For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Bhujbal Vs Damania : घर लाटल्याच्या दमानियांच्या आरोपांवर भुजबळांचं उत्तर, फर्नांडिस प्रकरण नेमकं काय?

02:25 PM Nov 19, 2023 IST | mahadev kamble
bhujbal vs damania   घर लाटल्याच्या दमानियांच्या आरोपांवर भुजबळांचं उत्तर  फर्नांडिस प्रकरण नेमकं काय
अंजली दमानिया म्हणाल्या की, मी छगन भुजबळ यांचे एक प्रक्षोभक भाषण ऐकले. आणि खरच सांगते की, डोक्यात तिडीक गेली.म्हणजे तळपायाची आग मस्तकात गेली तशी तळपायाची आग अक्षरशः मस्तकात गेली, आणि काल जे काय म्हणाले की, आम्ही आमच्या कष्टाचं खातो. कुठल्या कष्टाचं खातो.
Advertisement

Bhujbal-Damaniya: राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा सध्या जोरदार दौरा सुरु आहे. त्यातच मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वाखाली ओबीसींच्या एल्गार (OBC Elgar Sabha) सभेच जरांगे पाटील यांच्यावर त्यांनी जोरदार निशाणा साधला होता. त्यावेळी त्यांनी भाषण करताना आम्ही कोणाचंही लाटलेलं काही खात नसल्याचे आपल्या भाषणातून त्यांनी सांगितले होते. त्यांच्या त्या भाषणानंतर अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी पत्रकार परिषदे घेऊन छगन भुजबळ यांच्यासह त्यांनी त्याच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे भुजबळ आणि दमानिया हा वाद आता आणखी पेटला आहे.

Advertisement Whatsapp share

हे ही वाचा >>Ind vs Aus World Cup Final LIVE : वर्ल्ड कप फायनलसाठी PM मोदींच्या भारतीय संघाला शुभेच्छा

तळपायाची आग मस्तकात

अंजली दमानिया म्हणाल्या की, मी छगन भुजबळ यांचे एक प्रक्षोभक भाषण ऐकले. आणि खरच सांगते की, डोक्यात तिडीक गेली.म्हणजे तळपायाची आग मस्तकात गेली तशी तळपायाची आग अक्षरशः मस्तकात गेली, आणि काल जे काय म्हणाले की, आम्ही आमच्या कष्टाचं खातो. कुठल्या कष्टाचं खातो. त्याचा खुलासा करण्यासाठी आज मी त्यांच्या घराच्या इथे, मी फक्त दाखवणार होते, हे त्यांचे घर आहे, मात्र हे त्यांचं घर आहे, जे घर लुटलेले आहे. त्यांचा एक बंगला होता. मात्र तो बंगला रिडेव्हलपमेंटसाठी रहेजाला देऊन टाकला. त्यामध्ये त्यांना पाच फ्लॅट मिळणार होते. ते पाच फ्लॅट फर्नांडिस यांना मिळाले नाहीत असा त्यांनी छगन भुजबळ यांच्या कुटुंबीयांवर त्यांनी गंभीर आरोप केला होता.

Advertisement

मी बोलणार नाही

त्यांच्या त्या आरोपानंतर छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्याकडून स्पष्टीकरण देत त्यांनी सांगितले की, आम्ही कोणाचं घर लाटलं नाही, आणि ज्याबद्दल दमानिया बोलत आहेत. ते प्रकरण न्यायप्रविष्ठ असून त्याबद्दल मी काही बोलणार नसल्याचेही छगन भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंत आता समीर भुजबळ यांनीही आपली बाजू मांडून याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

समीर भुजबळांचे स्पष्टीकरण

समीर भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, सांताक्रूझ येथील आमच्या निवासस्थानाच्या जागेबाबत अनेक गैरसमज पसरविले जात आहेत. मात्र वस्तुस्थितीत वेगळी आहे. ही जागा ही बॉमबे ख्रिश्चन ट्रस्टच्या मालकीची असून फ्रान्सिस फर्नांडिस हे लिझ होल्डर म्हणजे मालक होते. यांनी त्यांच्या मुलीला लिझचे हक्क श्रीमती शैला यांना दिले होते. म्हणजेच त्या या जागेच्या खऱ्या मालक होत्या व त्यांनी सदर जागेसंबंधी हक्क त्यांचे भाऊ श्री व सौ फर्नांडिस यांना दिले होते.

नवीन डेव्हलपरच्या शोधात

या प्रकरणी कोर्टात फर्नांडिस कुटुंबीयांनी कन्सेंट टर्म्स फाईल करून सर्वप्रथम मेसर्स पाल्म शेल्टर्स या रहेजा बंधूंच्या कंपनीसोबत व्यवहार केला होता. मात्र त्यांनी 10 वर्षे काहीही काम केले नसल्यामुळे फर्नांडिस दांपत्य हे नव्या डेव्हलपर्सच्या शोधात होते. त्यासाठी त्यांना फ्रेडरिक नरोणा या सोसायटीच्या सचिवांना नवीन डेव्हलपर शोधण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार आमच्या मेसर्स परवेश कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या ते संपर्कात आले.

Advertisement

सर्व हक्का मिळाले पण...

त्यानंतर त्यांनी हा सर्व विषय मांडल्यानंतर फर्नांडिस कुटुंबियांना त्याच सोसायटीमध्ये इतरत्र फ्लॅट्स देण्याच्या करारानुसार आमच्या कंपनीने सर्व मोबदला हा मेसर्स पाल्म शेल्टर्स व फ्रेडरिक नरोणा यांना दिला होता. त्याबदल्यात सदर जागेसंबंधी सर्व हक्क आमच्या कंपनीला मिळाले होते. मोबदला दिल्यानंतर सप्टेंबर 2003 मध्ये श्री व सौ फर्नांडिस ह्यांनी आमच्या परवेश कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीच्या नावे रजिस्टरही केले होते. मात्र 2005 मध्ये आम्ही बांधकामाला सुरुवात केल्यानंतर आमचे फ्रेडरिक नरोणा यांच्याबरोबर पटत नसल्याचे कारण सांगत तो करार रद्द करावा अशी भूमिका घेण्यात आली. आम्ही फ्रेडरिक नरोणा ह्यांच्याशी संपर्क केला असता त्यांचे बांधकाम सुरु आहे व लवकरच त्यांना पझेशन देण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र फेड्रिक नारोणा यांच्याकडून फ्लॅट घेण्याबाबत फर्नांडिस कुटुंबीयांनीच नकार देण्यात आला.

हे ही वाचा >> Miss Universe Winner : निकारागुआच्या शेनिस पॅलासिओसने जिंकला ‘मिस युनिव्हर्स’चा किताब

माणुसकीचे नाते

त्यानंतरही आम्ही त्यांचे कोणतेही देणं लागत नसताना माणुसकीच्या नात्याने फर्नांडिस कुटुंबीयांशी आम्ही वारंवार संपर्क केला होता. 2014 साली त्यांनी समक्ष भेटून फ्लॅटच्या मोबदल्यात त्यांना पैसे देण्याचे आम्ही मान्य आणि त्यांनी देखील ते मान्य केले. त्यासाठी बॉम्बे ख्रिश्चन ट्रस्टला पत्रही देण्यात आले की, परवेश कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या नावे लिझ ट्रान्सफर करावी. मात्र त्यावेळेस देखील फर्नांडिस यांनी व्यवहार पूर्ण केला नाही आणि त्यावेळी पुन्हा पैसे घेण्यास नकार देण्यात आला.

कोर्टाने याचिका फेटाळली

नंतरच्या काळात आमच्यावर ओढवलेली संकटे पाहत याबाबत फर्नांडिस कुटुंबीय कोर्टात गेले मात्र कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली आणि त्यांना ट्रायबूनल (योग्य त्या कोर्टात दाद मागायला ) मध्ये जायला सांगितले मात्र त्यानंतर देखील त्यांनी ट्रायबूनलमध्ये दाद मागितली नाही. त्या दरम्यान अंजली दमानिया यांनी फर्नांडिस कुटुंबीयांना पुढे करून यामध्ये त्या राजकारण करत राहिल्या. त्यांना पुढे करून फर्नांडीस कुटुंबीयांना त्यांनी कोणताही लाभ घेऊ दिला नाही. आमची तयारी असतानाही फर्नांडीस कुटुंबीयांनी व्यवहार पार पाडला नाही.

विनाअट धनादेश दिला

त्यानंतर मागील वर्षी श्रीमती अंजली दमानिया यांनी सुप्रिया सुळे यांच्या मार्फत संपर्क साधून त्यांनी मध्यस्ती करण्याची विनंती केली होती. याबाबत आम्हालाही तशी विचारणा करण्यात आली होती. त्यामुळे आमच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. त्यावेळी क्लाउड फर्नांडिस यांचे निधन झाल्याचे आम्हाला समजले तेव्हा सुरुवातीलाच रु. 50 लाखाचा धनादेश आम्ही विनाअट त्यांना देऊ केला तो त्यांनी स्वीकारला परंतु बँकेत जमा केला नाही किंवा त्यांना जमा करू दिला नसावा.

वकिलांच्या सल्ल्याविरुद्ध काही निर्णय

सुप्रिया सुळे यांच्या मध्यस्तीमुळे आणी श्रीमती फर्नांडिस यांचे वय बघता जवळपास सर्व मागण्या किंवा त्यांनी करारानुसार पूर्तता करण्याच्या सर्व अटी-शर्ती आम्ही बाजूला करुन व वकिलांच्या सल्ल्याविरुद्ध आम्ही काही निर्णय घेतले. त्यांना आम्ही पैसे देखील दिले होते मात्र तेही त्यांनी नाकारले होते.

दमानियांची मीडिया स्टंटबाजी

मात्र आता सध्या राज्यात ओबीसींची मोठी लढाई राज्याचे ज्येष्ठ छगन भुजबळ आणि आम्ही लढत आहोत काल झालेली सभा पाहिल्यानंतर त्यामध्ये राजकारण करण्यासाठी अंजली दमानिया यांनी मीडिया स्टंटबाजी सुरु केली असल्याचा आरोपही आता समीर भुजबळ यांनी केला आहे. आमचे देणे लागत नसतानाही माणुसकीच्या नात्यातून आम्ही मोबदला देण्याची तयारी दर्शविली मात्र तरी देखील दमानिया यामध्ये राजकारण आणून आपली पोळी भाजून घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

हे ही वाचा >> प्रसिद्ध अभिनेत्याचा बंद कारमध्ये सापडला मृतदेह! पोलिसांनी सांगितली धक्कादायक माहिती

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज