For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Chhagan Bhujbal : मनोज जरांगेंविरुद्ध दंड थोपटणाऱ्या भुजबळांच्या मागे फडणवीस आहेत का?

08:25 AM Nov 21, 2023 IST | राहुल गायकवाड
chhagan bhujbal   मनोज जरांगेंविरुद्ध दंड थोपटणाऱ्या भुजबळांच्या मागे फडणवीस आहेत का
छगन भुजबळ मनोज जरांगेंविरुद्ध आक्रमक झालेत. त्यामुळे त्यांच्या आडून कोण राजकारण करतंय हा प्रश्न सध्या चर्चेत आहे.
Advertisement

Chhagan Bhujbal Politics Explained : गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आणि ओबीसी हा वाद पेटला आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी केल्यानंतर ओबीसी नेते आक्रमक झालेत. जरांगेच्या उपोषणानंतर ठिकठिकाणी ओबीसी नेत्यांनी देखील उपोषण केलं. आता ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Advertisement Whatsapp share

त्यानंतर भुजबळ आक्रमक झालेत आणि जरांगेंना कडाडून विरोध करत आहेत. भुजबळ आणि जरांगेंमधील वाकयुद्ध अवघा महाराष्ट्र बघत आहे. आता भुजबळांच्या मागे फडणवीस असल्याचा आरोप केला जातोय. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील भुजबळांच्या मागे फडणवीस असल्याचं 'मुंबई Tak'शी बोलताना म्हटलं होतं.

Advertisement

भुजबळांच्या मागे नेमकं कोण आहे? भुजबळ जरांगेंना विरोध का करत आहेत? हेच आपण समजावून घेऊयात...

मराठा आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून तापला आहे. मनोज जरांगे आरक्षण मिळवून देतील असा विश्वास मराठा समाजाला वाटू लागला आहे. त्यातच जरांगेंच्या सुरुवातीच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाल्याने मनोज जरांगे प्रसिद्धी झोतात आले. त्यानंतर त्यांनी उपोषणाचं शस्त्र उगारत मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली.

Advertisement सब्सक्राइब करा

हे ही वाचा >> Chhagan Bhujbal मनोज जरांगेवर तुटून पडले, 10 जहरी वार

त्यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. सुरुवातीला मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी जरांगेंची मागणी होती. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगेंनी मागणी केली.

...अन् भुजबळांकडून जरांगेंना सुरु झाला विरोध

आता ज्यांच्या कुणबी नोंदी आढळतील त्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याबाबतचा जीआर देखील काढला आहे. या सगळ्या घडामोडींनंतर भुजबळ आक्रमक झाले. भुजबळांनी मनोज जरांगेंना विरोध करण्यास सुरुवात केली.

Advertisement

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं अशी भूमिका भुजबळांनी मांडली. त्याचबरोबर न्यायमूर्तीच जर जरांगेंचं उपोषण सोडवायला जात असतील तर आम्हाला न्याय कसा मिळेल असा सवाल देखील भुजबळांनी उपस्थित केला होता.

हे ही वाचा >> ’तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही…’, भुजबळांनी थेट जरांगेंचं खाणंच काढलं!

सुरुवातीला भुजबळ जरांगेंच्या विरोधात आक्रमक झाले, त्यानंतर इतर ओबीसी नेत्यांनी देखील भुजबळांना साथ दिली. भुजबळांनी जरांगेंवर हल्ला चढवत थेट जालण्यातच सभा घेतली. या सभेत देखील जरांगेंवर त्यांनी जोरदार हल्ला चढवला.

भुजबळांच्या मागे देवेंद्र फडणवीस?

या सगळ्यानंतर भुजबळांच्या मागे नेमकं कोण आहे असा प्रश्न विचारला जातोय. रोहित पवारांनी मुंबई तकशी बोलताना फडणवीसांनीच भुजबळांना पुढं केल्याचं म्हटलं. त्यामुळे भुजबळांच्या मागे खरंच फडणवीस आहेत का अशी चर्चा सुरु झाली.

ओबीसी हा भाजपचा कोअर वोटर राहिला आहे. ‘जो ओबीसी की बात करेगा वो देश पे राज करे गा’ असं फडणवीस देखील म्हणाले आहेत. त्याचबरोबर एकीकडे जरांगे उपोषण करत असताना फडणवीस यांनी ओबीसी नेत्यांच्या आंदोलनस्थळाला भेट दिली होती.

जरांगेंच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जमुळे भाजप आणि फडणवीस बॅकफूटवर गेले होते. त्यात सरकारमधील एक मंत्रीच ओबीसींच्या हक्कांबाबत लढत असल्याने भाजपसाठी ते फायद्याचेच आहे. भाजपला जी भूमिका उघडपणे घेता येत नाही ती भुजबळांच्या मार्फत पुढे केली जात आहे.

ओबीसी विरुद्ध मराठा... काय शिजतंय राजकारण?

दुसरीकडे जालण्यातील सभेत देखील भुजबळांनी पोलिसांची आणि त्या अनुषंगाने एक प्रकारे गृह खात्याची पाठराखण केली. जरांगेंच्या सभेवर लाठीचार्ज केल्याचा आरोप केला जातो परंतु पोलिसांवर या आंदोलनात हल्ला झाला आणि त्यात अनेक महिला पोलीस जखमी झाल्या असा आरोप भुजबळांनी केला. दगडफेक झाल्याने लाठीहल्ला केला अशीच भूमिका फडणवीसांनी सुरुवातीला या प्रकरणावर मांडली होती.

दुसरीकडे ओबीसींच्या सभेला पंकजा मुंडेंना भाजपकडून परवानगी देण्यात आली नाही. भाजपचे इतर नेते जात असल्याने पंकजांनी जाऊ नये असं सांगण्यात आलं. त्यामुळे भुजबळांचं महत्त्व कायम राहावं यासाठी ही रणनीती आखली होती का अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

हे ही वाचा >> ‘तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही 160 आमदार पाडू’, कुणी दिला इशारा?

आता भुजबळांना समर्थन देणारे आणि जरांगेंवर टीका करणाऱ्या वडेट्टीवारांनी देखील यु टर्न घेत भुजबळांच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही असं म्हटलं. त्याचबरोबर ‘सत्तेतल्या नेत्यांनी समस्या सोडवायच्या असतात मांडायच्या नाहीत’ असं देखील वडेट्टीवार म्हणाले.

त्यामुळे वडेट्टीवारांनी अचानक यु टर्न का घेतला असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यामुळे भुजबळ यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे येत्या काळात भुजबळ आपलं आंदोलन अधिक तीव्र करतात की भाजपच्या जवळची भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता भुजबळांना फडणवीसांचा पाठींबा आहे का हे येत्या काळात समोर येऊ शकतं.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज