For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Ajay jadeja : वर्ल्ड कपआधी अफगाणिस्तानची मोठी खेळी, टीम इंडियाला ठरणार आव्हान

09:16 PM Oct 02, 2023 IST | प्रशांत गोमाणे
ajay jadeja    वर्ल्ड कपआधी अफगाणिस्तानची मोठी खेळी  टीम इंडियाला ठरणार आव्हान
Odi World cup 2023, Afganistan Appoint Ajay Jadeja As Mentor: वर्ल्ड कप सूरू व्हायला अवघे दोन दिवस उरले आहेत. असे असताना वर्ल्ड कपच्या आधीच अफगाणिस्तान संघाने मोठी खेळी केली आहे. अफगाणिस्तानची ही मोठी खेळी टीम इंडियासह प्रतिस्पर्धी संघाना घाम फोडणारी आहे.
Advertisement

Odi World cup 2023, Afganistan Appoint Ajay Jadeja As Mentor: वर्ल्ड कप सूरू व्हायला अवघे दोन दिवस उरले आहेत. असे असताना वर्ल्ड कपच्या आधीच अफगाणिस्तान संघाने मोठी खेळी केली आहे. अफगाणिस्तानची ही मोठी खेळी टीम इंडियासह प्रतिस्पर्धी संघाना घाम फोडणारी आहे. इतकंच नाही तर वर्ल्ड कपचा निकाल बदलू शकणारी ही असू शकते, असा जाणकारांचा अंदाज आहे. त्यामुळे आता वर्ल्ड कपच्या तोंडावर नेमकी अफगाणिस्तानने कोणता प्लान रचला आहे? आणि वर्ल्डकपमध्ये तो किती यशस्वी ठरू शकतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (ajay jadeja appoint as afganistan mentor acb tweet odi world cup 2023 team india)

Advertisement Whatsapp share

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीच्या वनडे वर्ल्ड कप 2023 साठी आज माजी कर्णधार अजय जडेजा यांची अफगाणिस्तानचा मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे. याचसोबत क्रिकेट बोर्डाने अजय जडेजा अफगाणिस्तान संघाला क्रिकेटच्या मैदानात मार्गदर्शन करतानाचे फोटो ट्वीट केले होते.

Advertisement

हे ही वाचा :Virar Story: सकाळी बकरी चारायला गेला, परतला तेव्हा करोडपती होऊनच आला!

अफगाणिस्तान संघाने वर्ल्ड कप आधी भारताचा दिग्गज क्रिकेटर अजय जडेजाची मेंटॉर म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता अजय जडेजाचे अफगाणिस्तानच्या संघाला मार्गदर्शन लाभणार आहे. वर्ल्ड कपच्या दृष्टीने अफगाणिस्तान संघाने खेळली ही मोठी चाळ आहे. कारण यंदा सर्व वर्ल्ड कप सामने हे भारतात खेळवले जाणार आहेत. त्यामुळे भारतीय मैदावर कशाप्रकारे फलंदाजी आणि गोलंदाजी करायची याचे बहुमुल्य मार्गदर्शन अजय जडेजा यांच्याकडून अफगाणिस्तान संघाला मिळणार आहे.

विशेष म्हणजे अजय जडेजा हे भारताकडून 1996 चा वर्ल्ड कप देखील खेळले आहेत. त्यांना भारतीय परिस्थितीत देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. या दोन्ही गोष्टीचा अफगाणिस्तानला संघाला आगामी वर्ल्डकपमध्ये मोठा फायदा होणार आहे.

अजय जडेजाने भारतासाठी 15 कसोटी आणि 196 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 576 धावा केल्या आहेत तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 5359 धावा आहेत. अशा परिस्थितीत अजय जडेजा 2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तान क्रिकेट संघासाठी मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

हे ही वाचा :विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी तुटण्याचा धोका? समजून घ्या 5 संकेतांचे अर्थ

अफगाणिस्तान संघ : हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमानुल्ला गुरबाज, इब्राहिम जादरान, रियाज हसन, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल, अजमतुल्ला उमरजई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान , नवीन उल हक.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज