For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

'शरद पवारांच्या शाळेच्या दाखल्यावर...', स्पष्टीकरण देत जयंत पाटलांची नामदेव जाधवांवर टीका

02:52 PM Nov 13, 2023 IST | प्रशांत गोमाणे
 शरद पवारांच्या शाळेच्या दाखल्यावर      स्पष्टीकरण देत जयंत पाटलांची नामदेव जाधवांवर टीका
jayant patil reaction on sharad pawar viral obc certificate supriya sule maharashtra politics
Advertisement

Jayant Patil reaction on Sharad Pawar viral obc certificate : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांचा ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा दाखला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हायरल दाखवल्यावरून शरद पवार ओबीसी असल्याचा दावा केला जात आहे. मात्र शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी हा दाखला खोटा असल्याचा दावा केला. यानंतर आता या व्हायरल दाखल्यावर जयंत पाटलांनी (Jayant Patil) प्रतिक्रिया दिली आहे.पवार साहेबांना बदनाम करण्याच हे षडयंत्र आहे, तसेच दाखला खोटा असल्याचे जयंत पाटलांनी स्पष्ट केले. (jayant patil reaction on sharad pawar viral obc certificate supriya sule maharashtra politics)

Advertisement Whatsapp share

जयंत पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जयंत पाटलांनी राज्यातील विविध प्रश्नावर भाष्य केले. जयंत पाटलांना यावेळी शरद पवार यांच्या व्हायरल दाखल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. या व्हायरल दाखल्यावर जयंत पाटील म्हणाले, नामदेव जाधव प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि शरद पवारांना बदनाम करण्यासाठी हे सगळं करतोय. तसेच शरद पवार यांचं व्हायरल होणारं प्रमाणपत्र चुकीचं आहे.

Advertisement

हे ही वाचा : ‘मला मुख्यमंत्री करा, एका चुटकीत…’, संभाजीराजे छत्रपतींचं विधान चर्चेत

नामदेव जाधव हा मुद्दामुन प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि लोकांमध्ये पवार साहेबांबद्दल गैरसमज पसरवण्यासाठी बदनामीचा उद्योग करतोय. त्यात भर म्हणून पवार साहेबांच खोट ओबीसी प्रमाणपत्र दाखवण्याचा प्रयत्न प्रसार माध्यम आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून होतो आहे. महाराष्ट्रातील जनतेला पवार साहेबांबद्दल गैरसमज पसरवणे त्यांची बदनामी करणे आणि त्यांनी मागच्या काळात काय केले असा चुकीचा प्रश्न विचारणे. त्यांच ओबीसी प्रमाणपत्र प्रसिद्धी करणे. पवार साहेबांना बदनाम करण्याचे हे षड्यत्र आहे. मुळ मुद्यावरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.

Advertisement सब्सक्राइब करा

पवार साहेबांचा शाळेचा दाखला आहे आणि त्यात मराठा असल्याचा उल्लेख आहे.त्यात कुणीही काही बदल करून काहीही दाखवत असतील तर त्याच्यावर आमचे कार्यकर्ते तक्रारी करतील, असे जयंत पाटील म्हणाले.

हे ही वाचा : मौलाना रहीमुल्ला तारिकची पाकिस्तानात हत्या, ‘जैश’च्या दहशतवाद्याबरोबर होते जवळचे संबंध

Advertisement
Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज