Eknath Shinde Dasara Melava 2023: आझाद मैदानावर दसरा मेळावा, CM शिंदेंच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष
07:33 PM Oct 24, 2023 IST | रोहित गोळे
Advertisement
Eknath Shinde Dasara Melava 2023 LIVE: मुंबई: शिवसेनेचा (Shiv Sena) दसरा मेळावा कसा होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. (Dasara Melava) कारण सलग दुसऱ्या वर्षी दोन दसरा मेळावे पाहायला मिळत आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील दसरा मेळावा घेणं सुरू केलं आहे. मागील वर्षी एकनाथ शिंदे यांनी बीकेसीच्या मैदानावर दसरा मेळावा घेतला होता. तर यंदा आझाद मैदानावर त्यांनी दसरा मेळावा आयोजित केला आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंचा मेळावा सुरू असातना दुसरीकडे एकनाथ शिंदे त्यांना कसं प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पाहा CM एकनाथ शिंदेंचं भाषण LIVE:
Advertisement