For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Maratha Reservation: 'तर ते वाचलेच नसते..', छगन भुजबळ भडकले

08:23 PM Nov 06, 2023 IST | रोहित गोळे
maratha reservation   तर ते वाचलेच नसते     छगन भुजबळ भडकले
मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान हिंसक घटना घडल्याने छगन भुजबळ संतापले
Advertisement

Chhagan Bhujbal: बीड: 'संदीप क्षीरसागर, जयदत्त क्षीरसागर यांच्या घरीही मोठी जाळपोळ करण्यात आली. त्यांच्या घरातील छोट्या मुलांना तर पलीकडच्या लोकांनी अक्षरश: उंच भितींवरून बाहेर काढलं. जर ते या आगीत सापडले असते तर वाचलेच नसते.' असं म्हणत राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) जे हिंसक आंदोलन करण्यात आलं होतं त्यावर टीका करत प्रचंड संताप व्यक्त केला आहे. (minister chhagan bhujbal was furious over violence that took place during the maratha reservation agitation)

Advertisement Whatsapp share

मराठा आरक्षणाबाबत बोलताना आधीच छगन भुजबळ यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. अशातच त्यांची हिंसक आंदोलनावरून देखील जोरदार टीका केली आहे.

Advertisement

हे ही वाचा >> ”बेईमानी करणाऱ्यांना घरी बसवलं”,ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर CM शिंदेंची ठाकरेंवर टीका

...अन् छगन भुजबळ संतापले!

'लहान-लहान समाजाची लोकं हे ओबीसीमध्ये आहेत. पण कोणाला काही मिळणार नाही. मराठा समाजाला देखील काही मिळणार नाही. ही आमची भूमिका पहिल्यापासून राहिली आहे. तीच भूमिका शरद सर्व पक्षांची आहे. सर्वपक्षीय नेत्यांची हीच भूमिका आहे की, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे यावर एकमत झालं.'

Advertisement सब्सक्राइब करा

'परंतु मला कळलं नाही.. जे काही आंदोलन सुरू झालं त्यात प्रचंड नासधूस करण्यात आली. म्हणजे जर कोणी सापडले असते तर त्यांना जीवे मारण्यात आलं असतं. अशात सगळ्यात जास्त नासधूस झालेले राष्ट्रवादीचे आणि समता परिषदेचे कार्यकर्ते सुभाष राऊत यांचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. त्यांचं हॉटेल जवळजवळ तासभर जळत होतं.'

'तासभर 400-500 लोकांचा जमाव तिथे होता. मी पाहिलं की, सगळ्या प्रकारची हत्यारं घेऊन आले होते. संपूर्ण जाळून टाकण्यात आलं. राखरांगोळी ज्याला बोलतात ती अक्षरश: राखरांगोळी त्या हॉटेलची करण्यात आली. एक तास हा कार्यक्रम सुरू होता. 1-2 पोलीस तिथे उभे होते. ते काहीही करू शकलेले नाही.'

Advertisement

'आमचं जे आहे (आरक्षण) ते शाबूत ठेवा एवढंच आम्ही सांगत होतो. प्रकाश सोळंखे यांच्याबाबतीत देखील तोच प्रकार.. मोठमोठे दगड त्यांच्या घरातील बेडवर पडले होते. कोयते, चॉपरने नासधूस केली.'

'संदीप क्षीरसागर, जयदत्त क्षीरसागर यांच्या घरीही मोठी जाळपोळ करण्यात आली. त्यांच्या घरातील छोट्या मुलांना तर पलीकडच्या लोकांनी अक्षरश: उंच भितींवरून बाहेर काढलं. जर ते या आगीत सापडले असते तर वाचलेच नसते. कशासाठी ही आग लावली?'

'हे एवढं प्लॅनिंगने होतं की, माजलगावची नासधूस करणारी टीम वेगळी इकड्या टीम वेगळ्या.. असं नाही की उद्रेक झाला आणि हल्ला घडला. हे सगळं ठरवून झालं.'

'जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर हे तर काही म्हणाले नव्हते.. तरी त्यांच्या घरी, कार्यालयात जाळपोळ केली.. का तर ते तेली समाजाचे आहेत म्हणून? ओबीसी आहेत म्हणून?'

'आरक्षणाने काही सगळे प्रश्न सुटत नसतात. हे खरं आहे. आरक्षण हे गेले 75 वर्ष दलित समाजाला आहे. परंतु आज देखील झोपडपट्ट्यांमधून दलित समाजच वावरतोय. गरीबी काही दूर झालेली नाही. काही टक्के लोकांना नक्की फायदा मिळतो. पण समाजात जो खालचा वर्ग आहे तो इतरांच्या बरोबर आणण्याचा कार्यक्रम आहे. हा गरीबांचा कार्यक्रम नाही.'

'या सगळ्याची कठोर चौकशी झाली पाहिजे.. पोलीस एवढे हतबल कसे झाले? पोलिसांना हे माहिती नव्हतं? पोलिसांनी त्यांच्या हातातील शस्त्राने कुठेही प्रतिकार केला नाही. याचं कारण पहिल्या दिवशी जरांगे ज्या ठिकाणी उपोषणाला बसले होते त्या ठिकाणी झालेला लाठीहल्ला पोलिसांनी केला ती बाजू प्रकर्षाने पुढे आली आहे.'

'पोलिसांवर हल्ला झाला त्याचीही चौकशी झाली पाहिजे. त्यात किती पोलीस जखमी झाले याचीही चौकशी झाली पाहिजे.' असं म्हणत छगन भुजबळ यांनी हिंसक आंदोलनावरून टीकेची झोड उठवली.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज