For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

NCP : शरद पवारांची अचानक प्रकृती खालावली! डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला

08:50 AM Nov 12, 2023 IST | मुंबई तक
ncp   शरद पवारांची अचानक प्रकृती खालावली  डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला
sharad pawar not feeling well in batamati program doctor advice take rest
Advertisement

Sharad Pawar Health Update : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad Pawar) यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त समोर आले आहे. शनिवारी बारामती (Baramati) दौऱ्यावर असताना शरद पवारांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे तत्काळ डॉक्टरांना पाचारण करून त्यांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये डॉक्टरांनी (Doctor) शरद पवार यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. या सर्व घडामोडीमुळे शरद पवार यांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. (sharad pawar not feeling well in batamati program doctor advice take rest)

Advertisement Whatsapp share

दिवाळीनिमित्त सध्या संपूर्ण पवार कुटुंब बारामतीत आहेत. शनिवारी दहा वाजण्याच्या सुमारास शरद पवार अॅग्रीकल्चर ट्रस्ट या ठिकाणी शरद पवार उपस्थित होते. त्यानंतर दुपारी 2 वाजताच्या दरम्यान ते विद्यानगरी प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला ते हजर होते. या कार्यक्रमात शरद पवारांना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी तातडीने डॉक्टर बोलावून शरद पवार यांची वैद्यकीय तपासणी केली होती. यावेळी त्यांचा ईसीजीही काढण्यात आला. दरम्यान आता डॉक्टरांनी शरद पवारांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

Advertisement

हे ही वाचा : ‘आज शाखा पाडली, उद्या कुणाचं तरी घर पाडतील’, उद्धव ठाकरे भडकले

शरद पवार यांची प्रकृती ठीक असल्याने उद्या ते घराबाहेर पडणार नसले तरी त्यांचे सगळे कार्यक्रम होणार आहेत. लोकांना ते घरी राहून भेटणार आहेत, अशी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

पवारांकडून व्हिडिओ जारी

दरम्यान शरद पवार यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही जनतेला शुभेच्छा देणारा व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी अजित पवार आणि इतर कुटुंबियांची भेट घेतल्याचा संदर्भ दिला आहे. "सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चढ उतार असतात. अडचणी असतात. वेळेप्रसंगी काही संकटांना सुद्धा तोंड द्यावं लागतं. पण आयुष्यात प्रतीवर्षी काही दिवस असे असतात, की या संकटाचं विस्मरण करुन कुटुंबासोबत काही दिवस घालवावेत, जगावं अशाप्रकारची इच्छा असते. अशी इच्छा प्रदर्शित करण्याचा दिवस हा आजचा दिवाळीचा दिवस आहे," असं शरद पवार म्हणाले.

हे ही वाचा : Nanded: रुग्णालय परिसरात डुक्करांनी घेतला तरुणाचा जीव, लचके तोडले अन्…

Advertisement
Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज