For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

उद्धव ठाकरेंची सोडली साथ, मुंबईतील 'हे' तीन स्थानिक नेते शिंदेंच्या सेनेत

10:06 AM Sep 27, 2023 IST | भागवत हिरेकर
उद्धव ठाकरेंची सोडली साथ  मुंबईतील  हे  तीन स्थानिक नेते शिंदेंच्या सेनेत
प्रवीण शिंदे, प्रतिमा खोपडे, स्नेहल शिंदे या तीन माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत केला प्रवेश.
Advertisement

Shiv Sena News in Marathi : थेट उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत एकनाथ शिंदेंनी बंड केलं. शिवसेना आमदारांना सोबत घेत शिंदे भाजपसोबत गेले आणि मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती अजूनही सुरूच आहे. उद्धव ठाकरेंना मुंबईत पुन्हा एकदा धक्का बसला आहे. मुंबईतील तीन नगरसेवकांनी शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय... ते तीन नगरसेवक कोण आणि त्यांनी ठाकरेंची साथ का सोडली?

Advertisement Whatsapp share

एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत राज्यातील अनेक आमदार गेले. मुंबईतील स्थानिक नेते उद्धव ठाकरेंच्या बाजूने असल्याचे दिसत होते. पण, गेल्या काही महिन्यांत ठाकरेंचे निष्ठावंत म्हणवून घेणाऱ्या अनेकांनी साथ सोडलीये. त्यात आणखी तीन नगरसेवकांची भर पडली असून, हा ठाकरेंसाठी धक्का असल्याचे मानले जात आहे.

Advertisement

हेही वाचा >> शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लांबणार! असं आहे सुनावणी वेळापत्रक

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तीन माजी नगरसेवकांनी मंगळवारी म्हणजे 26 सप्टेंबर रोजी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

Advertisement सब्सक्राइब करा

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत कुणी केला प्रवेश?

जोगेश्वरी येथील प्रभाग क्रमांक 73 चे माजी नगरसेवक प्रवीण शिंदे, वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील माजी नगरसेविका प्रतिमा खोपडे आणि प्रभाग क्रमांक 88 च्या माजी नगरसेविका स्नेहल शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला आहे. यावेळी जोगेश्वरी, वर्सोवा आणि विलेपार्ले विभागातील अनेक पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.

हेही वाचा >> NCP Split : राष्ट्रवादी कुणाची? निकालाआधीच अजित पवारांचं मोठं विधान

33 माजी नगरसेवक... शिंदेंचा दावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी असा दावा केला की, "मुंबईत आतापर्यंत उबाठा गटाच्या 33 माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला असून, आता ही संख्या 36 झाली आहे."

Advertisement

एकनाथ शिंदे काय बोलले?

या पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "महायुती सरकार सत्तेत आल्यापासून मुंबईत अनेक विकासकामे वेगाने सुरू झाली आहे. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय शहराला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय शहर बनवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. मुंबईतील रखडलेल्या इमारतींचा पूर्णविकासाला गती देऊन मुंबईतून बाहेर गेलेला मराठी माणूस पुन्हा मुंबईत घेऊन येणार", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज