For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Shiv Sena : शिंदेंच्या नेत्यांमध्येच कुस्ती, कदमांविरोधात कीर्तिकरांनी थोपटले दंड

10:14 AM Nov 08, 2023 IST | भागवत हिरेकर
shiv sena   शिंदेंच्या नेत्यांमध्येच कुस्ती  कदमांविरोधात कीर्तिकरांनी थोपटले दंड
Ramdas kadam gajanan kirtikar news : रामदास कदमांनी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघावर दावा केल्यानंतर गजानन कीर्तिकरांनी थेट विरोध केलाय.
Advertisement

Ramdas kadam Gajanan Kirtikar : राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप कसं होईल, असा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. कुणाला त्याग करावा लागणार आणि कुणाला जास्त जागा मिळणार, याबद्दलचे चित्र अजूनही स्पष्ट नाही. तर दुसरीकडे शिंदेंच्या सेनेत मात्र नेत्यांची मतदारसंघासाठी कुस्ती सुरु झाल्याचे दिसत आहे. शिंदेंच्या सेनेतील दोन ज्येष्ठ नेते म्हणजे रामदास कदम आणि खासदार गजानन कीर्तिकर हे एकमेकांविरुद्ध आमने-सामने आलेत. (Gajanan Kirtikar Reply to Ramdas Kadam)

Advertisement Whatsapp share

रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांच्यात जुंपलीये ती मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावरून. झालं असं की, रामदास कदम यांनी दापोलीत माध्यमांशी बोलताना मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार, याबद्दल एक विधान केले.

Advertisement

रामदास कदमांचं विधान काय?

"गजानन कीर्तिकर हे जर का उभे राहिले नाहीत, तर या लोकसभा मतदारसंघातून सिद्धेश कदम उमेदवारी मागतील आणि तो आपला हक्क आणि अधिकार आहे. पण, गजाभाऊ जर का इकडे उभे राहिले तर सिद्धेश कदम उभे राहणार नाही", असं राजकीय भाष्य रामदास कदम यांनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावरून केले होते.

Advertisement सब्सक्राइब करा

हे ही वाचा >> वेदनेने कासावीस, तरीही खेळला; मॅक्सवेलने मोडला कपिल देव यांचा विक्रम

रामदास कदम यांनी गजानन कीर्तिकर यांच्या मतदारसंघावरच दावा केला. इतकंच नाही, तर मुलगा सिद्धेश कदम हे मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असंही स्पष्ट केले. त्यांच्या या विधानानंतर खासदार गजानन कीर्तिकरांनी भूमिका मांडली आणि रामदास कदमांना चांगलंच सुनावलं.

गजानन कीर्तिकरांनी काय दिलं उत्तर?

कदमांच्या विधानावर कीर्तिकर म्हणाले की, "एका घरात दोन भावांना तिकीट देता येतं का? तिकीट द्यायचं पक्षाने ठरवलं, तर मी विरोध करणार", असं सांगत त्यांनी थेट कदमांविरुद्ध दंड थोपटलेत.

Advertisement

खासदार कीर्तिकर असेही म्हणाले की, "गेल्या दहा वर्षात उत्तर पश्चिम मतदारसंघात काम केलं आङे. ही जागा पुन्हा निवडून आणायची आहे. त्यामुळे निवडणूक लढवण्याचा निर्णय मी घेतला आहे. सिद्धेश कदमांच्या उमेदवारीबद्दल निर्णय झालेला नाही. आगामी निवडणुकीत मी साडेतीन लाखांहून अधिक मतांनी निवडून येईल", असे राजकीय भाकित कीर्तिकरांनी केले.

हे ही वाचा >> OBC: ‘आमच्या तोंडाकडे बघून तुम्ही इतके वर्ष…’, प्रकाश शेंडगे मराठा आरक्षणाबाबत आक्रमक

"पक्षात काही माणसं आली आहेत. त्यांचे काही छुपे अजेंडे असू शकतात. सिद्धेश कदमबद्दल कदम बोलले. पण, एकाच घरात दोन भावांना तिकीट देता येते का? पक्षानं तिकीट द्यायचं ठरवलं तर मी विरोध करेन. मला तिकीट द्यायचं नसेल, तर कुठल्यातरी चांगल्या व्यक्तीला द्यावं", असे म्हणत कीर्तिकरांनी सिद्धेश कदमांच्या उमेदवारी विरोध केला.

रामदास कदमांना कीर्तिकरांनी सुनावलं

"रामदास कदमांनी स्वतःचा मुलगा निवडणूक लढणार, हे जाहीर करण्यापेक्षा आनंदराव अडसूळ किंवा त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळांबद्दल का बोलत नाहीत? अनेक पर्याय आहेत. मी ३६ विधानसभा मतदारसंघात आढावा घेतला. मी पक्षबांधणीसाठी पुढाकार घेतलाय, पण संधी मिळत नाही", असे सांगत कीर्तिकरांनी कदमांना सुनावलं आहे.

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ महायुतीत कुणाकडे जाणार, हे अद्याप निश्चित नसतानाच शिंदेंच्या दोन नेत्यांमध्ये राजकीय लढाई सुरू झालीये. त्यामुळे शिंदेंच्या सेनेत सर्व काही आलबेल नाही, हेच समोर आलंय.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज