For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Drugs वरून संजय राऊतांचं खळबळजनक विधान, 'मुख्यमंत्र्यांचं कुटुंब ड्रग्स व्यवहारात...'

09:33 PM Nov 04, 2023 IST | रोहित गोळे
drugs वरून संजय राऊतांचं खळबळजनक विधान   मुख्यमंत्र्यांचं कुटुंब ड्रग्स व्यवहारात
Drugs प्रकरणावरून संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर खळबळजनक आरोप
Advertisement

Sanjay Raut Accusation Cm Eknath Shinde over Elvish Yadav: मुंबई: ड्रग्स प्रकरणावरून सध्या जोरदार राजकारण सुरू आहे. त्यातच एल्विश यादवच्या अटकेवरून मुख्यमंत्र्यांवर विरोधक अत्यंत आक्रमकपणे टीका करत आहेत. याच मुद्द्यावर शिवसेना (UBT)नेते संजय राऊत यांनी अत्यंत खळबळजनक असं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. (in elvish yadav drug case are cm eknath shinde family and political family involved in drug dealing controversial statement of sanjay raut)

Advertisement Whatsapp share

'त्या व्यक्तीला 'वर्षा'वर कोणी निमंत्रित केलेलं? मुख्यमंत्री निवासस्थानाशी काय संबंध आहे? काय मुख्यमंत्र्यांचं कुटुंब किंवा त्यांचं राजकीय कुटुंब ड्रग्स व्यवहारात सहभागी आहेत?' असं खळबळजनक विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

Advertisement

'ड्रग माफिया मुख्यमंत्र्यांच्या घरी गणपतीची आरती करतोच कसा?'

'आपण पाहिलं असेल की, या देशाचा सर्वात मोठा ड्रग्स माफिया.. जो सापाचं विषही विकायचा आणि रेव्ह पार्टीत त्याचा वापरही केला जातो. तोच व्यक्ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जातो. त्याचं तिथे स्वागत केलं जातं. त्याच्या हाताने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणपतीची आरती केली जाते. त्याचं जे स्वागत झालं भव्य.. मला जे वाटतं महाराष्ट्रात जो ड्रग्सचा व्यापार सुरू आहे मोठ्या प्रमाणात काय त्यांचे सूत्रधार सरकारमध्ये तर नाहीत?

Advertisement सब्सक्राइब करा

हे ही वाचा>> Elvish Yadav : रेव्ह पार्टीचा बेत, 5 कोब्रा अन् विष; Bigg Boss एल्विशवर गुन्हा

'मुख्यमंत्र्यांकडे इंटेलिजन्स नाही का? की त्यांच्या बंगल्यावर कोण येतो कोण जातो यासाठी.. जी माफियागिरी वाढली त्याचं केंद्रबिंदू हे मंत्रालयाचा सहावा मजला आहे.' अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली आहे.

'मुख्यमंत्र्यांचं कुटुंब किंवा त्यांचं राजकीय कुटुंब ड्रग्स व्यवहारात सहभागी'

'NCB आता काय करतं. जे पाव ग्रॅम चरस-गांजा पकडून मओठी कामगिरी करत असल्याचा आव करायचे. ते आता काय करत आहेत? त्या व्यक्तीला 'वर्षा'वर कोणी निमंत्रित केलेलं? मुख्यमंत्री निवासस्थानाशी काय संबंध आहे? काय मुख्यमंत्र्यांचं कुटुंब किंवा त्यांचं राजकीय कुटुंब ड्रग्स व्यवहारात सहभागी आहेत?' असं खळबळ उडवून देणारं विधान देखील संजय राऊत यांनी केलं आहे.

Advertisement

'मुख्यमंत्र्यांच्या राजकीय कुटुंबाचे खासदार खतरनाक ड्रग्सचे सेवन करतात'

'मुख्यमंत्र्यांच्या राजकीय कुटुंबात कोणी ड्रग्सचं सेवन करतं? नाहीतर मी तुम्हाला याबाबतची माहिती देईन. मुख्यमंत्र्यांच्या राजकीय कुटुंबाचे किती खासदार किती प्रकारच्या खतरनाक ड्रग्सचे सेवन करतात दिल्लीत ही माहिती हवी असेल तर मी देईन.' असं गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केलं आहे.

हे ही वाचा>> Elvish Yadav : कोब्राचं विष, तरुणी, रेव्ह पार्ट्या अन् एल्विश, वाचा Inside Story

'पण देशाला जाणून घ्यायचं आहे की, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांकडून आणि मुख्यमंत्र्यांकडून की, या व्यक्तीला कोणी आणलं आणि त्याचं स्वागत कोणी केलं.. मुख्यमंत्र्यांसोबत त्याची भेट कोणी घडवली? त्याच्या हातात गणपतीच्या आरतीचं ताट कोणी दिलं? मुख्यमंत्री त्याच्यासोबत कसे उभे राहिले? हे खूपच गंभीर प्रकरण आहे.' असं म्हणत संजय राऊत यांनी ड्रग्स प्रकरणावरून शिंदे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

राऊतांचा गंभीर आरोप, मुख्यमंत्री शिंदेंनी काय दिलं उत्तर?

वर्षा बंगला हा ड्रग्स माफियाचाा अड्डा झालाय यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'विरोधकांना काहीच काम राहिलेलं नाही. सकाळी उठलं की त्यांना राजकारण करायचं, वेगवेगळ्या कुरघोड्या करायच्या आणि वातावरण दूषित करायचं, इतकंच काम विरोधकांना राहिलेलं आहे. त्यामुळे आम्ही आमच्या कामावर लक्ष देत असतो.'

'आम्ही सकाळी उठलं की लोकांची काम करतो, लोकांमध्ये जातो. आम्ही कामातून उत्तर देतो.. इगो ठेवून बंद केलेली कामं आम्ही पुढे नेतो. यामुळं जे कोणी बोलतायेत त्यांना काही बोलायचं नाही.' असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊतांनी केलेल्या ड्रग्स माफियाच्या टीकेला बगल दिली.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज