For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Gajanan Kirtikar : '...म्हणून रामदास कदम शिवसेनेत राहिले', अनिल परबांचा खळबळजनक गौप्यस्फोट

10:51 PM Nov 13, 2023 IST | ऋत्विक भालेकर
gajanan kirtikar       म्हणून रामदास कदम शिवसेनेत राहिले   अनिल परबांचा खळबळजनक गौप्यस्फोट
ramdas kadam vs gajanan kirtikar anil parab big reavelation about ramdas kadam kafan statement cm eknath shinde maharashtra politics
Advertisement

Anil Parab reaction on Ramdas Kadam vs Gajanan Kirtikar Controversy : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिंदे गटातील नेते रामदास कदम (Ramdas Kadam) आणि गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांच्या वादात आता ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी उडी घेतली आहे. तसेच या वादात पडून अनिल परब यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. गजानन किर्तीकरांनी रामदास कदमांचा उल्लेख गद्दार असा केला होता.या आरोपावर बोलताना गद्दार कोणाला म्हणताय,रामदास कदम डोक्याला कफन बांधून फिरलाय, असे प्रतिउत्तर दिले होते. रामदास कदमांच्या या विधानावर आता अनिल परबांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे. (ramdas kadam vs gajanan kirtikar anil parab big reavelation about ramdas kadam kafan statement cm eknath shinde maharashtra politics)

Advertisement Whatsapp share

जेव्हा राणे पक्षातून बाहेर पडले तेव्हा एकटा रामदास कदम डोक्याला कफन बांधून फिरलाय आणि गद्दार कोणाला म्हणताय असा सवाल रामदास कदमांनी गजानन किर्तीकरांना विचारला होता. यावर आता अनिल परब यांनी रामदास कदमांच विधान खोडून काढलंय. रामदास कदम म्हणतात ना कफन बांधुन गेलो. काय कफन बांधुन गेला नाही, त्यावेळेस नारायण राणेंसोबत पहिलं नाव रामदास कदमांचं होतं. त्यांना विरोधी पक्षनेता केला म्हणून ते शिवसेनेत राहिल्याचा गौप्यस्फोट अनिल परब यांनी केला आहे.

Advertisement

हे ही वाचा : लक्ष्मी पूजन करत होती AAP ची महिला नेता, तेव्हाच पतीने झाडल्या गोळ्या!

भाजप सीट बळकावणार

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीवर बोलताना अनिल परब म्हणाले की, दोन्हीही नेत्यांनी भांडण संपून एकत्र येऊन निवडणूक जरी लढली तरीही अमोल कीर्तिकर आमच्या पक्षातून विजयी होणार आहेत. गजानन किर्तीकर असो किंवा रामदास कदमांचा मुलगा, जिंकणार अमोल किर्तीकरच हे मी छातीठोकपणे सांगतो,असे अनिल परब यांनी सांगितले.

Advertisement सब्सक्राइब करा

तसेच हा मतदार संघ शिंदे गटाला मिळणार का? असा सवाल अनिल परबांना केला असता ते म्हणाले, मला वाटते भाजप यांच्यातला वाद वाढवून ती सिट स्वत:कडे घेईल. आणि यांच्यामध्ये कोणामध्येच हिम्मत नाही की भाजपला डोळे मोठे करून पाहायची, जी काही दादागिरी करतात ती आमच्याकडेच करतायत, अशी टीका देखील शिंदे गटावर केली.

हे ही वाचा : पवार कुटुंबीय दिवाळीत एकत्र येणार का? गोविंद बागेत पाडव्याची जय्यत तयारी पण…

उद्या जर भाजपकडे मतदार संघ गेला, तर रामदास कदमांकडे देवेंद्र फडणवीसांकडे जाऊन बोलायची हिम्मत आहे का? हे दोघे काय करणार आहेत? याच्या मुख्यमंत्र्यांची तरी हिम्मत आहे का? असे रोखठोक सवालच यावेळी अनिल परबांनी उपस्थित केले. त्यासोबत पुढच्या निवडणूकीत शिंदेंसोबत किती लढतील हे देखील तपासून बघा. काही जण कमळावर लढतील, तर काहींना तिकीटच मिळणार नाही. 13 जण त्यांच्यातले असतील तर त्यातले यांचे 3 पण लढणार नाहीत,असे भाकीत देखील अनिल परबांनी केले.

Advertisement

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज