For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Uddhav Thackeray Dasara Melava 2023: उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू, तोफ धडाडणार

07:09 PM Oct 24, 2023 IST | रोहित गोळे
uddhav thackeray dasara melava 2023  उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू  तोफ धडाडणार
Uddhav Thackeray Dasara Melava 2023 LIVE
Advertisement

Uddhav Thackeray Dasara Melava 2023 LIVE: मुंबई: शिवसेनेच्या (Shiv Sena) दसरा मेळाव्याची (Dasara Melava) परंपरा ही गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. मात्र, मागील दोन वर्षांपासून एकाच वेळी दोन-दोन दसरा मेळावे पाहायला मिळत आहे. एक दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर (Shivaji Park) होतो. जो शिवसेना (UBT) पक्षाचा आहे. तर दुसरा मेळावा हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचा आहे. शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यानंतर बदलेले राजकारण यामुळे दसरा मेळाव्याबाबत अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यातही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दसरा मेळाव्यानिमित्त शिवाजी पार्कवरून नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (shiv sena ubt organized dasara melava 2023 live shivaji park who will uddhav thackeray criticize)

Advertisement Whatsapp share

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:

  • तुम्ही अपात्रतेचा निर्णय लावयचा तेव्हा लावा. पण लवाद जर सर्वोच्च न्यायलयाला जुमानत नसेल तर सर्वोच्च न्यायालयाचं अस्तिव राहणार की नाही?
  • केसचा निकाल लागण्याआधी निवडणूक घेऊन दाखवा. मग जनताच दाखवेल यांना पात्र किंवा अपात्र कोण
  • मला माझ्या कुटुंबाचा अभिमान आहेच. पण पहिले कुटुंब व्यवस्था मान आणि मग नंतर बोल.
  • सर्वोच्च न्यायालय प्रत्येक वेळी कानफट फोडतंय लवादाचं.. पण तरीही म्हणतायेत की, आम्ही टाइमटेबल देऊ.
  • मी भाषणाच्या सुरुवातीला जरांगे-पाटलांना शुभेच्छा देतो. चांगल्या प्रकारे आंदोलन सुरू आहे. आज त्यांनी धनगरांना देखील साद घातली आहे.
  • मी मुख्यमंत्री होतो.. तेव्हा कोणावर लाठीहल्ल्याचे आदेश दिले का? मग जालन्याचा जनरल डायर कोण?
  • आज तिकडे मेळावा घेतायेत ते माझ्यावर टीका करत आहेत.
  • जातीपातीचं राजकारण करून भाजप जे झुंजविण्याचं काम करत आहेत.
  • ज्याच्याशी आपण लढतोय तो साधासुधा नाही, विघ्नसंतोषी आहे. भाजप एवढं विघ्नसंतोषी आहे की, कोणाचंही लग्न असो बोलवा अथवा बोलवू नका.. पोटभर जेवणार आणि निघताना नवरा-बायकोत भांडण लावून जाणार

पाहा उद्धव ठाकरेंचं भाषण LIVE:

Advertisement

Advertisement सब्सक्राइब करा
Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज