For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Raj Thackeray: 'जरांगेंच्या मागे इतर कोणी तरी, आरक्षण कधीही..'; राज ठाकरेंचं खळबळजनक विधान

07:35 PM Nov 16, 2023 IST | रोहित गोळे
raj thackeray   जरांगेंच्या मागे इतर कोणी तरी  आरक्षण कधीही     राज ठाकरेंचं खळबळजनक विधान
राज ठाकरेंचं मराठा आरक्षणाबाबत मोठं विधान
Advertisement

Raj Thackeray On Manoj Jarange-Patil: ठाणे: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठा आरक्षणाबाबत एक मोठं आणि खळबळजनक विधान केलं आहे. 'या प्रकारचं कोणतंही आरक्षण मिळणार नाही. तसंच या आरक्षणासाठी जरांगे-पाटलांच्या मागे इतर कोणी तरी आहे..' असं वक्तव्य करत राज ठाकरे यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. ते ठाण्यात एका पत्रकार परिषदेत बोलत होते. (anyone else behind manoj jarange patil maratha reservation will never get it sensational statement of raj thackeray)

Advertisement Whatsapp share

पाहा राज ठाकरे नेमकं काय-काय म्हणाले:

मराठा आरक्षणावर राज ठाकरेंचं मोठं विधान

'मुळात या प्रकारचं कोणतंही आरक्षण कधीही मिळणार नाही.. हे मी त्यांच्यासमोर त्या दिवशी सांगून आलो होतो. मी काही वेगळं सांगत नाही.. अशी कुठचीही गोष्ट होणार नाही. आता ते जरांगे-पाटील आहेत की, जरांगे पाटलांच्या मागे कोणी तरी आहेत.. ज्यातून जातीयवादातून महाराष्ट्र अस्थिर करायचं ठरवलं आहे.'

Advertisement

'निवडणुका तोंडावर असताना या गोष्टी आता सुरू होत आहेत. हे काही मला इतकं सरळ चित्र दिसत नाही. त्यामुळे कालांतराने कळेलच यामागे कोण आहे.' असं विधान राज ठाकरे यांनी केलं. ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Advertisement सब्सक्राइब करा

'राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं सुरू झालं'

'जात ही गोष्ट अनेकांना प्रिय असते. अनेकांना ती गोष्ट आवडते. आवडण्याची कारणं काही तरी वेगळी असतात. म्हणजे खाद्य संस्कृतीचा विषय असतो, इतर जे काही तुमच्या घरातील विषय असतात.. त्यामुळे स्वत:च्या जातीबाबत अभिमान असणं किंवा स्वत:च्या जातीबाबत आपलेपणा असणं हे आजपर्यंत होत होतं.'

'1999 साली ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली.. त्या स्थापनेनंतर स्वत:च्या जातीपेक्षा दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे राष्ट्रवादीच्या जन्मानंतर सगळं महाराष्ट्रात सुरू झालं.'

Advertisement

हे ही वाचा >> Nana Patekar : ‘चूक झाली माफ करा पण…’, टपली मारलेल्या Video वर पाटेकर अखेर बोलले!

'याचा धोकाही मी सांगितला होता की, उद्या जर आपण असे वागायला लागलो तर महाराष्ट्राचा उत्तरप्रदेश, बिहार व्हायला वेळ लागणार नाही. आपल्याकडे कसंय की, यांच्या स्वत:च्या निवडून येण्याच्या स्वार्थी राजकारणापायी आपण महाराष्ट्र खड्ड्यात घालतोय.'

'ज्या महाराष्ट्राचं उदाहरण देशात दिलं जातं. मग ती संत परंपरा असेल किंवा इतर काही विचार असतील.. सगळ्या बाबतीत महाराष्ट्र हा अग्रेसर होता, अग्रेसर आहे.. मला वाटतं अग्रेसर राहील ही. पण या इमेजची जी काही वाट लावण्याचे प्रकार जे सुरू आहेत.. दुर्दैव आहे.. काय म्हणणार त्याला.'

हे ही वाचा >> Uddhav Thackeray: ‘जय भवानी-जय शिवाजी म्हणा अन् मतदान करा’, ठाकरेंनी केलं मोदी-शाहांना टार्गेट

'जर चांगल्या क्षमतेचा माणूस असेल तर मी जातपात पाहत नाही. जातीने काही होत नाही.. कोणत्याही जातीच्या माणसाने कोणाचं कल्याण केलं मला ते सांगा?' असं म्हणत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

'अमित शाहांनी टूर अँड ट्रॅव्हल्स नवीन खातं सुरू केलं'

'अमित शाह यांनी टूर अँड ट्रॅव्हल्स नावाचं एक नवीन खातं उघडण्याची सुरुवात केली असावी. तुम्ही काय कामं केली यावर निवडणुका लढवा ना.. राम मंदिराच्या दर्शनाची आमिषं कसली दाखवता तुम्ही.. इतकी वर्ष तुम्ही तिकडे सत्तेमध्ये आहात त्यावेळी काय-काय गोष्टी केल्या.. हे लोकांसमोर येणं गरजेचं आहे.' असं म्हणत राज ठाकरे यांनी अमित शाह यांनाही टोला लगावला.

 

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज