For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

ठाकरेंच्या 'त्या' दोन नेत्यांनी..., बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरील राड्यावर मुख्यमंत्री काय म्हणाले?

08:08 AM Nov 17, 2023 IST | प्रशांत गोमाणे
ठाकरेंच्या  त्या  दोन नेत्यांनी     बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरील राड्यावर मुख्यमंत्री काय म्हणाले
balasaheb memorial shivaji park dadar shinde group and thackeray group riot cm eknath shinde first reaction maharashtra politics
Advertisement

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Memorial) यांचा आज 10 वा स्मृतीदिन आहे. या स्मृतीदिनाच्या एक दिवस आधीच म्हणजेच गुरूवारी 16 नोव्हेंबरला सायंकाळी शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर शिवसेनेच्या दोन्ही गटात राडा झाल्याची घटना घडली आहे. दोन्ही गट एकमेकांच्या अंगावर गेले, घोषणाबाजी केली, धक्काबुक्की केली, अस एकंदरीत प्रकार घडला. या सर्व घडामोडींवर आता मुख्यमंत्र्यांनी (Cm Eknath shinde) प्रतिक्रिया दिली आहे. (balasaheb memorial shivaji park dadar shinde group and thackeray group riot cm eknath shinde first reaction maharashtra politics)

Advertisement Whatsapp share

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सामंजस्याची भूमिका घेऊन स्मृती दिनाच्या एक दिवस आधी स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबाना अभिवादन करतो. मात्र त्यांच्या स्मृतीदिनाला गोंधळ घालून गालबोट लावण्याचा केलेला प्रयत्न हा निंदनीय असून त्याचा करावा तेवढा निषेध कमीच असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

Advertisement

हे ही वाचा : Maratha Reservation : ‘तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही 160 आमदार पाडू’, कुणी दिला इशारा?

स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न कुणीही करू नये अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. खरंतर मुख्यमंत्री असल्यामुळे प्रत्यक्ष स्मृतीदिनी जाऊन अभिवादन केले तरीही आपल्याला कुणी अडवू शकणार नाही. मात्र तरीही तसे करणे आपण टाळले कारण यादिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये अशीच माझी इच्छा होती.

Advertisement सब्सक्राइब करा

आजही दरवर्षीप्रमाणे बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी स्मृती स्थळावर जाऊन मी दर्शन घेईपर्यंत तिथे कुणीही आले नव्हते,मात्र मी निघाल्यावर तिथे उबाठा गटाचे नेते अनिल देसाई आणि अनिल परब तिथे आले आणि आमच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. तसेच महिला भगिनींबद्दल अपशब्द वापरले. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची ही शिकवण नसून यांच्या स्मृतिदिनी विनाकारण अशांतता निर्माण करण्याचा केलेला प्रयत्न हा निंदनीय असून त्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे असे मत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

हे ही वाचा : Crime : 16 वर्षाच्या मुलाने 22 वर्षांच्या गर्लफ्रेंडची केली हत्या, ठाण्यात नेमकं काय घडलं?

नेमकं काय घडलं?

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाच्या एक दिवस आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीथळाला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी बाळासाहेबांना अभिवादन करून त्यांना आदरांजली दिली. यानंतर मुख्यमंत्री शिंदे निघून गेले होते. यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि अनिल देसाई यांच्या नेतृत्वात हे कार्यकर्ते शिवाजी पार्कवर दाखल झाले. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ ठाकरे गटाकडून गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण् करण्याचा प्रयत्न झाला. ठाकरे गटाचा हा प्रयत्न शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून हाणून पाडण्याचाही प्रयत्न झाला. या प्रयत्नात बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यामध्ये जोरदार राडा झाला.

Advertisement

Advertisement googlenews
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज