For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

'होय माझ्या पाठीशी मोठी शक्ती', जरांगे-पाटलांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

03:30 PM Nov 21, 2023 IST | mahadev kamble
 होय माझ्या पाठीशी मोठी शक्ती   जरांगे पाटलांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहे का असा सवाल उपस्थित केल्यानंतर जरांगे पाटलांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आमच्या मागं कोणी नाही, फक्त एकच आहे तो म्हणजे राज्यातील कानाकोपऱ्यातील मराठा समाज. आम्ही आमच्या समाजाचे दुःख मांडतो, जे दुःख आहे ते मांडतो.
Advertisement

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण (Maratha Community Reservation) मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु झाल्यापासून ते अनेक गोष्टीमुळे चर्चेत आले आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ, विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यावर चर्चाही केली आहे. मात्र तरीही अजून त्याबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नव्हता. त्यानंतर मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांच्याविषयी वक्तव्य करताना म्हटले होते की, त्यांना भेटून आरक्षण मिळणार नाही असं सांगितले होते, मात्र आता मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहे, त्यातून जातीय तेढ निर्माण करायचे आहे का असे सवाल राज ठाकरे यांनी केले होते. त्यानंतर जरांगे पाटील यांनी आज ठाण्यातून (Thane) बोलताना त्यांच्या प्रश्नांना थेट उत्तर देत आमच्या मागं एकच आहे, तो म्हणजे मराठा समाज अशा शब्दात जरांगे पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

Advertisement Whatsapp share

जरांगे पाटलांच्या मागे कोण?

राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहे का असा सवाल उपस्थित केल्यानंतर जरांगे पाटलांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आमच्या मागं कोणी नाही, फक्त एकच आहे तो म्हणजे राज्यातील कानाकोपऱ्यातील मराठा समाज. आम्ही आमच्या समाजाचे दुःख मांडतो, जे दुःख आहे ते मांडतो. त्यामुळे जर आमच्या मागे कोण सत्ताधारी असते आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे बोलायला लावले असते तर हे सगळं बोलता आले नसते असंही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आम्हाला सत्ताधाऱ्यांनी बसवलं आहे हा आरोपही त्यांनी फेटाळून लावला आहे.

Advertisement

हे ही वाचा >> Covid 19 : कोरोना लसीमुळे भारतात होतायेत तरुणांचे मृत्यू?, ICMR चा रिपोर्ट

छगन भुजबळांवर निशाणा

आरक्षणाच्या मुद्यावरुन आणि राज ठाकरे यांना जोरदार प्रत्युतर देत त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. मंत्री छगन भुजबळ यांना मी कधीच विरोध केला नाही. मात्र त्यांनी ज्यावेळी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यामुळे त्यांच्यावर मला बोलावं लागले. मात्र आमचा विरोध छगन भुजबळ यांना नाही तर त्यांच्या विचारसरणीला विरोध असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. छगन भुजबळ यांनी जाहिरपणेच सांगितले होते की, ओबीसी बांधवांना आरक्षण देऊ नका असंही त्यांनी म्हटले होते.

Advertisement सब्सक्राइब करा

सरकारचा समाचार

मनोज जरांगे पाटील यांनी ठाण्यात येऊन त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. यावेळी त्यांनी राज ठाकरेंना उत्तर देत त्यांनी म्हटले आहे की, आम्ही मुंबईत यायचंच नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी आजच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे, छगन भुजबळ आणि सरकारचा त्यांनी जोरदार समाचार घेतला आहे.

आम्ही शांत बसणारच नाही

मराठा समाजाला आरक्षण मिळवल्याशिवाय आम्ही शांत बसणारच नाही. मात्र त्याचवेळी हे आरक्षण ओबीसी मधून मिळावे अशी मागणीही त्यांनी केली. आम्हाला 50 टक्क्याच्या आती आरक्षण पाहिजे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट करावे. ओबीसी समाजातून आरक्षण मिळावे यासाठी जे पुरावे मिळाले आहेत. त्यासाठी लागणाऱ्या ज्या नोंदी आहेत त्याही मिळाल्या आहेत. त्याच बरोबर हे आरक्षण मिळाले तर दीड कोटीपेक्षाही अधिक लोकांना त्याचा फायदा मिळणार असल्याचेही जरांगे पाटील यांनी सांगितले.

Advertisement

हे ही वाचा >> Ind vs Aus Final : भारत फायनलमध्ये हरला, कपिल देव म्हणाले…

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज