For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Shiv Sena UBT: '...तर आम्ही तुम्हाला दिवसा फाडू', ठाकरेंचा नेता शिंदे गटाला भिडला!

05:11 PM Nov 11, 2023 IST | मुंबई तक
shiv sena ubt      तर आम्ही तुम्हाला दिवसा फाडू   ठाकरेंचा नेता शिंदे गटाला भिडला
ठाकरे गटाचे नेते शरद कोळींनी दिलं थेट आव्हान
Advertisement

Shiv Sena Thane: सोलापूर: शिवसेना (Shiv Sena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी ठाणे ते मुंब्रा या दरम्यान पोस्टर लावण्यात आले होते. मात्र उद्धव ठाकरेंचा दौरा होण्याअगोदरच त्यांचे जवळपास 90 टक्के पोस्टर फाडण्यात आले आहेत. रात्रीच्या सुमारास काही अज्ञातांनी हे पोस्टर फाडल्याने ठाकरे गटाचे नेते आता प्रचंड संतापले आहेत. पोस्टर फाडल्याच्या कारणावरून ठाण्यात उद्धव गट व शिंदे गटात वातावरण तापलं आहे. (shiv sena argument between thackeray group and shinde group over uddhav thackeray poster tearing in thane sharad koli direct challenge to shinde group)

Advertisement Whatsapp share

या प्रकरणाचे पडसाद आता राज्यभर उमटत आहे. सोलापुरातील उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक संतप्त झाले आहेत. उद्धव ठाकरे गटाचे महाराष्ट्र उपनेते शरद कोळी यांनी शिंदे गटाला थेट इशारा दिला आहे. 'तुम्ही रात्रीचे पोस्टर फाडता तर आम्ही शिवसैनिक तुम्हाला दिवसा फाडू.' असा इशारा दिला आहे.

Advertisement

हे ही वाचा >> ब्रह्मकुमारी आश्रमात सख्खा बहिणींनी संपवलं जीवन, सुसाईड नोटमध्ये आसाराम बापूचा उल्लेख

'ज्या मुख्यमंत्र्यांच्या जीवावर हे सर्व काही करत आहात त्यांची सत्ता आज नाही, तर उद्या जाणार आहे.' अशी खरमरीत टीका शरद कोळी यांनी यावेळी केली आहे. दरम्यान, आता या टीकेला शिंदे गट काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

शरद कोळींचं शिंदे गटाला थेट आव्हान

नेमकं प्रकरण काय?

ठाण्यात शिंदे गटाच्या नेत्याने बुलडोझर फिरवलेल्या मुंब्र्यातील शिवसेनेच्या शाखेची पाहणी हे स्वत: उद्धव ठाकरे करणार आहेत. पण याच ठाणे दौऱ्यापूर्वीच मोठा राडा झाला आहे. कारण दौऱ्याआधी उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर फाडण्यात आले. ज्यामुळे येथील परिस्थिती तणावाची असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच जमावबंदीचे आदेशही लागू करण्यात आले आहेत.

शिंदे गटाचे माजी नगरसेवक राजन किने यांनी बुलडोजर फिरवलेल्या शाखेला आज (11 नोव्हेंबर) सायंकाळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे स्वतः भेट देणार आहेत. ठाकरेंच्या या दोऱ्यापूर्वीच शिंदे गटाचे माजी नगरसेवक राजन किने यांना 149 ची नोटीस बजावण्यात आली आहे.

Advertisement

हे ही वाचा >> ‘तुमचं विमान वेळेवर टेक ऑफ झालं नसतं, तर माझ्या आयुष्याचं विमान..’, खडसेंचा CM शिंदेंना फोन

या नोटीसीअंतर्गत त्यांना सार्वजनिक ठिकाणी रॅली न काढणे, सभा न घेणे, आंदोलन न करणे अशा सर्वच गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच शिंदे गटाच्या कार्यर्त्यकांना देखील नोटीस बजावण्यात आली असून जमावबंदीचे आदेश देखील लागू करण्यात आले आहेत. यामध्ये पाचपेक्षा अधिक कार्यकर्त्यांना एका ठिकाणी भेटण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज