For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Gajanan Kirtikar : 'शरद पवारांच्या गाडीत...', कीर्तिकरांनी सांगितला कदमांच्या गद्दारीचा इतिहास

11:11 AM Nov 13, 2023 IST | भागवत हिरेकर
gajanan kirtikar    शरद पवारांच्या गाडीत      कीर्तिकरांनी सांगितला कदमांच्या गद्दारीचा इतिहास
शिंदेंच्या शिवसेनेतील दोन नेत्यांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला आहे. रामदास कदमांनी टीका केल्यानंतर गजानन कीर्तिकरांनी पलटवार करत इशारा दिलाय.
Advertisement

Gajanan Kirtikar Ramdas Kadam News : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावरून शिंदेंच्या शिवसेनेतील दोन नेते एकमेकांवर आगपाखड करताहेत. रामदास कदम यांनी केलेल्या विधानानं दोन्ही नेत्यांत राजकीय कुस्ती सुरू झाली. खासदार गजानन कीर्तिकरांनी दिलेल्या उत्तरानंतर कदम संतापले आणि त्यांनी 'गजाभाऊ, निवडणुकीला जरूर उभे रहा. फक्त फॉर्म भरून घरात बसू नका. पक्षाची बेईमानी होणार नाही, पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू नका", अशा शब्दात पलटवार केला. त्यामुळे कीर्तिकरांच्या संयमाचा कडेलोट झाल्याचं दिसलं. संतापलेल्या कीर्तिकरांनी थेट कदमांच्या गद्दारीचाच इतिहास सगळ्यांना सांगितला. (Gajanan Kirtikar Reply to Ramdas Kadam)

Advertisement Whatsapp share

झालं असं की मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावर रामदास कदमांची नजर आहे. त्यांनी तसं बोलूनही दाखवलं. गजानन कीर्तिकरांचं वय झालंय. ते लढणार नसतील, तर सिद्धेश कदम या मतदारसंघातून लढतील, असं म्हणत कदमांनी मतदारसंघावर दावा केला. त्यावर एकाच घरात दोन मुलांना तिकीट कसं देता येईल, असा प्रश्न कीर्तिकरांनी केला.

Advertisement

रामदास कदमांनी डिवचलं, गजानन कीर्तिकरांना नेमकं काय बोलले?

त्यानंतर कदमांनी कीर्तिकरांना थेट हल्ला केला. "गजाभाऊ तुम्ही निवडणुकीला उभे रहा. तुमचा मुलगाही तुमच्या मतदारसंघात उभा राहणार आहे. फक्त फॉर्म भरून घरात बसू नका. पक्षाची बेईमानी होणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला विरोध करण्याचं कारण नाही. एकाच ऑफिसमध्ये बाप आणि बेटा बसतात. एकाच ऑफिसमध्ये बसून दोघे काय करतात हे सगळी दुनिया बघतेय. मुलाला तिकडून उभं करायचं आणि तुम्ही फक्त फॉर्म भरायचा. मुलाला बिनविरोध निवडून आणायचं असा प्रकार होणार नाही, याची काळजी घ्या. पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू नका, एवढीच हातजोडून विनंती आहे", असं कदम म्हणाले.

Advertisement सब्सक्राइब करा

कीर्तिकर म्हणाले, "कदमांच्या गद्दारीचा इतिहास फार मोठा"

रामदास कदमांनी टीका केल्यानंतर कीर्तिकरांनी त्यांच्या गद्दारीचा शिक्का मारला. ते म्हणाले, "रामदास कदम यांचा गद्दारीचा इतिहास फार मोठा आहे. 1990 साली मी जेव्हा मालाड विधानसभेतून निवडणुकीसाठी उभा होतो, त्याचवेळेला रामदास कदम खेडमधून निवडणूक लढवत होते. माझ्या मालाड विधानसभा क्षेत्रातील कांदिवलीमधील सर्व कार्यकर्ते त्यांनी खेडला नेले होते व मला पाडण्यासाठी अथक प्रयत्न केले, पण ते यशस्वी झाले नाहीत. मी १० हजार मताधिक्याने विजयी झालो."

हे ही वाचा >> ‘मुख्यमंत्री शिंदे सध्या अल्लाबक्षच्या भूमिकेत’, ठाकरेंच्या सेनेनं डिवचलं

राष्ट्रवादीत जाण्यासाठी शरद पवारांशी चर्चा

गजानन कीर्तिकर यांनी एक मोठा गौप्यस्फोटही केला. रामदास कदम राष्ट्रवादीत जाणार होते आणि त्यांनी शरद पवारांशीही चर्चा केली होती, असा दावा त्यांनी केला. "खेड-भरणा नाका ते भोर शरद पवार यांच्या गाडीत बसून रामदास कदम राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत सविस्तर चर्चा करीत होते, हे त्यांनी विसरू नये आणि खेडमधील शिवसैनिक देखील विसरलेले नाहीत", असं कीर्तिकर म्हणाले.

Advertisement

"एवढेच कशाला कांदिवली पूर्व महानगरपालिकेच्या वार्डामधून त्यांचा सख्खा भाऊ सदानंद कदम शिवसेना पक्षातून निवडणूक लढत असताना त्यांना निवडून आणू नका म्हणून सर्व कार्यकर्त्यांना रामदास कदम दमबाजी करीत होते. अनंत गीते यांना देखील २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पाडण्यासाठी रामदास कदम यांनी भरपूर मेहनत घेतली, परंतु कोकणातील निष्ठावान शिवसैनिक गीतेंच्या पाठीशी उभे राहिल्यामुळे प्रचंड मताधिक्याने ते विजयी झाले", असा गौप्यस्फोट गजानन कीर्तिकरांनी रामदास कदमांबद्दल केला.

हे ही वाचा >> OBC नोंद असलेला शरद पवारांचा दाखला व्हायरल, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

"आजमितीस त्यांचा मुलगा सिद्धेश कदम याला लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा झाली आहे, म्हणून ते विविध मार्गांनी खोट्या बातम्या वृत्तपत्र व सोशल मीडियावर प्रसारित करून वातावरण गढूळ करण्याचा निष्फळ प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या दबावतंत्राला शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे थारा देणार नाहीत, अशी मला व सर्व शिवसैनिकांना खात्री आहे. त्यामुळेच वैफल्यग्रस्त झाल्यामुळे रामदास कदम आदळआपट करीत आहेत. त्यांनी हे निष्फळ प्रयत्न थांबवावेत, असा मी त्यांना इशारा देत आहे", असा दमच कीर्तिकरांनी रामदास कदमांना भरला.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज