For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Maratha Reservation : '24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर...', जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

12:03 PM Nov 08, 2023 IST | प्रशांत गोमाणे
maratha reservation    24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर      जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
maratha reservation manoj jarange patil warn mahayuti cm eknath shinde government devendra fadnavis obc reservation
Advertisement

Manoj Jarange Patil Warning Eknath Shinde Government : राज्यात सरकारमधील मंत्र्यांनीच ओबीसीतून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोधाचा सुर आवळला आहे मत्र्यांच्या या मताशी अनेक ओबीसी नेत्यांनी देखील सहमती दर्शवली आहे. तसचे ओबीसी समाजाने आंदोलनाचा पावित्राही घेतला आहे. अशात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारलाच इशारा दिला आहे. 'जर 24 डिसेंबरपर्यंत आम्हाला आरक्षण मिळालं नाही, तर ज्या नेत्यांनी आम्हाला आरक्षण दिले नाही, त्या ओबीसी नेत्यांचे (OBC Minister) नाव जाहीर करू', असा थेट इशाराच जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) दिला आहे. (maratha reservation manoj jarange patil warn mahayuti cm eknath shinde government devendra fadnavis obc reservation)

Advertisement Whatsapp share

मनोज जरांगे पाटील आज प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील ओबीसी नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. ओबीसी नेत्यांनी सरकारवर दबाव टाकला, त्यामुळे आमच्या हक्काचं आरक्षण असूनही आम्हाला मिळालं नाही. 40 वर्ष आमचं वाटोळ झालं. सरकारने हा बॅकलॉक भरला पाहिजे. आम्हाला आमच्या हक्काच्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, ज्यांनी हडपल्या त्यांना हटवलं पाहिजे, अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली.

Advertisement

हे ही वाचा : कोब्राचं विष, ड्रग्ज, तरुणी; एल्विश यादवच्या पार्टीत काय असतं? मित्राने सांगितली Inside Story

ओबीसी आरक्षणाला कोणताच धक्का लागणार नाही आहे. कारण आम्ही ओबीसीतच आहोत. सरकार जे बोलतोय ते देखील खरचं आहे. कारण सरकार ओबीसींचं देतचं नाही आमचं आमच्या हक्काचं आम्हाला देतेय. कारण आमचे पुरावे सापडले आहेत, असे जरांगे पाटलांनी स्पष्ट केले.

Advertisement सब्सक्राइब करा

तसेच ओबीसी नेते एकवटले असतील, पण ग्रामीण भागातील ओबीसींना वाटतेय, यांचे पुरावे असून यांना आरक्षण दिले नाही. यांच्या लेकरांच वाटोळ आपल्याच ओबीसी नेत्यांनी केले आहे. त्यामुळे आपण मराठ्यांच्या विरोधाच जायचं नाही, त्यांच्या हक्काचे, पुरावे आहेत, त्यामुळे त्यांना आरक्षण मिळालचं पाहिजे, असे ओबीसींना वाटतं असल्याचे जरांगे पाटलांनी सांगितले.

हे ही वाचा : Glenn Maxwell : वेदनेने कासावीस, तरीही खेळला; मॅक्सवेलने मोडला कपिल देव यांचा विक्रम

मराठा नेत्यांनी सुद्धा मराठा समाजाचं वाटोळ केलं आहे. आमचं वाटोळ करून ते मुख्यमंत्री आणि मंत्री व्हायला लागलेत. मराठा नेत्यांनी साथ दिली नाही म्हणूनच आम्ही इतकं वर्ष आरक्षण घालवलं असल्याची टीका देखील जरांगे पाटलांनी मराठा नेत्यांवर केली. जर 24 डिसेंबरपर्यंत आम्हाला आरक्षण मिळालं नाही, तर ओबीसी नेत्यांच नाव जाहिर करणार आहोत. कोण कोण ओबीसींमध्ये 20 वर्षापासून आहेत आणि आपलं आरक्षण कुणी दिलं नाही ती नाव जाहिर करू, असे आव्हान देखील त्यांनी ओबीसी नेत्यांना दिले.

Advertisement

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज