For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Asian Games, Indian Hockey Team: भारताच्या हॉकी टीमला थेट ऑलिम्पिकचं तिकीट, रचला 'सुवर्ण' इतिहास

08:19 PM Oct 06, 2023 IST | रोहित गोळे
asian games  indian hockey team  भारताच्या हॉकी टीमला थेट ऑलिम्पिकचं तिकीट  रचला  सुवर्ण  इतिहास
Asian Games, Indian Hockey Team: भारताच्या हॉकी टीमला थेट ऑलिम्पिकचं तिकीट, रचला 'सुवर्ण' इतिहास
Advertisement

Indian Hockey Team Gold Medal हांगझोउ (चीन): भारतीय हॉकी संघाने (Indian Hockey Team ) चमकदार कामगिरी करत हांगझोउ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले आहे. अंतिम सामन्यात भारताने (India) गतविजेत्या जपानचा (Japan) 5-1 असा पराभव केला. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगने सर्वाधिक दोन गोल केले. तर मनप्रीत सिंग, अभिषेक आणि अमित रोहिदास यांनी प्रत्येकी एक गोल केला. जपानकडून एकमेव गोल सेरेन तनाकाने केला. या विजयासह भारताने पुढील वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले आहे.

Advertisement Whatsapp share

टीम इंडियाने नेमका कसा मिळविला विजय

पहिल्या क्वार्टरमध्ये एकाही संघाला गोल करता आला नाही. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर खेळाच्या २५व्या मिनिटाला भारताला गोल करण्यात यश आले. भारताकडून मनप्रीत सिंगने हा गोल केला. मध्यंतराला भारत 1-0 ने आघाडीवर होता. त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने सलग दोन गोल केले. कर्णधार हरमनप्रीत सिंगने 32 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. त्यानंतर चार मिनिटांनी (36व्या मिनिटाला) अमित रोहिदासनेही पेनल्टी कॉर्नरवरून गोल केला.

Advertisement

हे ही वाचा>> icc world cup 2023: भारतीय संघासाठी मोठा धक्का! शुभमन गिलच्या खेळण्यावरच प्रश्नचिन्ह

यानंतर चौथ्या क्वार्टरमध्येही भारताने दोन गोल केले. पहिल्या 48व्या मिनिटाला अभिषेकने अप्रतिम गोल केला. मात्र, सेरेन तनाकाने 51व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत स्कोअर 4-1 असा केला. त्यानंतर हरमनप्रीतने 59व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर उत्कृष्ट गोल करत भारताला 5-1 असा शानदार विजय मिळवून दिला.

Advertisement सब्सक्राइब करा

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने चौथ्यांदा सुवर्णपदक जिंकले आहे. यापूर्वी 1966, 1998 आणि 2014 मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय भारतीय हॉकी संघाने 9 रौप्य आणि 3 कांस्यपदक जिंकले आहेत. पूल स्टेजमध्ये भारताने 58 गोल केले आणि फक्त 5 गमावले. या आशियाई स्पर्धेत भारताने एकही सामना गमावला नाही.

हे ही वाचा>> Asian Games 2023: शिंदे-फडणवीसांनीही कौतुक केलेली पारुल चौधरी आहे तरी कोण?

भारताने उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण कोरियाचा 5-3 असा पराभव केला, पण संघ लयीत दिसत नव्हता. पूल टप्प्यात भारताने जपानचा 4-2 असा पराभव केला होता. दोन्ही संघ 2013 पासून आतापर्यंत 28 वेळा आमनेसामने आले आहेत, त्यापैकी 23 सामने भारताने जिंकले आहेत. तर जपानने तीन सामने जिंकले आणि दोन सामने अनिर्णित राहिले.

Advertisement

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज