिलीत का
ajit pawar supriya sule bhaubeej diwali bhai dooj katewadi house video sharad pawar maharashtra politics
Advertisement

Supriya Sule Ajit Pawar Diwali Bhaubeej : राष्ट्रवादीतील फुटीनंतर यंदाच्या दिवाळीला अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) मतभेद विसरून एकत्र येणार का? असा सवाल उपस्थित होत होता.अखेर या प्रश्नाचे उत्तर मंगळवारी गोविंद बागेत सर्वांना मिळाले आहे. कारण मंगळवारी शरद पवारांच्या गोविंद बागेत अजित पवार सहकुटुंब दाखल झाले होते. यावेळी त्यांनी स्नेहभोजनाचीही आनंद घेतला. यानंतर आज अजित पवार यांच्या निवासस्थानी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाऊबीज साजरी केली. राजकीय मतभेद विसरुन अजित दादा आणि सुप्रिया सुळे यांनी भाऊबीज साजरी केली. या संदर्भातला व्हिडिओही सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअऱ केला आहे. (ajit pawar supriya sule bhaubeej diwali bhai dooj katewadi house video sharad pawar maharashtra politics)

Advertisement Whatsapp share

भाऊबीज सणानिमित्त आज अजित पवारांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी सुप्रिया सुळेंसह सर्व बहिणी जमल्या होत्या. यावेळी सर्व बहिणींनी मिळून अजित पवारांना ओवाळलं. यावेळी सर्वजण आनंदात दिसत होते. अजित पवारांसह त्यांचे बंधु श्रीनिवास पवार यांनाही बहिणींनी ओवाळलं. या संबंधित व्हिडिओ खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स या सोशल माध्यमावर शेअर केला आहे.

Advertisement

हे ही वाचा : Virat Kohli : अखेर ‘विराट’ इतिहास घडला! कोहलीने सचिन तेंडुलकराला टाकलं मागे

Advertisement

गोविंद बागेत अजित पवारांची हजेरी

मंगळवारी शरद पवारांच्या निवासस्थानी रात्री 8 वाजता अजित पवार गोविंद बागेत सहकुटुंब दाखल झाले. यावेळी अजितदादांसोबत सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारही स्नेहभोजनाला पोहोचले होते. शरद पवार यांच्या गोविंदबाग येथील निवासस्थानी अजितदादांचे संपूर्ण कुटुंब सुमारे 3 तास उपस्थित होते. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी गटाच्या सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबियांच्या गोविंद बागेतील दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये शरद पवार आणि त्यांच्या पाठीमागे अजित पवार दिसत आहेत. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार एकाच फ्रेममध्ये दिसून आले आहेत.

दरम्यान भाऊबीज आटोपल्यानंतर सायंकाळच्या सुमारास अजित पवार बारामतीहुन थेट मुंबईत दाखल झाले. त्यांनी वानखेडे मैदानावर जाऊन भारत- न्युझीलंड सामन्याचा आनंद लुटला. या संबंधित फोटोही समोर आले होते.

हे ही वाचा : Crime : … अन् मालकिणीने नोकराचा कापला प्रायव्हेट पार्ट, कारण ऐकून पोलिसही चक्रावले

दरवर्षी पवार कुटुंबीय दिवाळीनिमित्त बारामतीत एकत्र येतात. यंदाच्या वर्षी पक्षात फुट पडून सुद्धा पवार कुटुंबीय एकत्र आलं. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी भाऊबीज साजरी केली. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार कुटुंबाची पहिल्यांदा दिवाळी साजरी केली. दिवाळी पाडव्यालाही पवार कुटुंब एकत्र आलं. पवार कुटुंब एकत्रित आले म्हणून मतभेद विसरले असेही नाही आहे.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज