For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

NCP : शरद पवारांच्या भेटीनंतर 'दादा' दिल्लीत! पवारांची पहिली प्रतिक्रिया आली समोर

06:23 PM Nov 10, 2023 IST | प्रशांत गोमाणे
ncp   शरद पवारांच्या भेटीनंतर  दादा  दिल्लीत  पवारांची पहिली प्रतिक्रिया आली समोर
sharad pawar ajit pawar meet in pune dada has left for delhi amit shah maharashtra politics
Advertisement

Sharad Pawar Ajit Pawar meet Pune : राष्ट्रवादीतील फुटीनंतर आज पुन्हा एकदा पुण्यात उप मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात भेट झाली आहे.शरद पवार यांचे बंधु प्रतापराव पवार (Prataprao Pawar) यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीनंतर अजित दादा दिल्लीला रवाना झाले आहे. दिल्लीत अजित दादा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची (Amit Shah) भेट घेणार आहे. या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यावर आता शरद पवार पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अजित पवारांसोबतच्या भेटीमागचं कारणही सांगितले. (sharad pawar ajit pawar meet in pune dada has left for delhi amit shah maharashtra politics)

Advertisement Whatsapp share

पुण्यात शरद पवार यांचे बंधु प्रतापराव पवार यांचे निवासस्थान आहे. प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानावरून बाहेर पडल्यानंतर शरद पवारांना माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली. यावेळी अजित पवारांसोबतच्या भेटीवर शरद पवार म्हणाले, सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा, नवीन वर्ष सुख,समृद्धी भरभराटीचं जावो, अशा शुभेच्छा त्यांन दिल्या. त्याचसोबत अजित पवारांसोबत झालेली भेट ही कौटुंबिक असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले आहे.

Advertisement

हे ही वाचा : Maratha Reservation : ”तुम्हीच आमचं गिळलं…”, ‘त्या’ प्रस्तावावर जरांगे भडकले!

दरम्यान प्रतापराव पवार यांच्या पत्नीची तब्येत बरी नाही आहे. त्यांना गोविंद बागेत येणे जमणार नाही. म्हणून पवार कुटुंब आज प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी जमले होते. यावेळी प्रतापराव यांच्या निवासस्थानी अजित पवार देखील उपस्थित होते.यावेळी अजित पवार आणि शरद पवारांची भेट झाली असल्याची माहिती आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

शरद पवारानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या भेटीवर भाष्य केले आहे. स्नेहभोजनासाठी पवार कुटुंबिय एकत्र आल्याचे सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले. अजित पवारांची प्रकृती 100 टक्के ठीक नाही आहे. त्यामुळे अजित पवारांना काही दिवस काळजी घ्यावी लागणार आहे. त्यात प्रदुषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. दिल्ली, मुंबई, पुण्यात खुप प्रदुषण असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा : MNS : ”मी नास्तिक, पण प्रभू रामाचा…”, जावेद अख्तर काय म्हणाले?

दरम्यान आता अजित पवार दिल्लीत अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या भेटीमागे काय घडामोड घडते हे पाहावे लागणार आहे.

Advertisement

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज