For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Supriya Sule : "ते वकील शरद पवारांना सॉरी बोलतात", सुळेंनी सांगितला दिल्लीतला किस्सा

08:32 AM Nov 14, 2023 IST | भागवत हिरेकर
supriya sule    ते वकील शरद पवारांना सॉरी बोलतात   सुळेंनी सांगितला दिल्लीतला किस्सा
सुप्रिया सुळे यांनी इंदापूर तालुक्यातील बोरी गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला.
Advertisement

Supriya Sule News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झालेत. अजित पवार गटाने थेट राष्ट्रवादी काँग्रेसवरच दावा केल्याने आता लढाई कोर्टात आणि निवडणूक आयोगात गेलीये. त्याच्या सुनावण्या सुरू असून, याबद्दलचे अनुभव सुप्रिया सुळेंनी बारामती मतदारसंघातील मतदारांना सांगितले. इंदापूर तालुक्यातील बोरी गावात ग्रामस्थांनी संवाद साधताना त्यांनी दिल्लीतील कोर्टातील अनुभव सांगितले. त्याचबरोबर मी गायब झालेले नाही, कामामुळे व्यस्त झाले आहे, अशी विनंतीही केली.

Advertisement Whatsapp share

सुप्रिया सुळे बोरीतील ग्रामस्थांशी बोलताना म्हणाल्या, "20-21 तारखेला निवडणूक आयोगाची लढाई, मग सुप्रीम कोर्टातील लढाई. मतदारसंघातील अर्धा वेळ केसमध्ये चाललाय. नवरा-मुलांना टाटा-बाय तुम्ही आईला टीव्हीवरच बघा. काय करणार? सगळ्या जबाबदाऱ्या असतात. सगळं तर माणूस करू शकत नाही. त्यामुळे नवरा, मुलं, कुटुंबाला ऑक्टोबरपर्यंत टाटा. वेळच नाहीये", असं सांगत राष्ट्रवादीतील फूटीनंतर काम वाढल्याची कबुली सुप्रिया सुळेंनी दिली.

Advertisement

हे ही वाचा >> शिंदेंच्या दोन नेत्यांमध्ये राजकीय कुस्ती, अनिल परबांकडून थेट विजयी उमेदवाराचं घोषित

"मतदारसंघ बघायचा की पक्षाची कामं बघायची की कोर्टाच्या केस बघायच्या? पवारसाहेब स्वतः जातात, पण जनाची नाही, तर मनाची आहे ना... ८० वर्षांच्या वडिलांना एकटं जाऊ देईन काय कोर्टात. केस पांढरे फक्त वयाने नाही होत. जबाबदाऱ्या, विचार या सगळ्या गोष्टी आहेतच ना", असं खासदार सुळे म्हणाल्या.

Advertisement सब्सक्राइब करा

हारेंगे, जितेंगे बाद में देखेंगे...

"आता सुप्रीम कोर्टात मजा यायला लागलीये. पहिल्यांदा असं वाटतं एवढं मोठं सुप्रीम कोर्ट कसं जाणार. हारेंगे जितेंगे बाद में देखेंगे, लढेंगे जरूर. नवीन शिकायला मिळतं. आपल्याकडे म्हणतात ना कोर्टाची पायरी चढू नका. आता एकदा चढल्यावर उतरायचं नाही. कोर्टात जे होईल ते बघू, पण खरंच नवीन शिकायला मिळतं", असं म्हणत सुप्रिया सुळेंनी दिल्लीती अनुभव सांगितले.

"माझं असं मत आहे की, जेव्हा आपण खरे असतो ना, तर लढायची अजिबात भीती वाटत नाही. निकालाची तर वाटतच नाही. कारण आपण खऱ्याच्या रस्त्याने चाललो आहोत. कोर्टात जे होईल. निवडणूक आयोग काय करतो माहिती नाही, ती लढाई कुठपर्यंत जाईल माहिती नाही. पण, आता लढायची सवय झाली", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Advertisement

हे ही वाचा >> NCP : राष्ट्रवादीतील फुटीनंतर दुसऱ्यांदा पवार कुटंबिय एकत्र, सुप्रिया सुळेंकडून फोटो शेअर

"आता वकिलांना भेटायची सवय झालीये. तर असं वाटतं की अरे बरेच दिवस झाले वकिलांना भेटले नाही. माझं भाग्य असं आहे की दोन्ही बाजूंचे वकील माझे मित्र आहेत. त्यामुळे मी चहा एका बरोबर घेते आणि लढते दुसऱ्याबरोबर आणि त्याच्याच बरोबर जेवायला जाते. लोक म्हणतात की हे काय चाललंय? पण, मी त्यांना म्हणते की आपली लढाई एकीकडे आणि आपली मैत्री एकीकडे."

"ते वकील बिचारे इतके चांगले की मधून मधून साहेबांना (शरद पवार) म्हणतात, सॉरी साहेब. साहेब म्हणतात जाऊद्या. हे सगळे सुप्रियाचे मित्र आहेत. शेवटी ते त्यांच्या पक्षकाराच्या बाजूने बोलणार आहेत. मी त्यांना सांगत असते की, तुम्ही तुमच्या पक्षकारांच्या बाजूने बोला. आपली मैत्री वेगळी", असं खासदार सुप्रिया सुळे मतदारसंघातील लोकांशी बोलताना म्हणाल्या.

"तुमचा खासदार गायब नाही, तर..."

"आता लढाई कुठपर्यंत चालेल सांगता येत नाही. त्यामुळे मतदारांनो समजून घ्या. तुमचा खासदार गायब नाही. तो दिल्लीला सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगात असतो", असं आवाहन सुप्रिया सुळेंनी मतदारांना केलं.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज