For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Gram Panchayat election Result : हर्षवर्धन पाटलांना अजित पवार गटाकडून धक्का!

01:47 PM Nov 06, 2023 IST | भागवत हिरेकर
gram panchayat election result   हर्षवर्धन पाटलांना अजित पवार गटाकडून धक्का
इंदापूर तालुक्यात दोन ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. यात अजित पवार गटाने हर्षवर्धन पाटील यांना धक्का दिला.
Advertisement

Gram Panchayat election Result 2023, Harshwardhan Patil : राज्यात 2 हजार 359 ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. स्थानिक राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या निवडणुकांमध्ये राजकीय नेत्यांचेही वर्चस्व पणाला लागले होते. अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल आले असून, भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांना स्वतःच्या बाल्लेकिल्ल्यात म्हणजे इंदापुरातच झटका बसला आहे. (Harshawardhan Patil setback in Gram panchayat election 2023)

Advertisement Whatsapp share

महाराष्ट्रात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल अनेकांना धक्का देणारे ठरले आहेत. 2 हजार 359 ग्रामपंचायतींपैकी काही ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या. तर काही ठिकाणी मतदान घेण्यात आले. यात स्थानिक पातळीवरील राजकारण बघायला मिळालं. महत्त्वाचं म्हणजे अनेक नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात वर्चस्व मिळवण्याचे प्रयत्न केले, मात्र त्या अपयश आले.

Advertisement

हर्षवर्धन पाटलांच्या इंदापुरात अजित पवार गटाने उधळला गुलाल

अजित पवार गटाने भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांना त्यांच्याच मतदारसंघात धक्का दिला. इंदापूरमधील शिंदेंवाडी आणि वकीलवस्ती ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. या दोन्ही ग्रामपंचायतींवर अजित पवार गटाने एक हाती सत्ता मिळवली आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

Gram Panchayat Election Results : महायुतीकडे 600 हून अधिक ग्रामपंचायती, महाविकास आघाडीकडे किती ग्रामपंचायती?

वकीलवस्ती ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभव भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना धक्का मानला जात आहे. वकीलवस्ती ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत अजित पवार गटाच्या वनिता बाळू भोसले या विजयी झाल्या आहेत. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या 9 सदस्यांसाठी निवडणूक झाली. त्यात 6 सदस्य अजित पवार गटाचे विजयी झाले. 3 उमेदवार भाजपचे विजयी झाले आहेत.

Gram Panchayat Election Result : रोहित पवारांना शिंदेंनी कर्जतमध्ये दिला झटका

शिंदेवाडी ग्रामपंचायत सरपंचपद निवडणुकीत अजित पवार गटाच्या पल्लवी सौरभ झगडे या विजयी झाल्या आहेत. सरपंचपदासह अजित पवार गटाने 9 जागांवर विजय मिळवला आहे. अजित पवार गटाने बारामतीमधील 18 ग्रामपंचायतींवर अजित पवार गटाने विजयी झेंडा फडकावला आहे.

Advertisement

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज