For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Maratha Reservation: Chhagan Bhujbal मनोज जरांगेवर तुटून पडले, 10 जहरी वार

10:15 PM Nov 17, 2023 IST | मुंबई तक
maratha reservation  chhagan bhujbal मनोज जरांगेवर तुटून पडले  10 जहरी वार
छगन भुजबळ यांची मनोज जरांगेवर तुफान टीका
Advertisement

Chhagan Bhujbal vs Manoj Jarange: जालना: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या या मागणीवर आता मनोज जरांगे-पाटील आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ हे आमनेसामने आले आहेत. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये यासाठी ओबीसी नेत्यांकडून एल्गार सभेचे आज (17 नोव्हेंबर) जालन्यातील अंबडमध्ये आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये छगन भुजबळांनी आपल्या भाषणातून अत्यंत जहरी अशी टीका मनोज जरांगे पाटलांवर केली आहे. (jalna chhagan bhujbal breaks down on manoj jarange 10 venomous blows obc reservation maratha community)

Advertisement Whatsapp share

छगन भुजबळांचे मनोज जरांगेवर 10 जहरी वार

1. ‘आज हे तुमचे जे नवीन.. मराठा समाजाचे दैवत निर्माण झाले आहेत. देव झाले आहेत.. त्यांचं म्हणणं असं आहे की, धनगर, माळी, तेली हे मध्येच घुसले आहेत. लक्षात घ्या.. तुम्हाला कळलं पाहिजे अभ्यास.. त्यांना तर कळणार नाहीच त्यांच्या डोक्याच्या पलीकडचं काम आहे. तुम्हाला कळलं पाहिजे.’

Advertisement

2. कोर्टाने शिक्कामोर्तब केलं आरक्षणावर.. त्यानंतर ओबीसीमध्ये आणखी 201 जातींचा समावेश केला. त्याचा मार्च 1994 मध्ये जीआर निघाला. हे काय असंच आलं काय? कोणाचं खातायं.. कोणाचं खातायं.. काय तुझं खातो काय रे..

Advertisement सब्सक्राइब करा

3. ‘आम्हाला आरक्षण घटनेनं दिलं. यांना काहीच माहीत नाही. हे सकाळी उठतात.. आणि आमची लेकरं-बाळं, आमची लेकरं-बाळं.. दोन शब्दच त्याला येतात आमची लेकरं-बाळं. मघाशी सांगितलं.. बाकीच्यांची लेकरं-बाळं नाहीत का? परत पुढे काय सांगतो.. छगन भुजबळ बेसन-भाकर खाऊन आला तुरूंगात..’

4. ‘हो खाऊन आलो. मी छगन भुजबळ दिवाळीत सुद्धा बेसन-भाकर ठेचा आणि कांदा फोडून खातो. पण स्व:कष्टाचं खातो. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही.’

Advertisement

हे ही वाचा>> Chhagan Bhujbal:’तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही…’, भुजबळांनी थेट जरांगेंचं खाणंच काढलं!

5. 'आजही मराठा नेते खूप आहेत ना या महाराष्ट्रात.. मराठा तरुणांना मला सांगायचं आहे की, याच्या कुठे नादी लागलात. या दगडाला शेंदूर लावून हा कुठला देव झाला तुझा? याला कळंना वळंना..'

6. अरे काय चाललंय.. मला रोज धमक्या, शिवीगाळ.. उपमुख्यमंत्री फडणवीस त्यांनाही घाण-घाण शिव्या... आणि बस येऊन-जाऊन येवल्यात कसा निवडून येतो ते बघतो.. येवल्यात कसा निवडून येतो ते बघतो.. अरे काय बघतो तू?

7. लाठीचार्ज झाल्यावर शूर सरदार घरात जाऊन झोपले. यांना आमचे टोपे साहेब आणि दुसरे आमचे मित्र रोहित पवार साहेब घरातून घेऊन आले तीन वाजता पहाटे.. म्हणाले बस तिकडे पवार साहेब येणार आहेत. आणि मग पवार साहेबांना आणलं.. पण यांनी हे नाही सांगितलं की, लाठीचार्ज का झाला.

8. पोलिसांना माझं सांगणं आहे की, हे जे गावा-गावात गावबंदीचे फलक ताबडतोब हटवले पाहिजेत. हे लोकशाहीचं राज्य आहे. महाराष्ट्राचा सातबारा काय तुझ्या नावावर लिहून दिलाय का?

हे ही वाचा>> Manoj Jarange : ‘त्यांना आवरा, नसता…’, जरांगेंनी भुजबळांविरुद्ध थोपटले दंड; शिंदे, फडणवीस, पवारांना काय दिला इशारा?

9. त्यांना शिकवायला तीन न्यायमूर्ती गेले.. ते आता शिकवणार अशा रितीने रिपोर्ट तयार करायचाय. अरे व्वा.. हे बसले उपोषणाला पाणी पिणार नाही.. म्हणाले आमक्या-आमक्या आश्रमाचे साधू महाराज आले म्हणून मी पाणी पितो.. आता मी महाराजांचं म्हणणं नाकारू शकत नाही.. म्हणून पाणी पितो.. मग आले न्यायमूर्ती..

10. मला तर गंमतच वाटली. आमचे सगळे मंत्री सुद्धा.. निश्चितपणे त्यांच्या कंबरेला शेक द्यायला लागला असेल एवढे ते वाकले होते.. उठा.. उठा.. अरे काय रे.. बरं तुम्ही गेला तर गेला न्यायमूर्तींना पण सोबत नेलं. न्यायमूर्ती म्हणतात सर, सर याला.. अरे हा पाचवी शिकला की नाही माहिती नाही..

अशी विधानं छगन भुजबळ यांनी केली आहेत. त्यामुळे आता छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे असा सामना सध्या रंगला आहे.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज