For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

किंग कोहलीचा तेंडुलकरला धोबीपछाड, Ind vs Aus सामन्यात झाले 11 ऐतिहासिक विक्रम

10:34 AM Oct 09, 2023 IST | भागवत हिरेकर
किंग कोहलीचा तेंडुलकरला धोबीपछाड  ind vs aus सामन्यात झाले 11 ऐतिहासिक विक्रम
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात तब्बल ११ ऐतिहासिक विक्रम झाले. विराट कोहलीच्या नावावरही दोन विक्रमांची नोंद झाली.
Advertisement

India vs Australia World Cup 2023 Match: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. या सामन्यात आश्चर्यकारक विक्रमांची नोंद झाली. विराट कोहलीने 116 चेंडूत 85 धावा करत कांगारूंचा पराभव करण्यात सिंहाचा वाटा उचलला. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना खूपच रंगतदार झाला. यात तब्बल 11 ऐतिहासिक विक्रम केले आहेत.

Advertisement Whatsapp share

विराट कोहलीने या खेळीच्या जोरावर दोन मोठे विक्रम केले आहेत. यात महत्त्वाचे म्हणजे त्याने सचिन तेंडुलकर आणि रिकी पाँटिंगसारख्या दिग्गजांनाही मागे टाकले आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनेही एकदिवसीय विश्वचषकात जलद 1000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. या सामन्यात 11 ऐतिहासिक रेकॉर्ड बनले आहेत. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल...

Advertisement

भारतात ऑस्ट्रेलियन संघाचे दोन मोठे विक्रम

पहिला विक्रम असा की, ऑस्ट्रेलियन संघाने आतापर्यंत भारतीय भूमीवर विश्वचषकात 19 सामने खेळले आहेत, त्यापैकी केवळ 4 वेळा पराभव पत्करावा लागला आहे. भारतीय भूमीवरील हा एक वेगळा विक्रम आहे. दुसरा विक्रम म्हणजे ऑस्ट्रेलियन संघ 1987 नंतर प्रथमच चेन्नईच्या मैदानावर विश्वचषकात सामना हरला आहे. आतापर्यंत त्याने या मैदानावर 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत.

Advertisement सब्सक्राइब करा

पहा VIDEO >> IND vs AUS: चित्यासारखी झेप… विराट कोहलीने घेतला अप्रतिम झेल

कमीत कमी धावांमध्ये 3 गडी गमावून सामना जिंकला

2 धावा - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई, 2023*
4 धावा- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, अॅडलेड, 2004
4 धावा- श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, मीरपूर, 2009
5 धावा- श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड, ढाका, 1998

ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा भारतीय

117 - शिखर धवन, ओव्हल, 2019
100* - अजय जडेजा, द ओव्हल, 1999
97* - केएल राहुल, चेन्नई, 2023*

Advertisement

ICC ODI-T20 स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय

2785 - विराट कोहली (64 डाव)*
2719 - सचिन तेंडुलकर (58)
2422 - रोहित शर्मा (64)
1707 - युवराज सिंग (62)
1671 - सौरव गांगुली (32)

एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक 50+ धावा करणारे फलंदाज (ओपनर्स वगळता)

113 - विराट कोहली*
112 - कुमार संगकारा
109 - रिकी पाँटिंग
102 - जॅक कॅलिस

हेही वाचा >> ‘हा माझा शेवटचा वर्ल्ड कप’, टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत

विश्वचषकात सर्वात कमी डावात हजार धावांचा विक्रम

19 डाव - डेव्हिड वॉर्नर*
20 डाव- सचिन तेंडुलकर/ एबी डिव्हिलियर्स
21 डाव- विव्ह रिचर्ड्स/सौरव गांगुली
22 डाव- मार्क वॉ 22/हर्शेल गिब्स

ऑस्ट्रेलिया प्रथमच एकदिवसीय विश्वचषकातील पहिला सामना गमावला (2000 पासून)

2003 - पाकिस्तान विरुद्ध विजय
2007 - स्कॉटलंड विरुद्ध विजय
2011 - झिम्बाब्वे विरुद्ध विजय
2015 - इंग्लंड विरुद्ध विजय
2019 - अफगाणिस्तान विरुद्ध विजय
2023 - भारत विरुद्ध हरले

2000 नंतर भारतीय संघ विश्वचषकातील पहिला सामना हरला होता

2003 - नेदरलँड विरुद्ध विजय
2007 - बांगलादेश विरुद्ध हरले
2011 - बांगलादेश विरुद्ध विजय
2015 - पाकिस्तान विरुद्ध विजय
2019 - दक्षिण आफ्रिका विरुद्ध विजय
2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय

वनडे विश्वचषकात दुसऱ्यांदा भारताचे दोन्ही सलामीवीर शून्यावर बाद झाले.

विरुद्ध झिम्बाब्वे, टुनब्रिज, 1983
वि ऑस्ट्रेलिया, चेन्नई, 2023

विश्वचषकात सर्वात कमी चेंडूत 50 बळी घेणारे गोलंदाज

941 - मिचेल स्टार्क
1187 - लसिथ मलिंगा
1540 - ग्लेन मॅकग्रा
१५६२ - मुथय्या मुरलीधरन
1748 - वसीम अक्रम

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज