For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Maratha Reservation : ...तर फडणवीसांच्या थेट गळ्यातच पडतो, जरांगे पाटील काय म्हणाले?

11:14 AM Nov 08, 2023 IST | प्रशांत गोमाणे
maratha reservation      तर फडणवीसांच्या थेट गळ्यातच पडतो  जरांगे पाटील काय म्हणाले
maratha reservation manoj jarange patil antarwal sarati agitation devendra fadnavis cm eknath shinde obc reservation
Advertisement

Manoj Jarange Patil On Maratha Reservation : महायुती सरकारमधील मंत्र्यांनीच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र (Kunabi Certificate) देण्यास विरोधातील भूमिका घेतल्याने राज्यात मराठा विरूद्ध ओबीसी असा संघर्ष पेटलाय. ओबीसींनी देखील रस्त्यावरून उतरून आंदोलनाची भाषा केली आहे. अशात मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाचं वाटोळ ओबीसी नेत्यांनी केल्याचा आरोप केला. तसेच देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मराठा आरक्षणाचा जीआर घेऊन यावा, मग भेटत नाही, थेट गळ्यातच पडतो,असे विधान जरांगे पाटलांनी केले. ( maratha reservation manoj jarange patil antarwal sarati agitation devendra fadnavis cm eknath shinde obc reservation)

Advertisement Whatsapp share

मनोज जरांगे पाटलांनी आज प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील मराठा आणि ओबीसी नेत्यांवर गंभीर आरोप केला. ओबीसी नेत्यांनी सरकारवर दबाव टाकला, त्यामुळे आमच्या हक्काचं आरक्षण असूनही आम्हाला मिळालं नाही. 40 वर्ष आमचं वाटोळ झालं. सरकारने हा बॅकलॉक भरला पाहिजे. आम्हाला आमच्या हक्काच्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, ज्यांनी हडपल्या त्यांना हटवलं पाहिजे, अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली.

Advertisement

हे ही वाचा : Shiv Sena : शिंदेंच्या नेत्यांमध्येच कुस्ती, कदमांविरोधात कीर्तिकरांनी थोपटले दंड

तसेच मराठा नेत्यांनी सुद्धा मराठा समाजाचं वाटोळ केलं आहे. आमचं वाटोळ करून ते मुख्यमंत्री आणि मंत्री व्हायला लागलेत. मराठा नेत्यांनी साथ दिली नाही म्हणून आम्ही इतकं वर्ष आरक्षण घालवलं असल्याची टीका देखील जरांगे पाटलांनी मराठा नेत्यांवर केली. जर 24 डिसेंबरपर्यंत आम्हाला आरक्षण मिळालं नाही, तर ओबीसी नेत्यांच नाव जाहिर करणार आहोत. कोण कोण ओबीसींमध्ये 20 वर्षापासून आहेत आणि आपलं आरक्षण कुणी दिलं नाही ती नाव जाहिर करू, असे आव्हान देखील त्यांनी
ओबीसी नेत्यांना दिले.

Advertisement सब्सक्राइब करा

ओबीसी आरक्षणाला कोणताच धक्का लागणार नाही आहे. कारण आम्ही ओबीसीतच आहोत. सरकार जे बोलतोय ते देखील खरचं आहे. कारण सरकार ओबीसींचं देतचं नाही आमचं आमच्या हक्काचं आम्हाला देतेय. कारण आमचे पुरावे सापडले आहेत, असे जरांगे पाटलांनी सांगितले. यासोबत ग्रामीण भागातील ओबीसींना वाटतेय, यांचे पुरावे असून यांना आरक्षण दिले नाही. यांच्या लेकरांच वाटोळ आपल्याच ओबीसी नेत्यांनी केले आहे. त्यामुळे आपण मराठ्यांच्या विरोधाच जायचं नाही, त्यांच्या हक्काचे, पुरावे आहेत, त्यामुळे त्यांना आरक्षण मिळालचं पाहिजे, असे ओबीसींना वाटते.

हे ही वाचा : Buldhana Crime : वासनांध शिक्षकाने आठवीतील विद्यार्थिनीवर वर्गातच केला बलात्कार

तसेच यावेळी जरांगेनी देवेंद्र फडणवीसांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दलचा प्रश्न केला होता. यावर जरांगे म्हणाले, मी कुठे फडणवीसांच्या भेटीची अपेक्षा केली. तुम्ही म्हणलात उपमुख्यमंत्र्यांना भेटायची इच्छा आहे का? माझी तशी आहे. मराठा आरक्षणाचा जीआर घेऊन यावा, मग भेटायची इच्छा काय थेट गळ्यातंच पडतो त्यांच्या (फडणवीसांच्या),असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.

Advertisement

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज