For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

"एक मंत्री उघडपणे...", संभाजीराजे शिंदे सरकारवर भडकले, भुजबळांचा राजीनामाच मागितला

07:29 PM Nov 17, 2023 IST | भागवत हिरेकर
 एक मंत्री उघडपणे      संभाजीराजे शिंदे सरकारवर भडकले  भुजबळांचा राजीनामाच मागितला
छगन भुजबळांच्या भाषणानंतर संभाजीराजे छत्रपती शिंदे सरकारवर संतापले. सरकारला भूमिका स्पष्ट करण्यावरून केला सवाल.
Advertisement

Sambhaji Raje Chhatrapati On Chhagan Bhujbal : 'आपल्यालाही जशास तसे उत्तर द्यावे लागेल", असं म्हणत कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी महासभेत एल्गार केला. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास छगन भुजबळांनी कडाडून विरोध केला. यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावरूनच आता छत्रपती संभाजीराजेंनी शिंदे सरकारवर संताप व्यक्त केला आहे. भुजबळांची जी भूमिका आहे, तीच सरकारची आहे का?, असा सवाल करत संभाजीराजेंनी थेट भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केली. (Sambhaji Raje Chhatrapati slams Chhagan Bhujbal over his statement against Maratha Reservation)

Advertisement Whatsapp share

जालना जिल्ह्यातील अंबड शहरात शुक्रवारी (17 नोव्हेंबर) ओबीसींचा मेळावा पार पडला. छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मेळाव्याला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार गोपीचंद पडळकर आणि इतर नेतेही उपस्थित होते. याच मेळाव्यात भुजबळांनी जरांगेंवर टीकेचे बाण डागले. तसेच आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही, असं म्हणत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला.

Advertisement

हे ही वाचा >> 'तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही…', भुजबळांनी थेट जरांगेंचं खाणंच काढलं!

भुजबळांनी या मेळाव्यात मांडलेल्या भूमिकेमुळे जातीय तेढ वाढीस लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच मुद्द्यावरून माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शिंदे सरकारला सवाल केला आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

छत्रपती संभाजीराजे काय म्हणाले?

भुजबळांच्या ओबीसी मेळाव्यातील भाषणानंतर संभाजीराजे छत्रपतींनी एक ट्विट केलं आहे. ज्यात संभाजीराजे म्हणाले, "छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत", अशा शब्दात संभाजीराजेंनी संताप व्यक्त केला.

हे ही वाचा >> भुजबळांचा घणाघात, जरांगे पाटलांच उत्तर; म्हणाले, “कितीही कळप…”

"सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल, तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का? हे स्पष्ट करावे अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी", अशी मागणी संभाजीराजेंनी शिंदे सरकारकडे केली आहे.

Advertisement

प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला संताप

भुजबळांच्या या भूमिकेबद्दल बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले, "आरक्षणाच्या प्रश्नावरून दोन समाजात दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न आहे. आम्ही हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात बैठका घेऊ. छगन भुजबळांना अंबडच्या सभेत मनोज जरांगेंना राजकीय आव्हान देण्याची काय गरज होती? आरक्षणावरून भांडून काय साध्य होणार? मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सुटू शकतो", असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज