For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

भुजबळ वैफल्यग्रस्त..., मराठा आरक्षणावर बच्चू कडूंचं चावडीवर मोठं विधान

11:35 PM Nov 08, 2023 IST | mahadev kamble
भुजबळ वैफल्यग्रस्त     मराठा आरक्षणावर बच्चू कडूंचं चावडीवर मोठं विधान
जर छगन भुजबळ एवढ्या कशा काय नोंदी मिळत आहेत तर त्यावर काय बोलणार असा सवाल बच्चू कडू यांनी केला आहे. त्यातच ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी केल्यामुळेही त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
Advertisement

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंदोलन छेडले आणि अनेकांचे पितळ उघडे पडले. जरांगे पाटील यांच्यामुळे राज्यातील अनेक नेतृत्वाला धक्का पोहचला. त्यामुळेच जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनामुळे आपापली पोळी भाजून घेण्याची स्पर्धा लागली असल्याचा घणाघात प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. (mla chhagan bhujbal frustrated over maratha and obc reservation mla bachchu kadu criticizes)

Advertisement Whatsapp share

राजकारणातील खाचखळगे

आमदार बच्चू कडू यांनी मुंबई तकच्या चावडी बोलताना त्यांनी आपल्या सडेतोड स्टाईलने अनेक प्रश्नांची उत्तर देत मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून चाललेल्या राजकारणातील अनेक खाचखळगे दाखवून दिले. मराठा आंदोलनामुळे आता प्रत्येक राजकीय पक्षाची, नेत्यांची आणि वेगवेगळ्या संघटनेनेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आता कस लागली आहे.

Advertisement

हे ही वाचा >>वडिलांच्या हत्येसाठी मुलाने तुरुंगातच रचला कट, अर्ध्या रात्रीच कांड फसलं अन्…

आपण संधी गमावू नये

आमदार बच्चू कडू यांनी चावडीवर बोलताना सांगितले की, छगन भुजबळ वैफल्यग्रस्त झाले आहे. त्यांच्यावर असा थेट निशाणा साधल्यामुळे भविष्यात भुजबळ-कडू असा वादही रंगण्याची चिन्हं आता दिसू लागली आहे. कारण छगन भुजबळ यांच्या मधल्या काळात अनेक मोठ्या संधी निघून गेल्या आहेत. त्यामुळे येणारी संधी आपण गमावू नये यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केले जात आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून मराठा आंदोलनाबाबत आणि ओबीसी आरक्षणाबाबत अशी वक्तव्यं केली जात असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

एवढ्या नोंदी कशा

राज्यातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. मात्र त्यानंतर आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. त्यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, 1881 पासून निजामकालीन नोंदी मिळत आहेत. तरीही जर छगन भुजबळ एवढ्या कशा काय नोंदी मिळत आहेत तर त्यावर काय बोलणार असा सवाल बच्चू कडू यांनी केला आहे. त्यातच ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी केल्यामुळेही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावरुन बच्चू कडू यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

आरक्षण राहिले बाजूला

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन पुकारले आणि ओबीसी नेतेही आपापला समाज घेऊन उभा राहिले. राज्यातील राजकीय पक्ष आणि काही नेते आम्ही ओबीसींच्या बाजून म्हणत त्यांच्या बाजूने उभा राहिले आहेत. त्यामध्ये छगन भुजबळ, विजय वडेट्टिवार, भाजप आणि इतर राजकीय पक्षही आता सरसावले आहेत. मात्र राज्यातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात काहीच अडचण नाही असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट सांगतिले. कारण तसे संदर्भ ज्या प्रमाणे इतिहास सापडतात तसेच गॅझेटमध्येही तशा नोंदी असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

हे ही वाचा >> 150 मिस्ड कॉल, पत्नीवर संशय; अन् .. सुखी संसाराची ‘ही’ थरकाप उडवणारी कहाणी

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज